फोन न तापण्यासाठी
अँड्रॉईड फोन न तापण्यासाठी हे आहेत ७ उपाय
हल्ली बऱ्याचदा गेम खेळताना, ब्राऊजिंगदरम्यान, चार्जिंग करताना मोबाईल गरम होतो. मोबाईल थोड्या प्रमाणात गरम होत असेल तर ठीक आहे मात्र थोड्याशा वापरानेही तो जास्त तापत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही समस्या काही सोप्या उपायांनीही घालवू शकता.
१. जर तुमचा फोन चार्जिंगदरम्यान गरम होत असेल तर दुसरा चार्जर वापरुन पाहा. एवढेच नव्हे तर ज्या पॉवर सर्किटमध्ये तुम्ही चार्जर लावताय तोही बदला. अनेकदा बॅटरी जुनी झाल्यानेही फोन गरम होण्याची समस्या होऊ शकते
२. फोन जुना झाल्यास आणि कोणत्याही फीचरचा वापर करताना तो गरम होत असेल तर एकदा सॉफ्टवेअर अपडेटवर नजर मारा. अनेकदा सॉफ्टवेअर अपडेट न केल्याने फोन गरम होऊ शकतो.
३. गेम खेळताना मोबाईल फोन गरम होत असेल तर ओव्हरलोड होतोय असे समजा. अर्थात मोबाईलमध्ये एकाचवेळी अनेक फंक्शन सुरु आहेत. त्यामुळे नको असेलले अॅप्लिकेशन सेटिंगमध्ये जाऊन बंद करा
४. नुसता ठेवल्यावरही फोन गरम होत असले तर त्याचे कारण ओव्हरलोड असू शकते. तुम्ही बॅटरीला ऑप्टिमाईज करु शकता. हा ऑप्शन सेटिंगमध्ये उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही पाहू शकता कोणते अॅप्लिकेशन बॅटरीचा जास्त वापर करतेय.
५. ब्राऊजिंगदरम्यान जर फोन गरम होत असेल तर ब्राऊजरच्या सेटिंगमध्ये जाऊन कंप्रेस डाटा अॅक्टिवेट करा. यामुळे केवळ तुमचा डेटाच कमी खर्च होणार नाही तर फोन गरम होणेही कमी होईल.
६. कॉलिंगदरम्यान तुमचा फोन गरम होत असेल तर एकदा फोनची फॅक्ट्री डाटा रिसेट करा. सेटिंगमध्ये जाऊन बॅकअप अँड रिसेट या ऑप्शनमध्ये फॅक्ट्री डाटा रिसेट करता येईल.
७. फोनच्या इंटरनल मेमरीमुळे कधी कधी फोन अधिक गरम होतो. त्यामुळे नको असलेल्या फाईल डिलीट करुन मेमरी कमी करा.
No comments :
Post a Comment