पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

केंद्राप्रमुखांच्या student पोर्टल वर करावयाच्या कार्यवाहीबद्दल माहिती

नमस्कार,
केंद्राप्रमुखांच्या student पोर्टल वर करावयाच्या कार्यवाहीबद्दल माहिती.
Student पोर्टल वरील संच मान्यता क्लस्टर लेवल ला फॉरवर्ड झाल्यानंतर क्लस्टर लेवल वरून पुढे संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी सुरुवातीला verify schools या टॅब मध्ये काम करावे लागते. यात जिल्हा परिषद शाळांसाठी क्लस्टर वरून संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी group forward sanch manyata या टॅब ने केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांची एकाच वेळी फॉरवर्ड करावी लागते त्याअगोदर verify schools या टॅब मधून जिल्हा परिषदेची संच मान्यता save करायची आहे
Verify schools मध्ये सुरुवातीला शैक्षणिक वर्ष निवडावे त्यानंतर जिल्हा परिषद शाळेसमोरील Hm मधील no. of students मधील विद्यार्थी संख्येवर क्लीक करावे यानंतर hm यांनी फॉरवर्ड केलेली संच मान्यता समोर दिसेल यात सर्व डिटेल्स चेक करावे (management, management details, division, medium, Aid type) यानंतर विद्यार्थी remove करायचा असेल तर यातील cluster या शेवटच्या रकान्यातील फॉरवर्ड मधील विद्यार्थी संख्येवर क्लीक करावे विद्यार्थ्यांच्या नावासमोर remove टॅब येईल जे विद्यार्थी remove करायचे आहेत ते remove करावे नंतर सर्व चेक करून संच मान्यता स्क्रीन मधील सर्वात शेवटी save टॅब ने save करावी
येथे एक बाब लक्षात घ्यावी विद्यार्थी remove केल्यानंतर जोपर्यंत beo लॉगिन वरून सदर शाळा save होत नाही तोपर्यंत ग्रुप फॉरवर्ड होणार नाही याचाच अर्थ असा की ज्या शाळांचे विद्यार्थी केंद्रप्रमुख लॉगिन ला remove केले आहे ती शाळा beo लॉगिन च्या student पोर्टल ला save होणे आवश्यक आहे तरच ग्रुप फॉरवर्ड हा टॅब activate होतो  (beo लॉगिन ला beo यांना  दोन पर्याय असतात एक केंद्रप्रमुखांनी remove करून save केलेली संच मान्यतेतील विद्यार्थी save करणे किंवा hm ने फॉरवर्ड केलेले विद्यार्थीच पुन्हा बरोबर आहे असे समजल्यावर पुन्हा hm चेच विद्यार्थी save करणे)
हे सर्व झाले की क्लस्टर लॉगिन ला zp शाळेसाठी group forward sanch manyata या टॅब मध्ये शाळेच्या नावासमोरील complete मधील चेक बॉक्स ऑटोमॅटिक टिक✅ झालेला असेल आणि  group forward for संच मान्यता हा टॅब activate होईल. (केंद्रप्रमुखांना एकाही शाळेचा एकहि विद्यार्थी remove करायचा नसेल तर तर सर्व शाळा verify schools या टॅब मधून वर सांगितल्याप्रमाणे सर्व डिटेल्स चेक करून save कराव्यात. शाळेच्या डिटेल्स मध्ये काही त्रुटी असतील management, management details, division, medium, aided type तर save टॅब च्या शेजारील reject वर क्लिक करावे reject करण्याचे योग्य कारण टाकावे आणि ok करावे. reject हा टॅब verify school या टॅब मधून शाळेच्या विद्यार्थी संख्येवर क्लीक केल्यानंतर दिसतो.) अशा प्रकारे zp शाळांची संच मान्यता क्लस्टर लेवल वरून ग्रुप फॉरवर्ड करावी.
Zp शाळांव्यतिरिक्त सर्व व्यवस्थापनाच्या शाळा verify schools या टॅब मधून शाळेच्या नावासमोरील विद्यार्थी संख्येवर क्लीक केल्यानंतर forward for sanch manyata या टॅब ने direct forward होणार आहे हे लक्षात घ्यावे अर्थात या शाळांचे विद्यार्थी remove करायचे असतील तर वरील सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी.
सदर पोस्ट माझ्या अनुभवावरून तयार केली आहे यात एखादा मुद्दा सुटला असण्याची शक्यता नाकारता येत नाही याव्यतिरिक्त काही अडचण आल्यास वरिष्ठांशी संपर्क करावा ही विनंती


धन्यवाद

No comments :

Post a Comment