*8 नोव्हेंबर 2020* दिवस पहिला
आजची स्पर्धा - भाषण
इयत्ता - पहिली व दुसरी
*महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित बालदिवस सप्ताह ( दि.08 ते 14 नोव्हेंबर)*
*शासनामार्फत आयोजित स्पर्धेत भाग घेऊन तालुका, राज्य, जिल्हा स्तरावर बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी तसेच सहभागाचे प्रमाणपत्र लगेच मिळवा ?*
बालदिवस सप्ताह माहिती भरण्यासाठी लिंक
काही अडचण असेल तर व्हिडीओ लिंक
आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे.
१४ नोव्हेंबर हा दिवस बालदिवस म्हणून साजरा होतो. कारण या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस आहे. चाचा नेहरूंना मुले आणि फुले खूप आवडायची. मुलांमध्ये मुल होऊन पंडितजी तासन् तास रमून जायचे. त्याचे कोमल मन जाणून घेण्यासाठी त्यांची तळमळ असे. त्यांच्या मते मुल हे देशाचे उज्वल भविष्य आहे आणि मुलांच्या उज्वल भविष्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
बालदिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ७ गटात उपक्रम घेण्यात येणार आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात भाग घेताना आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाउंटवरून याचा व्हिडिओ, फोटो #baldivas2020 या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करावेत. याचसोबत सदर उपक्रम विद्यार्थी Instagram, Tweeter यावर देखील #baldivas 2020 याचा वापर करून अपलोड करू शकतील.
No comments :
Post a Comment