पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 27 September 2017

भीम ॲप

भीम ॲप कसे वापरावे ?

भीम ॲप कसे वापरावे ?
भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या ॲपला भीम हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे ॲप ॲन्ड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे ॲप १ कोटी ४० लाख वेळा मोबाईलवर डाऊनलोड करण्यात आले आहे. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे.
सभासद :
भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या ॲप्लिकेशनच्या सभासद आहेत. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजीटल देवाण घेवाण करू शकतो.
बँक सूची :
१. अलाहाबाद बँक २. आंध्र बँक ३. ॲक्सिस बँक ४. बँक ऑफ बडोदा ५. बँक ऑफ इंडिया ६. बँक ऑफ महाराष्ट्र ७. कॅनरा बँक ८. कॅथॉलिक सिरीयन बँक ९. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया १०. सिटी युनियन बँक ११. कॉर्पोरेशन बँक १२. डीसीबी बँक १३. देना बँक १४. फेडरल बँक १५. एचडीएफसी बँक १६. एचएसबीसी बँक १७. आयसीआयसीआय बँक १८. आयडीबीआय बँक १९. आयडीएफसी बँक २०. इंडियन बँक २१. इंडियन ओव्हरसीज बँक २२. इंडसइंड बँक २३. कर्नाटक बँक २४. करुर वैस्या बँक २५. कोटक महिंद्र बँक २६. लक्ष्मी विलास बँक २७. ओरीयेन्टल बँक ऑफ कॉमर्स २८. पंजाब नॅशनल बँक २९. आरबीएल बँक ३०. साउथ इंडियन बँक ३१. स्टँडर्ड चार्टर्ड बँक ३२. स्टेट बँक ऑफ ३३. स्टेट बँक ऑफ ३४. स्टेट बँक ऑफ इंडिया ३५. स्टेट बँक ऑफ ३६. स्टेट बँक ऑफ ३७. स्टेट बँक ऑफ ३८. सिंडीकेट बँक ३९. टीजेएसबी बँक ४०. युको बँक ४१. युनियन बँक ऑफ इंडिया ४२. युनायटेड बँक ऑफ इंडिया ४३. विजया बँक ४४. येस बँक
पर्याय :
या ॲपवरून पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून आपण देवाण घेवाण करू शकतो.
पैसे पाठवण्यासाठी :
१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा
२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा
३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्रच्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.
पैसे स्वीकारण्यासाठी :
१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्रच्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.
२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून.
३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून.

No comments :

Post a Comment