पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Saturday, 4 November 2017

विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर -सम्पूर्ण माहिती

विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर -सम्पूर्ण माहिती

विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर -सम्पूर्ण माहिती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील परिपत्रक काढले आहे.

‘विद्यार्थी दिवस’ उपक्रमाअंतर्गत सर्व शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि काव्यवाचन आदी उपक्रम आयो​जित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. त्यांच्या शाळाप्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधी दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. त्यांच्या संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्या रजिस्टरला ‘१९१४’ या क्रमांकासमोर आजही त्यांची स्वाक्षरी असून, हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे.
*****************************************

भीम मराठी



डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर, १९५६) हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूरमंत्री, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक, स्वतंत्र्य भारताचे पहिले ‘कायदा मंत्री’ आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ते बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘बाबासाहेब’ चा अर्थ ‘पिता’ किंवा 'वडील' असा आहे. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचे अनुयायी त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, धूरंधर, यूगधंर, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे. जगभरातील आंबेडकरवादी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी जय भीम हा शब्द आदराने व अभिमानाने उच्चारतात. ‘जय’ चा अर्थ ‘विजय’, ‘भीम’ चा अर्थ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ’ आणि ‘जयभीम’ या संयुक्त शब्दाचा अर्थ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ असा आहे. ‘जयभीम’ या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी असलेल्या एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर१९४१ पासून स्वत: बाबासाहेब ‘‘जय भीम’’ लिहू लागले आणि अभिवादन म्हणूनही जयभीम वापरू लागले तसेच अभिवादनाच्या उत्तरातही ते जयभीम वापरू लागले. आधुनिक भारतातील प्रथम समतावादी पुरूष हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.

देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, संस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनिय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते.[१][२][३][४] इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (The Greatest Indian) या भारताच्या आंतराराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर १ महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्याऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षांमधील जगातल्या सर्वांत प्रभावशाली १०० विश्वमानवांची यादी प्रकाशित केली, त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रगाढ विद्वता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४ विषयांवर प्रभुत्व (मास्टरी) होते, एवढ्या साऱ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत, असे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापिठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापिठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे भारतीय बौद्धांसाठी डॉ. आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत, हि बौद्ध धर्मातील सर्वोच्छ उपाधी त्यांना नेपाळमध्ये इ.स. १९५४ मध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषद मधिल आलेल्या बौद्ध भिक्खुंनी प्रदान केली होती. त्यानंतर इ.स. १९५५ मध्ये दलाई लामा बाबासाहेबांना भेटले तेव्हा लामांनी त्यांना बोधिसत्व संबोधले होते. जातिव्यवस्थेविरूद्ध प्रखर संघर्ष, महान भारतीय संविधान निर्माण अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यवधी शोषित, पिडीत, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती सुद्धा जगातल्या ६५ पेक्षा अधिक देशांत दरवर्षी साजरी केली जाते.

सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळवलेल्या आहेत.
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.

डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.

डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय: 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते. 

शैक्षणिक विचार: 
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. 

सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले: 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.

प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा : 
डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. 

स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारी : 
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.

अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय.

अशा ह्या महानावाचे महापारीवहन  ६ डिसेंबर, १९५६साली झाले .
जय भीम जय भारत 
*********************************************************

डॉ.आंबेडकरांचा जीवनक्रम

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनक्रम :
१.  १४ एप्रिलइ.स.१८९१मध्यप्रदेशातील 'महू' गावी जन्म.
२.  इ.स.१८९६आई, भिमाईचे निधन
३.  ७ नोव्हेंबरइ.स.१९००साताऱ्याच्या सरकारी शाळेत (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) प्रवेश
४.  नोव्हेंबरइ.स.१९०४इयत्ता ४ थी उतीर्ण.डिसेंबरइ.स. १९०४एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश
५.  एप्रिलइ.स.१९०६९ वर्षीय रमाबाई यांच्याशी विवाह.
६.  इ.स.१९०७मॅट्रिक परीक्षा, ७५० पैकी ३८२ गुणांनी पास केली. (तेव्हाचे हे प्रचंड गुण होते) केळुस्कर     
     गुरूजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" हे पुस्तक भेट.
७. ३ जानेवारीइ.स.१९०८एलफिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई विद्यापीठ) प्रवेशइ.स. १९०८‘‘भगवान   
     बुद्धांचे चरित्र’’ हे पुस्तक वाचून बौद्ध धर्माकडे पहिल्यांदा आकर्षीत
८.  ८ एप्रिलइ.स.१९०८रमाबाईंशी विवाह.
९.  १२ डिसेंबरइ.स.१९१२मुलगा यशवंत यांचा जन्म झाला.
१०. जानेवारीइ.स.१९१३बी.ए. ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. (पर्शियन आणि इंग्रजी हे   
      विषय)२ फेब्रुवारीइ.स. १९१३ वडील रामजी आंबेडकर यांचे निधन
११. एप्रिलइ.स.१९१३ बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी 
      बाबासाहेबांची निवड केली २० जुलैइ.स. १९१३न्यूयार्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये   
      प्रवेशइ.स. १९१४अमेरीकेत लाला लजपतराय यांचेशी भेट
१२. २ जूनइ.स.१९१५“प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून एम.ए. ची पदवी मिळवली. प्रमुख विषय 
      अर्थशास्त्र होता समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र व राज्यशास्त्र हे अन्य   
      विषय
१३. जूनइ.स.१९१६डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया –अ हिस्टॉरिकल अँन्ड 
      ॲनॅलिटिकल स्टडी “ हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठ ने स्वीकारून पीएच.डी. पदवी प्रदान केली व पुढे        ते लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.९ मेइ.स. १९१९प्रा. गोल्डनवाईजर यांच्या     
      मानववंशशास्त्र सेमिनार मध्ये कास्ट इन इंडिया हा वैचारिक प्रबंध वाचला
१४.  ऑक्टोबरइ.स.१९१६अर्थशास्त्रच्या अभ्यासासाठी डॉ. आंबेडकरांना “लंडन स्कूल ऑफ     
       इकॉनॉमिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्स” या संस्थेत प्रवेश मिळाला.११ नोव्हेंबरइ.स.    
      १९१६कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश.
१५.   जून इ.स.१९१७ लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले,         कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
१६.  सप्टेंबरइ.स.१९१७बडोदा संस्थानाला    
      दिलेल्या हमीपत्रानुसार त्या राज्याची सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले.
१७.  इ.स.१९१८साऊथ बॅरो   
      कमिशनपुढे साक्ष
१८.  १० नोव्हेंबरइ.स.१९१८मुंबईतील सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय       अर्थशास्ञ).१६ जानेवारीइ.स. १९१९‘महार’ या टोपन नावाने दि टाईम्स ऑफ इंडिया मध्ये लिखान,          “स्वराज्य जेवढा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध हक्क आहे तेवढाच दलितांचा ही आहे”
१९.  ३१ जानेवारीइ.स. १९२०साप्ताहिक मूकनायक सुरू केले
२०.  मार्च २१इ.स.१९२०माणगाव, कोल्हापूर राज्य येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या        
      अस्पृश्य परिषदेत भाषण२१.मेइ.स.१९२०शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या   
     अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले.५ जुलैइ.स. १९२०उच्च 
     शिक्षणासाठी लंडनला प्रयाणइ.स. १९२०बर्टाड रसेल यांनी “प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन” 
      या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित केले.एप्रिल१९
२१  “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व” या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.
२२.  जूनइ.स.१९२१लंडन विद्यापीठाने त्यांना “प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया” या प्रबंधाला एम.एस्सी. (अर्थशास्त्र) ही पदवी प्रदान केली.एप्रिलइ.स. १९२२उच्च शिक्षणासाठी जर्मनीतीलबॉन विद्यापीठामध्ये गेले.२८ जूनइ.स. १९२२ग्रेज इन विद्यापीठाने बार-ॲट-लॉ (बॅरिस्टर ॲट लॉ) पदवी प्रदान केली.
२३.  ऑक्टोंबरइ.स.१९२२लंडन विद्यापीठात “दी प्रोब्लेम ऑफ रुपी” हा डी.एससी प्रबंध सादर केला .
२४.  एप्रिलइ.स.१९२३जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन पूर्ण केले व भारतात परतले.
२५.  ऑगस्ट ४इ.स.१९२३बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने एस. के.बोले यांनी मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.नोव्हेंबरइ.स. १९२३लंडन विद्यापीठाने डी.एससी. प्रदान केली.
२६.  जुलै २०इ.स.१९२४मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका बैठकीत बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.४ जानेवारीइ.स. १९२५उच्च शाळांत शिकणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापुरमध्ये वसतिगृह सुरु केले.१५ डिसेंबरइ.स. १९२५हिल्ट यंग च्या अध्यक्षेसाठी आलेल्या रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.डिसेंबरइ.स. १९२५
२७.  जानेवारीइ.स.१९२७मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलवर नियुक्ती केली.१ जानेवारीइ.स. १९२७भिमा कोरेगांवच्या विजय स्तंभाला भेट दिली. महार सैनिकांना वंदन केले.
२८.  २० मार्चइ.स.१९२७महाड सत्याग्रह
२९.  एप्रिल ३इ.स.१९२७बहिष्कृत भारत नावाचे मराठी पाक्षिक सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली.३ मेइ.स. १९२७कल्याण जवळील बदलापुर गावांत
३०.  ऑगस्ट ४इ.स.१९२७महाड नगरपालिकेने इ.स.१९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.
३१.  सप्टेंबरइ.स.१९२७समाज समता संघ स्थापन केला.
३२.  ऑगस्टइ.स.१९२८बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला एक मागण्याचा खलिता सादर केला व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.
३३.  ३ मार्चइ.स. १९३०नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरु राहिले.
३४.  १७ ते २१ नोव्हेंबरइ.स.१९३०लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर केला.
३५  ऑगस्ट १४इ.स.१९३१मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट.
३६.  २० ऑगस्टइ.स.१९३२भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला. ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.
३७.  २४ सप्टेंबरइ.स.१९३२पुणे करारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली.
३८.  इ.स.१९३४परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
३९.  मे २६इ.स.१९३५रमाई यांचे निधन
४०. जून १इ.स.१९३५डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या प्राचार्य पदी नेमणूक.
४१  ऑक्टोबर १३इ.स.१९३५येवला, येथे धर्मांतराची घोषणा
४२  ऑगस्टइ.स.१९३६“स्वतंत्र मजूर पक्ष” नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
४३  मार्च १८इ.स.१९३७मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या,दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल अस्पृशांच्या बाजूने दिला.
४४  डिसेंबरइ.स.१९४०थॉट्स आॅन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
४५  जुलै १८इ.स.१९४२आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची नागपूर येथे स्थापना.
४६  जुलै २०इ.स.१९४२व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडलावर मजूर खात्याच्या मंत्री म्हणून नेमणूक.
४७  जूनइ.स.१९४५“व्हॉट काँग्रेस ॲन्ड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल” या ग्रंथाचे प्रकाशन
४८  जून २०इ.स.१९४५डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत दी पीपल्स एजुकेशन सोसायटी तर्फे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
४९  ऑक्टोबरइ.स.१९४६“हू वेअर दी शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. डॉ.आंबेडकर बंगालमधून घटनासमितीवर निवडून गेले.
५०  ऑगस्ट २९इ.स.१९४७स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी नियुक्ती
५१  फेब्रुवारीइ.स.१९४८घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण.
५२  एप्रिल १५इ.स.१९४८डॉ.शारदा कबीर यांच्याशी नवी दिल्ली येथे विवाह.
५३  नोव्हेंबर ४इ.स.१९४८डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.
५४  सप्टेंबर १इ.स.१९५०मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसवण्यात आली.
५५  फेब्रुवारी ५इ.स.१९५१भारतीय संसदेपुढे हिंदू कोड बील मांडले.
५६  जुलैइ.स.१९५१भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
५७  सप्टेंबर २७इ.स.१९५१मंत्रीमंडळातील पदाचा राजीनामा, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड.
५८  जून ५इ.स.१९५२कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ(एल एल डी) ही पदवी प्रदान केली.
५९  जानेवारी १२इ.स.१९५३हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर(डी.लिट) ही पदवी प्रदान केली .
६०  डिसेंबरइ.स.१९५४ब्रम्हदेशातील रंगून येथे भरलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभाग.
६१  मेइ.स.१९५६बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक सुरु केले
६२  जूनइ.स.१९५६पीपल्स एजुकेशन सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरु केले.
६३  ऑक्टोबर १४इ.स.१९५६नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या कडून बौद्ध धम्म दीक्षा;बौद्ध धम्म स्विकार केला.
६४  ऑक्टोबर १५इ.स.१९५६डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा दिली.
६५  नोव्हेंबरइ.स.१९५६नेपाल येथील काठमांडू येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला.तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले.
६६  डिसेंबर ६इ.स.१९५६नवी दिल्ली येथे अलीपूर रोड निवास्थानी डॉ.आंबेडकरांचे महापरिनिर्वाण 


No comments :

Post a Comment