पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday, 5 November 2017

सरल महत्वाचे* : *सूचना क्रमांक* : *११३४* *दिनांक* : ०४/११/२०१७*

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११३४*
*दिनांक* : ०४/११/२०१७*
*प्रदीप भोसले,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

*सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,जिल्हाअंतर्गत बदली मध्ये शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया आज पूर्ण झालेली असून शिक्षकांच्या बदलीच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत.त्याप्रमाणे बदलीचे आदेश लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून दिले जाणार आहेत.तत्पूर्वी मा.श्री.असिम गुप्ता साहेब,सचिव,ग्रामविकास मंत्रालय,महाराष्ट्र यांच्या सूचनेनुसार कोणत्याही शिक्षकावर अन्याय होऊन त्यांच्या अधिकारावर गदा येऊ नये व सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी या याद्यामध्ये बदली न झालेल्या शिक्षकांची बदली का झालेली नाही,त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांना शाळा का मिळाली नाही हे तपासण्याच्या सूचना आपल्या जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.यासाठी आपल्या जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना NIC, पुणे येथे सदर याद्या व माहिती वेरीफाय करण्यासाठी बोलवण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी*.
*बदली प्रक्रिया ही अधिकाधिक अचूक व पारदर्शी करण्यासाठी मा.सचिव साहेबांनी सर्वांच्या हिताचा हा निर्णय घेतलेला आहे हे लक्षात घ्यावे.सदर याद्या तपासून झाल्यानंतर लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवर बदलीचे आदेश उपलब्ध करून दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

No comments :

Post a Comment