पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

संचमान्यता 18-19

ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 महत्वाचे,
ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 संबधीत संपुर्ण माहिती अंतीम करण्याबातची कार्यवाही     
       (FORWARD & FINALIZED) दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत पुर्ण करणे बाबत.
संदर्भ:- मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य्‍ यांचे राज्यस्तरीय विशेष बैठक, दिनांक-06.10.2018 मधील सुचना.

उपरोक्त संदर्भिय बैठकीतील मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यानी दिलेल्या सुचनेनुसार शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत सर्व मनपा / जि.प. / सर्व माध्यमांच्या खाजगी शाळांची सन  2018-19 या शैक्षणीक वर्षाकरीता सरल प्रणालीदवारे तयार करण्यात येणा-या ऑनलाईन संचमान्यतेची शाळांनी फ़ॉरवर्ड केलेली माहीती क्लस्टर लॉगीन वरुन दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत अंतीम करण्याची कार्यावाही पुर्ण करावयाची आहे.
त्याअनुषंगाने मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी लॉगीन वरुन खालील महत्वपुर्ण बाबी पुर्ण करण्यात याव्यात.
मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही
१) मुख्याध्यापकांनी आपले शाळा पोर्टल मधील सर्व माहिती 100% FINALIZED करावी.
२) मुख्याध्यापकांनी आपले विदयार्थी पोर्टल मधील विदयार्थी प्रमोशन, REQUEST –TRANSFER & APPROVED, NEW ENTRY, ETC. या सर्व बाबींची पुर्तता करुन दिनांक-04.10.2018 रोजीची अंतीम वर्गनिहाय विदयार्थी संख्या ही SANCHMANYATA TAB मधील REPORT 2018-19 या टॅब अंतर्गत केंद्रप्रमुख लॉगीनला FORWARD TO SANCHMANYATA या टॅब दवारे माहिती पाठविली जावी.
३) मुख्याध्यापकांनी वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती अंतीम केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्या FINALIZED करावी. सदरील माहिती केंद्रप्रमुख लॉगीनला AUTO FORWARD होईल.
केंद्रप्रमुखांनी करावयाची कार्यवाही ∙
१) क्लस्टरने केंद्रातर्गत शाळांनी पाठविलेली स्कुल पोर्टलची माहितीची पुर्नपडताळणी करुन ती 100% FINALIZED करावी. शाळांनी नोंदविलेली चुकीची माहिती REJECT करावयाची सुविधा क्लस्टर लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ज्या शाळांची माहिती क्लस्टर लॉगीन वरुन REJECT केली जाईल त्या शाळा मुख्याध्यापकांना याबाबत वैयक्तिक संपर्क साधुन अवगत करावे व तात्काळ अचुक माहिती नोंदणी करुन पुनश्च माहीती क्लस्टर लॉगीनला फॉरवर्ड करुन घेतली जावी.
२) क्लस्टर ने आपले स्टुडंट पोर्टल लॉगीन वरील SANCH MANYATA TAB मधील VERIFY SCHOOL टॅब अंतर्गत आलेली शाळांची वर्गनिहाय विदयार्थी संख्येची अचुक पडताळणी (संदर्भ दिनांक-04.10.2018) अधिकृत अभिलेख्यांच्या आधारे करुन त्यातील योग्य ती विदयार्थी संख्या गटशिक्षणाधिकारी लॉगिनला FORWARD करावी. *जे विदयार्थी प्रत्यक्ष शालेय पटावर नसतील अशा विदयार्थ्यांना REMOVE करण्याची सुविधा देखील क्लस्टर यांचे लॉगीनला देण्यात आलेली आहे. सदर REMOVE केलेले विदयार्थी वगळता उर्वरीत विदयार्थी संख्या हीच गटशिक्षणाधिकारी लॉगीनला दिसून येईल.* क्लस्टरने  केंद्रांतर्गत मनपा शाळांसाठी GROUP FORWARD FOR SANCHMANYATA या टॅब चा वापर करुन क्लस्टर मधील सर्व शाळांची एकत्रित संचमान्यता  शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला FORWARD करता येईल. मात्र खाजगी व्यवस्थापनाच्या  शाळांची माहिती प्रत्येक शाळानिहायच FORWARD करावी लागणार आहे याची नोंद घ्यावी.
३) क्लस्टर प्रमुखाने वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती संदर्भातील कार्यवाही पुर्ण केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर शाळा मुख्याध्यापकांनी FORWARD केलेली दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर FINALIZED करावी. सदरील माहिती लॉगीनला AUTO FORWARD होईल.
·         गटशिक्षणाधिकारी यांनी करावयाची कार्यवाही ∙
१)      केंद्रप्रमुखांनी FINALIZED करुन गशिअ स्कुल पोर्टलला FORWARD केलेली सन 2018-19 या वर्षातीत अंतर्गत शाळांची माहिती FINALIZED करावी. सदर कार्यवाही करीत असतांना ज्या शाळांची वर्गवाढ अदयापावेतो शाळा लॉगीनला प्रलंबीत आहे अशा शाळांसाठी दिनांक-13.10.2018 पर्यंत याकार्यालयाचे पुढील सुचनेची प्रतीक्षा करावी.
२)      गटशिक्षणाधिकारी यांच्या स्टुडंट पोर्टल लॉगीनला केंद्रप्रमुखांनी पडताळणी करुन *ज्याशाळेचे विदयार्थी REMOVE केलेले आहेत अशाच शाळा दिसून येणार आहेत. सदरील शाळेतील REMOVE केलेल्या विदयार्थ्यांना वगळणे अथवा समावेशीत करण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना आहेत. ज्या शाळांचे एकही विदयार्थी केंद्रप्रमुखांनी REMOVE केलेला नाही अशा शाळांची विदयार्थी संख्या ही केंद्रप्रमुख लॉगीनवरुनच सरल प्रणालीमार्फत संचमान्यते करीता अंतीम धरण्यात येईल.*
३)      केंद्रप्रमुखांनी संचमान्यता पोर्टलला अंतीम केलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी संचमान्यता लॉगीन वरुन FINALIZED करावी.
         उपरोक्त नमुद सुचना-मार्गदर्शनानुसार संबधीत जबाबदारी सोपविलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या (स्कुल-स्टुडंट-संचमान्यता) लॉगीन वरील कामाचे स्वरुप समजुन घेवून खालील वेळापत्रकानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. दिलेल्या विहित मुदतीनंतर केलेल्या कार्यवाहीमुळे शाळेच्या ऑनलाईन संचमान्यतेवर विपरित परिणाम झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबधीत लॉगीन प्रमुखांची राहील याची गांर्भियाने नोंद घ्यावी.
उपरोक्त सुचना गट तथा केंद्रस्तरावरुन अंतर्गत सर्व व्यवस्थापन-माध्यमांच्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना तात्काळ अवगत करुन देण्यात याव्यात. केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी यांनी उपरोक्त ऑनलाईन कार्यवाही दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पुर्ण करण्यासाठी अधिनस्त तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेऊन विहित मुदतीत काम पूर्ण करावे.
ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 माहिती नोंदणी FORWARD & FINALIZED करण्यासाठीचे वेळापत्रक-

१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती फॉरवर्ड करणे :-    दिनांक 04/10/2018 ते दिनांक 15/10/2018.
२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती अंतिम करणे :-  दिनांक-04/10/2018 ते दिनांक- 18/10/2018.
वरील वेळापत्रक तथा सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी.
मा. प्रशासकीय अधिकारी यांचे आदेश
***********************--**************
प्रति केंद्रप्रमुख /मुख्याध्यापक
  संचमान्यता महत्त्वाचे मुद्दे
१) स्टुडंट पोर्टल वरील डेटा चेक करून फॉरवर्ड करणे
२) स्कूल पोर्टलमध्ये अध्यापनाच्या खोल्या भरणे
१-५  ६-८
३) ******IMP*****
स्कूल पोर्टलमधील संचमान्यता टॉब मध्ये कार्यरत शिक्षक संख्या भरणे
४) वरील सर्व माहिती केंद्रप्रमुख लॉगिन वरून Finalized झाल्याशिवाय शाळांची संच मान्यता होणार नाही .
5) आपल्या केंद्रातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना संचमान्यता फॉरवर्ड करणे
* कार्यरत शिक्षक संख्या भरून Finalized करण्यास सांगणे
*************************-**-----********
प्रति केंद्रप्रमुख /मुख्याध्यापक
  संचमान्यता महत्त्वाचे मुद्दे
१) स्टुडंट पोर्टल वरील डेटा चेक करून फॉरवर्ड करणे
२) स्कूल पोर्टलमध्ये अध्यापनाच्या खोल्या भरणे
१-५  ६-८
३) ******IMP*****
स्कूल पोर्टलमधील संचमान्यता टॉब मध्ये कार्यरत शिक्षक संख्या भरणे
४) वरील सर्व माहिती केंद्रप्रमुख लॉगिन वरून Finalized झाल्याशिवाय शाळांची संच मान्यता होणार नाही .
5) आपल्या केंद्रातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना संचमान्यता फॉरवर्ड करणे
* कार्यरत शिक्षक संख्या भरून Finalized करण्यास सांगणे

No comments :

Post a Comment