पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

सरल सूचना फेब्रुवारी 2018 पासून

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११४५*
*दिनांक* : *१५/०२/२०१८*
*प्रदीप भोसले,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना* __________________________________________

➡ *आंतरजिल्हा बदली २०१७ टप्पा क्रमांक-२ ची प्रक्रिया सुरू झाली असून त्याबाबत दिनांक १४/०२/२०१८ रोजी सूचना देखील देण्यात आलेली आहे.या प्रक्रियेत खालील शिक्षक कर्मचाऱ्याचा समावेश केलेला आहे.*

✏  १) *टप्पा क्रमांक-१ मध्ये अर्ज केला होता परंतु त्यामध्ये बदली झालेली नाही असे शिक्षक कर्मचारी.*

✏  २) *टप्पा क्रमांक-१ मध्ये अर्ज केला होत परंतु काही कारणास्तव सदर अर्ज वेरीफाय झाला नसलेले (Draft मोड मधील फॉर्म) शिक्षक कर्मचारी.*

➡ *वरील शिक्षक कर्मचारी यांचा टप्पा क्रमांक -२ मध्ये समावेश करण्यात आलेला असून कोणत्याही नवीन शिक्षक कर्मचाऱ्याचा फॉर्म या टप्प्यात न घेण्याचा निर्णय झालेला होता.परंतु,काल दिलेल्या सूचना क्रमांक ११४४ नंतर राज्यातील इतर बऱ्याच शिक्षक बांधवांनी (असे शिक्षक बांधव की ज्यांनी टप्पा क्रमांक-१ मध्ये फॉर्म भरलेले नव्हते) विनंती केली की याच प्रक्रियेत आमचा देखील समावेश करण्यात यावा.या सर्व शिक्षक बांधवांच्या विनंतीवरून या सर्व शिक्षकांना देखील याच प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा निर्णय काही वेळापूर्वीच घेण्यात आलेला आहे.ही सुविधा या शिक्षकांना आज दुपारनंतर उपलब्ध करून देण्यात येईल याची नोंद घ्यावी.त्यामुळे आता मागील टप्प्यात ज्या शिक्षकांचे बदली झालेल्या यादीत नाव आलेले आहे ते शिक्षक सोडून इतर कोणताही आंतरजिल्हा बदली साठी पात्र असलेला शिक्षक टप्पा क्रमांक-२ मध्ये फॉर्म भरू शकणार आहे.*

➡ *ज्या शिक्षकांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेला नव्हता असे शिक्षक आता आपला फॉर्म नव्याने भरतील.परंतु ज्या शिक्षकांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेला आहे अशा शिक्षकांना आपला फॉर्म नव्याने भरावयाची गरज नाही.मागील वर्षी भरलेलाच फॉर्म हा टप्पा क्रमांक-२ साठी ग्राह्य धरण्यात येईल.परंतु मागील वर्षी भरलेल्या फॉर्म मध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल तर ती दुरुस्ती ते करू शकतील.यासाठी टप्पा क्रमांक-१ मध्ये ज्यांची बदली झालेली आहे असे शिक्षक सोडून इतर सर्व शिक्षकांचे फॉर्म दुरुस्ती साठी unverify करून देण्यात आलेले आहेत. या unverify केलेल्या फॉर्म मध्ये काही बदल,दुरुस्ती असेल तर ती करून घेऊन त्यांनी देखील आपला फॉर्म वेरीफाय करून घेणे गरजेचे आहे.*

➡ *जे शिक्षक टप्पा क्रमांक-२ मध्ये फॉर्म भरू शकणार आहेत त्या सर्वांना महत्वाची सूचना अशी आहे की,आपण दुरुस्ती केलेला/नव्याने भरलेला/सिस्टिम द्वारे unverify केलेला परंतु काही बदल न केलेला फॉर्म हा दिलेल्या मुदतीत वेरीफाय करणे अपेक्षित आहे.जे शिक्षक दिलेल्या मुदतीत आपला फॉर्म वेरीफाय करणार नाही त्यांचे फॉर्म दिनांक २१/०२/२०१८ रोजी रात्री ११:५९ वाजता त्यांनी भरलेल्या माहितीच्या आधारे ऑटोवेरीफाय करण्यात येईल याची नोंद घ्यावी.त्यानंतर फॉर्म अपूर्ण होता,फॉर्म Delete करावयाचा राहून गेला,फॉर्म मध्ये दुरुस्ती करावयाची राहून गेली अशा कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही अशा सूचना ग्राम विकास विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत,हे लक्षात घ्यावे.*

                     ➡ *इतर सूचना*

✏  *१) ज्या शिक्षकांना आपण भरलेल्या टप्पा क्रमांक-१ मध्ये भरलेल्या फॉर्म मध्ये काहीही बदल करावयाचा नसेल तर अशा शिक्षक बांधवांनी आपल्या फॉर्म संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.आशा शिक्षक बांधवांनी लॉगिन करून सर्वर वरील अनावश्यक ताण देखील वाढवू नये ही विनंती.जरी आपले फॉर्म unverify केलेले आहेत तरी देखील दिनांक २१/०२/२०१८ रोजी रात्री ११:५९ वाजता जे फॉर्म वेरीफाय केलेले नाहीत असे सर्व फॉर्म वेरीफाय करण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी.*

✏  *२) सर्व शिक्षक बांधवांना महत्वाची सूचना आहे की,आपल्या शाळेच्या लॉगिन चा Udise व Password इतर कोणत्याही व्यक्तीला शेअर करू नये.आपली माहिती आपणच भरावी.जेणेकरून आपल्या माहितीमध्ये कोणतीही इतर व्यक्ती जाणीवपूर्वक बदल करू शकणार नाही.असे घडल्यास यासाठी आपण स्वतःच यासाठी जबाबदार रहाल हे लक्षात घ्यावे.आपला फॉर्म वेरीफाय झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव त्यात बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.*

➡ *ज्या शिक्षकांना टप्पा क्रमांक-२ मध्ये फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मधील Teacher Transfer या टॅब मधील  Inter-District Transfer या बटनावर क्लीक केल्यावर तेथे मॅन्युअल उपलब्ध करून दिलेले आहे त्याचा अभ्यास करावा.*

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        goo.gl/j9nFGk

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in


*****************************************

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११४४*
*दिनांक* : *१४/०२/२०१८*
*प्रदीप भोसले,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,दिनांक १४/०२/२०१८ ते २१/०२/२०१८ या मुदतीत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषद (प्राथमिक) शिक्षक कर्मचाऱ्याची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया-२०१७ मधील दुसरा टप्पा  सुरू करण्यात आलेला आहे,याची नोंद घ्यावी.*

 ➡  *आंतर जिल्हा बदली च्या पहिल्या टप्प्यात ज्या शिक्षकांनी आपले फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यांची बदली प्रणाली द्वारे तयार करण्यात आलेल्या बदली झालेल्या शिक्षक यादीत नाव आलेले नाही फक्त अशाच शिक्षक कर्मचाऱ्याचा समावेश आंतर जिल्हा बदलीच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आलेला आहे हे लक्षात घ्यावे.म्हणजेच आंतर जिल्हा बदली च्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्याही नवीन शिक्षकाला फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली नाही याची नोंद घ्यावी.तसेच मागील वर्षी Draft मोड मध्ये असणाऱ्या फॉर्म चा समावेश आंतरजिल्हा प्रक्रियेत करण्यात आलेला नव्हता,परंतु मा.सचिव साहेबांच्या सूचनेनुसार सदर फॉर्म चा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आलेला आहे.*

 ➡ *आंतरजिल्हा बदली मध्ये ज्या शिक्षकांनी मागील वर्षी फॉर्म भरलेले आहेत परंतु मागील वर्षीच्या बदली प्रक्रियेत त्यांची बदली होऊ शकली नाही अशा सर्व शिक्षकांचे वेरीफाय असलेले फॉर्म पुन्हा एकदा unverify करून देण्यात आलेले आहे.या unverify केलेल्या फॉर्म मध्ये आधी भरलेली माहिती आहे तशीच दाखवण्यात येईल.याचाच अर्थ असा आहे की बदली न झालेल्या सर्व शिक्षकांना आपला आधीच भरून वेरीफाय केलेला फॉर्म unverify केल्यामुळे आपला फॉर्म नव्याने तपासून घेण्याची संधी देण्यात आलेली आहे.या फॉर्म मध्ये काही दुरुस्ती अथवा बदल करावयाचा असल्यास यामध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.*

 ➡ *ज्या शिक्षकांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेला आहे परंतु आता मात्र त्यांना आपला फॉर्म आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमधून Delete करावयाचा असेल तर आता असे शिक्षक आपला फॉर्म Delete करू शकतील अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.*

 ➡ *आपण भरलेल्या फॉर्म मध्ये Teacher Name,Date of Birth, Date Of Joining School,Date Of Joining In Current Zilla Parishad,Caste Catagory,Medium या टॅब मध्ये दिसून येणाऱ्या माहितीमध्ये जर काही बदल अथवा दुरुस्ती करावयाची असेल तर ही दुरुस्ती ट्रान्सफर पोर्टल मधील आपल्या फॉर्म मध्ये न करता स्टाफ पोर्टल मधील आपल्या माहितीमध्ये करून घ्यावी,त्यानंतरच आपण स्टाफ पोर्टल मध्ये केलेली  दुरुस्ती ही ट्रान्सफर पोर्टल मध्ये भरलेल्या फॉर्म मध्ये दिसून येईल.वरील टॅब व्यतिरिक्त इतर माहिती आपण Transfer पोर्टल मधील आपल्या फॉर्म मधूनच दुरुस्त करून घेऊ शकाल हे लक्षात घ्यावे.*

  ➡ *वर नमूद केलेल्या विहित मुदतीतच सर्वांनी आपले फॉर्म तपासून वेरीफाय करावयाचे आहेत.शेवटच्या दिवशी काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे  सर्वर वर लोड येऊन बऱ्याच शिक्षकांचे फॉर्म भरावयाचे अथवा वेरीफाय करावयाचे राहून जाण्याचा अनुभव लक्षात घेता या वर्षी बदली प्रणाली मध्ये एक नवीन बदल केलेला आहे.सिस्टिम द्वारे Unverify करून दिलेले फॉर्म सर्वांनी तपासून पुन्हा एकदा वेरीफाय करावयाचे आहेत.अर्जदार शिक्षकास आपला फॉर्म Delete करावयाचा असेल तर ते आपला फॉर्म Delete देखील करू शकतील.परंतु आपला फॉर्म एकदा Delete केल्यास पुन्हा त्या शिक्षकास या टप्प्यामध्ये आपला फॉर्म भरता येणार नाही ही बाब लक्षात घ्यावी.परंतु दिलेल्या अंतिम मुदतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक २१/०२/२०१८ रोजी रात्री ११:५९ वाजता सिस्टिम मध्ये वेरीफाय असलेल्या फॉर्म सोबत वेरीफाय नसलेले म्हणजेच Draft मोड मध्ये असलेले फॉर्म हे देखील वेरीफाय आहे असे समजून त्यांचा समावेश सुद्धा बदली प्रोसेस मध्ये करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.म्हणजेच जे फॉर्म unverify असतील असे सर्व फॉर्म दिनांक २१/०२/२०१८ रोजी रात्री ११:५९ वाजता सिस्टिम द्वारे Verify करून घेतले जातील.*

  ➡ *ज्या शिक्षकांना पहिल्या टप्प्यात भरलेल्या फॉर्म मध्ये काहीही बदल करावयाचा नसेल व आहे तोच फॉर्म या टप्प्यातही आहे तसाच ठेवावयाचा असेल तर अशा शिक्षकांनी आपल्या फॉर्म संदर्भात काहीही प्रक्रिया केली नाही तरी देखील चालू शकणार आहे हे लक्षात घ्यावे.कारण सध्या त्यांचे फॉर्म Unverify केलेले असले तरीही दिनांक २१/०२/२०१८ रोजी सायं ११:५९ वाजता Unverify असलेले फॉर्म वेरीफाय करून घेतले जाणार आहे.परंतु  ज्या शिक्षकांना आपले फॉर्म delete करावयाचे आहे त्यांनी मात्र आपले फॉर्म खात्रीपूर्वक Delete करावे.अन्यथा त्यांचे फॉर्म बदली प्रक्रियेसाठी वेरीफाय करण्यात येतील व त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपला फॉर्म unverify करून देण्यात येणार नाही  याची नोंद घ्यावी.*

 ➡ *वरील सर्व सूचनेनुसार संबंधित कर्मचाऱ्या ने आपली आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक २ मध्ये आपल्या फॉर्म संदर्भात असलेली कार्यवाही पूर्ण करावी.*

                   👉 *महत्वाचे*

➡ *१) आंतरजिल्हा बदली व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेविषयी whatsapp सारख्या सोशल माध्यमामध्ये चुकीच्या व विसंगत पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसून येत आहे.सर्व शिक्षक बांधवांना विनंती करण्यात येते की,अधिकृत माहितीशिवाय इतर कोणत्याही पोस्ट वा मेसेज वर विश्वास ठेवू नये व अशा पोस्ट इतर ठिकाणी शेअर देखील करू नये.तसेच शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना ह्या योग्य वेळी अधिकृत पत्राद्वारे व राज्यस्तरीय बदली  ग्रुप मध्ये दिल्या जात असल्याने इतर कोणत्याही चुकीच्या व विसंगत माहितीवर विश्वास ठेवू नये.अशा चुकीच्या माहितीमुळे आपल्या बदली प्रक्रियेत काही अडचण निर्माण झाल्यास यासाठी आपण स्वतः जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.*

➡ *२) जिल्हाअंतर्गत प्रक्रिया सन २०१८ देखील पुढील आठवड्यात सुरू होणार असून लवकरच त्यासंदर्भात ग्राम विकास विभागाकडून सूचना देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.जिल्हाअंतर्गत प्रक्रियेविषयी सोशल माध्यमात येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.*

➡ *३) आंतरजिल्हा बदली प्रक्रिया टप्पा क्रमांक २ मध्ये आपल्या फॉर्म संदर्भात कशा प्रकारे कार्यवाही करावी यासंदर्भात काही अडचण असेल तर उद्या या कार्यवाही (प्रोसेस) संदर्भात मॅन्युअल उपलब्ध करून दिले जाणार आहे.ज्या शिक्षकांना या मॅन्युअलची आवश्यकता असेल अशा शिक्षकांनी आपल्या फॉर्म मध्ये दुरुस्ती अथवा बदल यासाठी कृपया उद्या दुपारपर्यंत थांबावे.आपल्या फॉर्म मध्ये दुरुस्ती साठी पुरेसा कालावधी दिलेला असल्याने घाई  गडबडीत फॉर्म update करण्याची कार्यवाही करू नये ही विनंती.आपल्या अभ्यासासाठी मॅन्युअल उपलब्ध झाल्यानंतर सर्व प्रोसेस समजून घेऊनच आपण पुढील कार्यवाही करणे योग्य असेल हे लक्षात घ्यावे.*

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        goo.gl/j9nFGk

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

No comments :

Post a Comment