सर्व सन्माननीय निर्धारक मित्रांनो...
शाळासिध्दी स्वयं मूल्यमापन आपण करत असलेल्या प्रभावी कार्यपध्दतीमुळे अतिशय वेगाने होत आहे. शासन निर्णयानुसार आपणास सर्व शाळांचे स्वयं मूल्यमापन व 10000 शाळांचे बाह्य मूल्यमापन करावयाचे आहे.
बाह्य मूल्यमापन करण्यासाठी सुमारे 2000 निर्मिती करणे आवश्यक आहे.
सदर निर्धारक प्रशिक्षण देखिल मागणी नुसार देण्यात येणार आहे.
सर्व तालुके, जिल्हे यामधुन मागणी येणे अपेक्षित आहे.
आपण सदर लिंक आपल्या जिल्ह्याच्या सर्व गटात पाठऊन आपल्या जिल्ह्यातील निर्मितीसाठी सहकार्य करावे.
शाळा बाह्य मूल्यमापनासाठी आवश्यक निर्धारक (Assesoors )निर्मिती व कार्यपध्दती
1. निर्धारक म्हणून काम करण्यास इच्छूक व्यक्तीने सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय
1) शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016
2) 07 जाने 2017 चे काळजीपूरक वाचन करावे.
2. निर्धारक निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरावी. सदर लिंकनुसार प्राप्त अर्जामधून निर्धारकांची निवड केली जाईल. निवड करतांना निर्धारकाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व उल्लेखनीय कामाचा विचार केला जाईल.
3. गुगल फॉर्म लिंक फक्त असेसर करिता -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSebZa-t_v7b5PDnHuzWa7mJGTZbiIqmQntpsQ9JkGjxcfXIYg/viewform?c=0&w=1
4. निर्धारकांनी “शालासिध्दी”संदर्भातील school Evaluation या Dashboard (दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या
www.shaalasiddhi.nuepa.org
या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करावे.
5. निर्धारकांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच शाळा बाह्य मूल्यमापन करण्यासाठी निर्धारक म्हणून कामकाज करता येईल. निर्धारकांसाठी विद्या परिषदेने नियोजित केलेल्या तारखांना संबंधित शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे अनिवार्य राहील.
6. शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठी
dir.mscert@gmail.com
व
shalasiddhimaha@gmail.com
या मेल ॲड्रेस चा वापर करावा.
निर्धारकांसाठी आचार संहिता – 1.शाळा स्वयं मूल्यमापन व शाळा बाह्य मूल्यमापन याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.
2.विद्या परिषदेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
No comments :
Post a Comment