पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

परिपाठ

     
                     रोजच्या परिपाठाचा क्रम खालीलप्रमाणे असेल.
1) राष्ट्रगीत
 2) प्रतिज्ञा
3) संविधान
4) श्लोक
5) प्रार्थना
6) पंचांग
7) बोधकथा
8) सामान्यज्ञान -2 प्रश्न व अर्थ/इतिहासासह स्पष्टीकरण (शिक्षकाद्‌वारा)
9) भाषा व इंग्रजी - 2 प्रश्न व अर्थ/इतिहासासह स्पष्टीकरण (शिक्षकाद्‌वारा)
10) स्फूर्तीगीत
11) वाढदिवस/विदयार्थी सन्मान इ.
12) भजन
13) पसायदान
14) भस्त्रिका - प्राणायाम,ओंकार व रामध्यान.
******************************************      
           
     शालेय परिपाठ
प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी ५-६ विद्यार्थ्यांचे इयत्तेनुसार गट करावेत.त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकांची जबाबदारी देऊन. आठवड्यातील ६ वार वर्गवार विभागून द्यावेत.
उदा. सोमवार-  3 री
मंगळवार-4 थी असे...
आपणास परिपाठ ३०मिनीटे वेळ असल्याने पुढील प्रमाणे परिपाठ घावा.
1. सावधान- विश्राम आदेश
संचालन करणा-या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.
2. राष्ट्रगीत
सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.शक्य झाल्यास साउंडद्वारे राष्ट्रगीत घ्यावे.
3.प्रतिज्ञा
आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिस-या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी. किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही सादर करता येईल.
(विद्यार्थ्यांचा स्तर पाहून बदल करता येईल.
4. भारताचे संविधान
परिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील. याही ठिकाणी शक्य असल्यास इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून संविधान घेता येईल.
5. प्रार्थना व श्लोक
ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे. प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत, ज्यातून मानवता, दया, त्याग अशा गुणांची रुजवण होईल अशा असाव्यात.
6. आजचा दिवस
केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो, कोणता वार आणि कोणती तारीख आहे.
7. सुविचार
एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
8. दिनविशेष
चला जाणून घेऊया, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले ते सांगत आहे-----.(विद्यार्थ्याचे नाव)
9.आजची म्हण व वाक्यप्रचार-
कमी श्ब्दात जास्त अर्थ सांगणारी आजची म्हण घेऊन येत आहे----(विद्यार्थ्याचे नाव)
त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा व त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची संधी समोर उपस्थित विद्यार्थ्यांना द्यावी.
10.बातमीपत्र-
जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते अशाच आजच्या बातम्या घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
11. समूहगीत/देशभक्तीपर गीत-
आठवड्यातील ६ दिवस वेगवेगळी गीते घ्यावीत. त्यात एखादे स्फुर्तीगीतही असावे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे.
12. बोधकथा
आजची बोधकथा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे. सुंदर व वाचनीय बोधकथा खालील ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
13. प्रश्नमंजुषा
आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारले तर चांगले.)
13.वैज्ञानिक दृष्टिकोन-
समाजात अनेक समज-गैरसमज असतात. त्यामूळे अंधश्रद्धा पसरतात, म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.
(शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)
15.इंग्रजी शब्दार्थ
आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)
16.दिनांक तो पाढे-
 आजचा पाढा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( प्रतिदिन २ ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)
17. आजचे वाढदिवस
स्वतःचा जन्मदिवस स्वतःसाठी खिस असतो. तर असे आजचा दिवस खास बनवणारे आहेत---
वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थी/शिक्षकांचे नाव घ्यावे व फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.
18. पसायदान
बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.
19.मौन
२ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.
20. विसर्जन
विद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे
******************************************
   
         ०१ } शाळासफाई
०२ } वृक्ष संगोपन
०३ } राष्‍ट्रगीत
०४ } प्रतिज्ञा
०५ } संविधान
०६ } पंचाग
०७ } दिनविशेष
०८ } व्‍यक्तिविशेष
०९ } बातम्या
१० } सुविचार
११ } सामान्‍य ज्ञान
१२ } बोधकथा
१३ } बातम्‍या
१४ } प्रश्नमंजूषा
१५ } जो दिनांक तो पाढा
१६ } प्रार्थना
१७ } पसायदान
१८ } मौन

No comments :

Post a Comment