पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

दिव्यांग मित्र अभियान सांगली जिल्हा २०१७-२०१८

दिव्यांग मित्र अभियान सांगली जिल्हा २०१७-२०१८

   आज दि. 08.09. 2017 रोजी पुणे जिल्हा परिषद येथे महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग राज्यस्तरीय विकास परिषद - 2017 या परिषदेस, महाराष्ट्र राज्य ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री मा. ना. पंकजा ताई मुंडे व महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री मा. ना. महादेव जानकर यांना दिव्यांग मित्र अभियानाची माहिती देताना, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष मा. संग्रामसिंह देशमुख(भाऊ), सांगली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिजीत राऊत.. 

                 

  

जिल्ह्यातील सर्व अपंगांची नोंदणी करणे, अपंगत्व प्रमाणपत्र वाटप, केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ‘दिव्यांग मित्र अभियान’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ उपस्थित होते. 
केंद्र, राज्य शासन, जिल्हा परिषद स्वीय निधी, ग्रामपंचायत निधीतून अपंगांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. गरजु अपंगांना लाभ व्हावा यासाठी ‘दिव्यांग मित्र अभियान’ राबविले जाणार आहे.  
दिव्यांग मित्र अभियान अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष  हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आहेत. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मनगौडा रवि, ब्रह्मदेव पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत तसेच सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, सिव्हिल सर्जन, मेडिकल कॉलेजचे डीन, एस. टी. महामंडळाचे आगारप्रमुख, समाजकल्याणचे सहायक आयुक्त, तहसीलदार (सं.गा.यो.), उद्योग विभागाचे व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, संघटना प्रतिनिधी हे या समितीचे सदस्य असणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रविकांत आडसूळ हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची बैठक दरमहा होईल. सर्व खातेप्रमुखांच्या उपस्थितीत दिव्यांग मित्र अभियानचा दरमहा आढावा घेतला जाणार आहे. 
दिव्यांग मित्र अभियान : उद्दिष्टे, वैशिष्ट्ये
दिव्यांग व्यक्तींची १०० टक्के नोंदणी ऑनलाईन करणे
अपंगांची तपासणी करून अपंगत्व प्रमाणपत्र देणे
आरोग्य जीवनदायी’तून उपचार करून संदर्भ सेवा देणे
दिव्यांगांना उपकरणे उपलब्ध करून देणे
शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी मेळावे
दिव्यांग नोंदणी वर्षभरात केव्हाही अपडेट करता येणार
माहितीचे ऑनलाईन संकलन; योजना राबविणे सुलभ
एनजीओ, सीएसआर, लोकसहभागातून उपकरणे देणे
अपंग कल्याण योजनांची माहिती वेबसाईटवर उपलब्ध
अंमलबजावणी कृती आराखडा
दिव्यांग नोंदणी फॉर्म भरणे: दि. १८ जुलै २०१७
नोंदणी फॉर्म वेबसाईटवर ऑनलाईन भरणे: दि. १८  ते २४ जुलै
अपंगत्व तपासणी व प्रमाणपत्र वाटप : ऑगस्ट ते सप्टेंबर 
तपासणी, उपचार, उपकरणांची मागणी नोंदवणे : सप्टेंबर व ऑक्टोबर
शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी मेळावे : ऑक्टोबर व नोव्हेंबर
जागतिक अपंग दिनी (दि. ३ डिसेंबर) साहित्य वाटप व
सोमवारी कार्यशाळा
दिव्यांग मित्र अभियान कार्यशाळा सोमवारी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद समिती सभागृहात होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्या उपस्थितीत सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितींचे सीडीपीओ, विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा होणार आहे, अशी माहिती सीईओ अभिजित राऊत, डेप्युटी सीईओ रविकांत आडसूळ यांनी दिली. 

No comments :

Post a Comment