पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

हे आहेत 'जीमेल'चे कीबोर्ड शॉर्टकट

*हे आहेत  'जीमेल'चे कीबोर्ड शॉर्टकट*

यासाठी सेटिंग मध्ये जा. जनरल टॅबला ओपन करा. त्यात 'keyboard shortcuts' ला ऑन करा. आणि हा बदल सेव्ह करा.


  आजकल आपण सगळीच कामं जीमेलवर करत असतो. पण हे वापरण्याचं काही खास शॉर्टकट्स आहेत ज्याबद्दल फार कमी  लोकांना माहित आहे. जीमेल हे कीबोर्ड शॉर्टकट्स तुमचं काम सोप करतील आणि तुमचा वेळही वाया जाणार नाही.

हे शॉर्टकट्स वापरण्यासाठी तुम्हाला आधी कीबोर्ड शॉर्टकट्स ऑन करावं लागेल. यासाठी सेटिंग मध्ये जा. जनरल टॅबला ओपन करा. त्यात 'keyboard shortcuts' ला ऑन करा. आणि हा बदल सेव्ह करा.

काय आहेत 'कीबोर्ड शॉर्टकट्स'?

1) जर तुम्हाला जुने मेल वाचायचे असतील तर 'J' दाबा.

2) नवीन मेल वाचण्यासाठी 'K' दाबा.

3) मेल संग्रहित (archive) करण्यासाठी 'E' दाबा.

4) मेलला ट्रॅश करण्यासाठी 'shift #' दाबा.

5) मेल शोधताना बारमध्ये टाईप करण्यासाठी ' / ' दाबा.

6) मेलचं उत्तर देण्यासाठी 'A' दाबा.

7) वैयक्तिकरित्या (कोणत्याही एकाला) उत्तर देण्यासाठी 'R' दाबा.

8) न वाचलेले मेल निवडण्यासाठी 'Shift 8 u' दाबा.

9) महत्त्वाचे मेल निवडण्यासाठी  ' = ' दाबा.

10) नवीन मेल लिहिण्यासाठी 'C' दाबा

No comments :

Post a Comment