पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

मोबाइल वॉलेट

मोबाइल वॉलेट म्हणजे काय

 आणि ते कसे वापरायचे?

मोबाइल वॉलेट, पेटीएम हे हल्ली हमखास ऐकायला मिळणरे शब्द. सोप्या शब्दात सांगायचे तर मोबाइल वॉलेट हे एक मोबाइलमध्ये असलेलं आभासी पाकीट! जे व्यवहारासाठी खर्‍याखुर्‍या पाकीटाची जागा घेऊ पाहतंय! या मोबाइल वॉलेटमध्ये आपण ठराविक रक्कम साठवू शकतो आणि ती कुठेही व्यवहारासाठी वापरता येते! ऑनलाइन व्यवहार (खरेदी/रीचार्ज/पैसे पाठवणे/इ) तसेच ऑफलाइन ठिकाणी जसे की किराणा विक्रेते, रिक्षा/टॅक्सी चालक, दैनंदिन विक्रेते (भाजी, पेपर,इ), थिएटर काऊंटर यांना पैसे देण्यासाठी सहज करता येतो!

या वॉलेटमध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्यामधून क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेटबँकिंग द्वारे पैसे भरायचे आणि ते पैसे नंतर वरीलप्रमाणे ठिकाणी Send Money / Receive Money असे पर्याय वापरुन वापरू शकता.
हा पर्याय पूर्ण सुरक्षित असून तुमचं वॉलेट यूजर आयडी, पासवर्ड यांनी सुरक्षित केलेलं असून तुमच्या वॉलेटमधून कोणताही व्यवहार झाला की एक ईमेल आणि एक SMS सुद्धा येतो!

सध्या बरेच मोबाइल वॉलेट उपलब्ध आहेत.
• पेटीएम (Paytm)
• फ्रीचार्ज (Freecharge)
• मोबीक्वीक (Mobikwik)
• ऑक्सिजेन (Oxigen)

आपण यासाठी उदाहरणार्थ सर्वात जास्त वापरलं जाणारं पेटीएम अॅप पाहूया

1. प्रथम हे अॅप तुमच्या फोनवर डाऊनलोड करून घ्या

2. यानंतर Profile > Login To Paytm > Sign Up इथे जाऊन तुमचा मोबाइल क्रमांक, इमेल आयडी व तुम्हाला हवा असलेला पासवर्ड टाका व Sign Up वर क्लिक करा. तुम्हाला खात्री करण्यासाठी एक OTP असलेला SMS मेसेज येईल. तो टाइप करून Verify वर क्लिक करा(दाबा). आता तुमचं Paytm Wallet तयार झालय!

3. आता Home वर जा आणि Add Money पर्याय निवडा. किती रक्कम वॉलेटमध्ये टाकायची आहे ती Amount मध्ये टाइप करा व Add Money वर टॅप करा. आता तुम्हाला कोणत्या मार्गाने पैसे वॉलेटमध्ये भरायचे आहेत तो निवडा

4. यासाठी तुमच्यासमोर तीन पर्याय आहेत Netbanking, Debit Card, Credit Card. यापुढे योग्य ते पर्याय निवडा आणि तुमच्या वॉलेट मध्ये तुमच्या बँकमधून रक्कम लगेच जमा केली जाईल!

5. आता तुम्ही Home वर जाऊन Passbook वर टॅप करा. तुम्हाला शिल्लक, केलेले व्यवहार,इ सर्व माहिती मिळेल.
याबद्दल व्हिडिओ पहा :

पेटीएम वापरुन पैसे पाठवण्यासाठी खालील प्रमाणे

 कृती करा : -

1. पेटीएम अॅप उघडून लॉगिन करा (आधी केलं नसेल तर)

2. यानंतर Home वर Pay हा पर्याय निवडा

3. इथे तुम्हाला Scan Code, Mobile No, Show Code, Payment Request असे चार पर्याय दिसतील!
4.1 स्कॅन कोड द्वारे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा कोड फोन समोर धरून स्कॅन करा. त्यानंतर किती रक्कम पाठवायची आहे ते टाइप करा आणि Pay वर टॅप करा. तुम्ही यशस्वीरीत्या पैसे पाठवले आहेत!
4.2 कोड स्कॅन वापरायचा नसेल तर ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचा मोबाइल क्रमांकसुद्धा टाकून तुम्ही पैसे पाठवू शकता यासाठी चार पर्यायांपैकी Mobile No हा पर्याय निवडा, मोबाइल क्रमांक व रक्कम टाका की झाले पैसे ट्रान्सफर!

पेटीएम वापरुन पैसे स्वीकारायचे/घ्यायचे असतील तर खालीलप्रमाणे कृती करा : -

1. Home मध्ये जाऊन वरील पर्याय बाजूला सरकवा

2. नंतर Accept Payment पर्याय निवडा

3. इथे तुम्ही मोबाइल क्रमांक व रक्कम टाका नंतर  Request Money आणि पैसे स्वीकारू शकता
किंवा मोबाइल क्रमांकच्या बाजूला दिसणारा छोटा आयकॉन निवडा व रक्कम टाकून Generate QR Code पर्याय निवडा व नंतर तो कोड ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याच्या फोनमध्ये स्कॅन करायला सांगा!

4. पाठवणार्‍याच्या वॉलेटमधून पैसे लगेच तुमच्या वॉलेटमध्ये जमा होतील!

मोबाइल वॉलेटने रीचार्ज करण्यासाठी : -
1. वॉलेटमध्ये लॉगिन करा
2. वॉलेट मध्ये रक्कम जमा करा
3. Recharge पर्याय निवडा, Prepaid/Postpaid निवडा, मोबाइल क्रमांक टाका, किती रकमेचा रीचार्ज करायचा आहे ती रक्कम टाका व Recharge Now वर टॅप करा
4. तुम्हाला त्या मोबाइल क्रमांकावर रीचार्ज झाल्याचा मेसेज मिळेल!
वरील प्रमाणेच मोबाइल, डिश टीव्ही DTH, डाटा कार्ड, इलेक्ट्रिसिटी/फोन/लँडलाइन बिल, सोबतच काही ठिकाणी गॅस/ब्रॉडबॅंड बिल, रेल्वे/विमान/बस तिकीट बुकिंग यासाठीसुद्धा वॉलेट वापरू शकता !

इतर वॉलेटबद्दल माहितीसाठी खाली लिंक्स दिल्या आहेत. त्यांचा संदर्भ घ्या. त्या वॉलेट्ससाठी सुद्धा बर्‍यापैकी पेटीएम प्रमाणेच पैसे ट्रान्सफर केले जातात.
Mobikwik
Freecharge
Oxigen

काही बँकानीसुद्धा स्वतःची वॉलेट्स उपलब्ध करून दिली आहेत.
जसे की स्टेट बँक ऑफ इंडियाने बडी(SBI Buddy) | HDFC PayZapp | ICICI Pockets | Axis Lime
ही वॉलेट्स ठराविक बँकतर्फे सादर केलेली असली तरी कोणत्याही बँकेचा ग्राहक कोणताही वॉलेट वापरू शकतो!

या वॉलेट सर्विसेस सोबत जवळपास प्रत्येक टेलीकॉम ऑपरेटरनीसुद्धा स्वतःचे वॉलेट सादर केले आहेत.
या सर्वांच काम एकच असलं तरी फरक फक्त त्यामध्ये एकूण किती सुविधा आहेत इथे आहे. त्यामुळे गरजेनुसार वॉलेट निवडा. त्यासाठी खालील प्रमाणे लिंक्स :
Airtel Money | Vodafone mPesa | Idea Money |
BSNL SpeedPay | Aircel Money | JioMoney |

No comments :

Post a Comment