पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday 6 November 2017

७ नोव्हेंबर २०१७* *डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन*

सोळा तास करुनी अभ्यास
घडविला इतिहास भिमरांवानी
विद्यार्थी बनूनी क्रांती केली समाजाची
प्रकाशमय ज्ञानज्योती उजळल्या मातृभूमीसाठी
       





*भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्र शासनाने 'विद्यार्थी दिन'म्हणून घोषित केला आहे त्यानिमित्य विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा*
*भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
बी. ए., एम.ए, पी. एच. डी., एम. एस. सि., बॅरिस्टर  at लॉ,डी.एस.सि., एल. एल. डी., डी. लिट.*
*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*डॉ बाबासाहेब आंबेडकर आजन्म विदयार्थी होते*
*जगातील प्रज्ञावान आज्ञाकारी, व स्वंयशिस्त विद्यार्थी*
*कोलंबिया विद्यापीठाच्या 300 वर्षाच्या इतिहासात सर्वात हुशार विद्यार्थी*
*लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीक्सचे गुणवंत विद्यार्थी*
*त्यांना अपेक्षित विद्यार्थी हा प्रज्ञावान, शीलवान, करुणामय असावा।*
*सर्वाना विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
📘📘📘📘📘📘📘



✍-           
*आज ७ नोव्हेंबर २०१७*
*डाॅ.  बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन*

अर्थात

*विद्यार्थी दिवस*

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन राज्यातील शाळा व महाविद्यालयांत आज  *विद्यार्थी दिवस* म्हणून साजरा होत आहे, ही एक ऐतिहासिक महत्वाची बाब म्हणावी लागेल. 
                ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा हायस्कूलमध्ये ( राजवाडा चौकातील सध्याचे श्रीमंत छ. प्रतापसिंह राजे   हायस्कूलमध्ये ) प्रवेश झाला. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचे नाव  भिवा असे होते .या शाळेच्या रजिस्टरला १९१४ या क्रमांकावर बाल भिवाची स्वाक्षरी असून हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा  प्रशासनाने जपून ठेवला आहे.
                     डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे.  कारण बाबासाहेबांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित व प्रज्ञावंत तर झालेच, परंतु  कोट्यवधी दलितांचे व वंचितांचे उद्धारकर्तेही झाले.
                       शिक्षणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व बाबासाहेबांनी पुरेपूर जाणले होते. केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि खर्या अर्थाने सर्वांगीण उन्नती होते याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच बाबासाहेबांनी *शिका* हा संदेश दिला.हा संदेश केवळ आपल्याच समाजाला दिला असे नव्हे तर जो जो समाज शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित आहे, त्या सर्वच समाजाने शिक्षणाचा ध्यास घेऊन ज्ञानी बनावे, प्रज्ञावंत बनावे हा मुख्य उद्देश होता.
                      *शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय रहाणार नाही* असे डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. बाबासाहेब आजन्म विद्यार्थी म्हणूनच जगले. विद्येचा वसा त्यांनी  शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या या विद्वत्तेमूळे जगातील सर्वात मोठे संविधान २ वर्षे ११ महिने १८ दिवस या अल्पकालावधीत पूर्ण करून देशाला बहाल केले व राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.
                   स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये समाजात त्यांच्या मुळेच रुजू शकली. त्यांचा शाळा प्रवेश एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक घटना ठरली. *त्या प्रवेशाला आज ७नोव्हेंबरला ११७ वर्ष पूर्ण होत आहेत.*
                    आजच्या पिढीतील प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे उज्वल आणि दैदीप्यमान भविष्य आहे. शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे. बाबासाहेबांनी  अठरा   - अठरा तास अभ्यास केला. कठोर परिश्रम घेतले.त्यांच्या मेहनतीची जाण विद्यार्थ्यांना व्हावी व ते एक आदर्श विद्यार्थी बनावेत या हेतुने  *७नोव्हेंबर  हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.*🙏🌹🌹🌹🌹🙏🙏


---------------------------------------------------------------------

No comments :

Post a Comment