पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

निर्वर्ग अध्यापन

निर्वर्ग अध्यापन
निर्वर्ग अध्यापन
          विदयार्थ्यांचा 100 टक्के शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी विविध अध्यापन पध्दतींचा अवलंब शिक्षकांना करावा लागतो. व्दिशिक्षकी शाळेमध्ये किंवा तीन शिक्षकी शाळा व पाच वर्ग अथवा शिक्षक रजेवर असेल अशा ठिकाणी अध्ययन व अध्यापनाचे सुक्ष्म नियोजन शिक्षकांना करावे लागते. निर्वर्ग अध्यापन पध्दतीचा उत्कृष्ट वापर केल्यास शिक्षकांना चांगल्याप्रकारे अध्यापनाचे नियोजन करता येईल. या अध्यापन पध्दतीमध्ये विदयार्थ्यांचे बौध्दिक स्तर विचारात घेऊन गट करावेत व त्या गटांना त्यांच्या क्षमतेनुसार विषयातल्या उपघटकाचे काम पूर्ण करण्यास सांगावे. या विदयार्थी गटांना विशिष्ट नाव दिल्यास अजून आपले काम सोपे होऊ शकते.
                 सद्यपरिस्थितीत शाळाबाहय मुलांना वयानुरूप त्या-त्या इयत्तेत प्रवेश दिला जातो.काही मुले इतर काही कारणांमुळे अप्रगत राहतात. काही मुलांचा बौध्दीक स्तर चांगला असल्यामुळे त्यांना चांगले आकलन होते.ही मुले वर्गाचे व गटाचे नेतृत्व करू शकतात.त्यामुळे सर्वच मुलांना त्यांच्या क्षमतेने कौशल्य प्राप्त करून प्रगत होण्यासाठी निर्वर्ग अध्यापन पध्दत उपयोगी पडते.
 कार्यपध्दती-
             स्तरनिहाय गटामध्ये मुलांना बसविणे. भाषा व गणिताची जी कौशल्य प्राप्त करावयाची आहेत त्यासाठी शैक्षणिक अध्ययन अनुभव देणे. ही मुले गटात स्वतः साहीत्य हाताळतील त्यावरील शब्द ,अक्षर ,अंक इ.बाबत माहिती मिळवतील.  त्यानुसार स्वतः अक्षर व शब्द ओळखतील ,संख्याज्ञान होईल. गटामध्ये बौध्दिक स्तर चांगला असलेला विदयार्थी गटाचे नेतृत्व करील. उच्च बौध्दिक स्तर असलेल्या गटातील मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार उच्च कौशल्य/प्रभुत्व मिळविण्यासाठी योग्य ते अध्ययन अनुभव दयावेत त्यासाठी आवश्यक सुविधा/साहित्य उपलब्ध करून दयावे.उदा. चित्रावरून गोष्ट,प्रसंगवर्णन, नोटा व नाणी यावरून संख्या व संख्यास्थान ओळखणे इ.
   भाषा व गणित विषयानुसार शाळेतील सर्व वर्गांची स्तरनिश्चिती करणे.(उदा.-भाषा निकष- अक्षर,शब्द,वाक्य,परिच्छेद,गोष्ट इ.गणित निकष- संख्या, संख्याज्ञान,संख्यावरील क्रिया)

  गटनिहाय वर्गीकरण :-
   गट-1                          उच्च क्षमताप्राप्त विदयार्थी.
   गट-2                          काही क्षमताप्राप्त विदयार्थी.
   गट-3                          काही दुस-या क्षमताप्राप्त विदयार्थी.
   गट-4                          क्षमता प्राप्तीमध्ये कच्चे विदयार्थी.
   गट-5                          क्षमता संपादणूकीमध्ये कच्चे विदयार्थी.

   गट 1 आणि गट 4               यात गट 1 मधील विदयार्थी गट 4 मधील
   यांचे सहअध्ययन                 विदयार्थ्यांना अध्ययनास मदत करतील.
   गट 2 आणि गट 3               क्षमता संपादनातील त्रुटी विदयार्थी एकमेकांच्या
   यांचे सहअध्ययन                 सहाय्याने दूर करतील.
   गट 5                          शिक्षक स्वतः विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

¤  परीपाठानंतर भाषा व गणित विषयाचे अध्यापन करणे.
धन्यवाद !!!

No comments :

Post a Comment