पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday 12 November 2017

बालदिन

 

जन्म : १४ नोवेंबर १८८९ (अलाहाबाद)

मूत्यू  : २७ मे १९६४

नाव   : पंडित जवाहरलाल नेहरू



महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावली प्रमाणे उभे राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देश्याच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी त्यांनी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात लखनौला लाठीमार सहन केला. ते त्यांच्या निर्णयाला शेवट पर्यंत चिकटून राहिले. निस्सीम देशभक्तिमुले ते १९२९ च्या कॉंग्रेस चे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ ला भारताला स्वतंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान झाले. १७ वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वताला या कार्यात झोकून दिले.

भवितव्यासाठी त्यांनी स्वताला या कार्यात झोकून दिले. 

           देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन, ” पंचशील” हि लाख मोलाची देणगी जगाला दिली. “शांतीदूत” हि पदवी बहाल करून त्यांना सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करीत असत. लहान मुले त्यांना खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत हि जाणीव त्यांच्या ठायी होती. २७ मे १९६४ रोजी या थोर नेत्याने या जगाचा निरोप घेतला व आकाशातील ताऱ्यामधून एक तेजस्वी तारा निखळला. 
 
    हिंदी माहिती 
भारत के प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू इंग्लैण्ड गए वहा उनकी मुलाकात ब्रिटेन के पूर्व प्रधानमंत्री चर्चिल से हुई.पिछली बातो को याद कर चर्चिल ने पूछा-आपने अंग्रेजो के शासन में कितने वर्ष जेल में बिताये थे? तब नेहरू जी ने कहा-लगभग 10 वर्ष.तब अपने साथ किये गए व्यवहार के लिए आपको हमसे घृणा करनी चाहिए-चर्चिल ने सवालियां अंदाज में पूछा. नेहरू जी ने उत्तर दिया-बात ऐसी नहीं है.

हमने ऐसे नेता के साथ काम किया है जिसने हमें दो बातें सिखायी है- एक तो यह की किसी से डरो मत और दूसरी,किसी से घृणा मत करो. हम उस समय आपसे डरते नहीं थे, इसलिए अब घृणा भी नहीं करते.

पंडित जवाहरलाल नेहरू एक कुशल राजनीतिज्ञ के साथ-साथ उच्च कोटि के विचारक भी थे. उनकी राजनीति स्वच्छ और सोहार्दपूर्ण थी. स्वतंत्रता संग्राम के समय उन्होंने जेल में रहकर अनेक पुस्तको की रचनाये की. ‘मेरी कहानी,विश्व इतिहास की झलक,भारत की खोज’ उनकी प्रसिद्ध रचनाएँ थी.राजनीति और प्रशासन की समस्याओ से घिरे रहने के बावजूद वे खेल,संगीत,कला आदि के लिए समय निकल लेते थे.बच्चो के तो वे अति प्रिय थे.आज भी वे बच्चो के बीच ‘चाचा नेहरू’ के नाम से लोकप्रिय है.उनके जन्मदिन 14 नवम्बर को हमारा देश ‘बाल दिवस’ के रूप में मनाता है.
पंडित जवाहरलाल नेहरू का जन्म इलाहाबाद में 14 नवम्बर सन 1889 को हुआ.इनके पिता मोतीलाल नेहरू प्रसिद्ध वकील थे.माता स्वरूपरानी उदार विचारो वाली महिला थी.नेहरू जी की आरम्भिक शिक्षा घर पर ही हुई.अपने शिक्षको में एक एफ.टी.ब्रुम्स के सानिध्य में रहकर जहाँ इन्होने अंग्रेजी साहित्य और विज्ञान का ज्ञान प्राप्त किया वही मुंशी मुबारक अली ने इनके मन में इतिहास और स्वतंत्रता संग्राम के प्रति जिज्ञासा पैदा कर दी.यही कारण है की उनके मन में बचपन से ही दासता के प्रति विद्रोह की भावना भर उठी.

उच्च शिक्षा के लिए नेहरू जी को विलायत (इंग्लैंड) भेजा गया.वहां रहकर उन्होंने अनेक पुस्तकों का गहन अध्ययन किया.वकालत की शिक्षा पूरी करने के बाद वे भारत लौट आये और इलाहबाद हाईकोर्ट में वकालत करने लगे पर वकालत में उनका मन नहीं लगा.उनके मन में तो देश को स्वतंत्र कराने की इच्छा बलवती हो रही थी.इसी समय उनकी भेंट महात्मा गाँधी से हुई.इस मुलाकात से उनकी जीवन-धारा ही बदल गयी.

उस समय देश में जगह-जगह अंग्रेजो का विरोध लोग अपने-अपने तरीको से कर रहे थे.1919 में जलियांवाला बाग में अंग्रेज अफसर जनरल डायर द्वारा स्वतंत्रता सेनानियों की नृशंस हत्या की गयी.इससे पूरे देश में क्रोध की ज्वाला धधक उठी.1920 में गांधीजी द्वारा असहयोग आन्दोलन चलाया गया.पंडित जवाहरलाल नेहरू भी पूर्ण मनोयोग से स्वंतन्त्रता संग्राम में कूद पड़े.
सन 1921 में इंग्लैण्ड के राजकुमार ‘प्रिन्स ऑफ़ वेल्स’ के भारत आने पर अंग्रेज शासको द्वारा राजकुमार के स्वागत का व्यापक स्तर पर विरोध किया गया.इलाहाबाद में विरोध का नेतृत्व पंडित नेहरू को सौपा गया.इनके साथ पिता मोतीलाल नेहरू भी थे.दोनों को गिरफ्तार कर लिया गया.यह जवाहर की प्रथम जेल यात्रा थी.इसके बाद उन्हें नौ बार जेल यात्रा करनी पड़ी,किन्तु वे विचलित नहीं हुए.
लम्बे संघर्ष के बाद अंततः 15 अगस्त 1947 को देश आजाद हुआ.पंडित जवाहरलाल नेहरू स्वतन्त्र भारत के प्रथम प्रधानमंत्री बने.लम्बी अवधि की परतन्त्रता के बाद देश के आर्थिक हालत अत्यंत जर्जर हो चुकी थी.अपनी दूरदर्शिता और कर्मठता से नेहरू ने कृषि और उद्योगों के विकास हेतू पंचवर्षीय योजनाओ की आधारशिला रखी.
आज देश में जो बड़े-बड़े कारखाने,वैज्ञानिक प्रयोगशालाएं और विशाल बांध आदि दिखाई पड़ते है,इन्ही पंचवर्षीय योजनाओ की देन है.भाखड़ा नांगल बांध को देखकर नेहरू जी ने कहा था-

मनुष्य का सबसे बड़ा तीर्थ,मंदिर,मस्जिद और गुरुद्वारा वही है,जहाँ इन्सान की भलाई के लिए काम होता है.

नेहरू जी ने देश के चहुंमुखी विकास हेतू अनेक कार्य किये वे जानते थे की बिना अणुशक्ति के देश शक्ति संपन्न नहीं हो सकता.अतः उन्होंने परमाणु आयोग की स्थापना की.वे परमाणु ऊर्जा को सदैव विकास के कार्यो में लगाने के पक्षधर थे.ट्राम्बे के परमाणु संस्थान में उन्होंने एक बार कहा था-
चाहे जो भी हो,हम किसी भी हालत में अणुशक्ति का प्रयोग विनाशकारी कार्यो के लिए नहीं करेंगे.

पंडित जवाहरलाल नेहरू बिना थके प्रतिदिन 18 से 20 घंटे कार्य करते थे.महान कवि राबर्ट फ्रॉस्ट की निम्नलिखित पंक्तियाँ उनका आदर्श थी-
वन है सुन्दर और सघन पर मुझको वचन निभाना है 
                                             नींद सताए इसके पहले कोसों जाना है,
                                                  मुझको कोसों जाना है.

नेहरू जी ने अपने जीवन का प्रत्येक क्षण देश सेवा में लगाया.वे स्वतन्त्रता संग्राम में देश के लिए लड़े 





 पंडित जवाहरलाल नेहरू❒*  

    
         भारताचे १ ले पंतप्रधान
               ◆ कार्यकाळ ◆
(१५ ऑगस्ट १९४७ – २७ मे १९६४)

🔹जन्म  :~ १४ नोव्हेंबर १८८९
     अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
🔸मृत्यू  :~ २७ मे १९६४
           नवी दिल्ली, भारत
🔹पत्नी  :~ कमला नेहरू
🔸अपत्ये  :~ इंदिरा गांधी
🔹व्यवसाय :~  बॅरिस्टर

                     ♦ जवाहरलाल नेहरू
      हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात.

                  ● राजकीय आयुष्य ●
   🔷जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.

    🔶१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.

   🔷 सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.

  🔶१९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

बाल दिवस १४ नोव्हेंबर - संपूर्ण माहिती

बाल दिवस 14 नोव्हेंबर 2017

मुलांचे हक्क, काळजी आणि शिक्षण याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन दरवर्षी साजरा केला जातो.मुले देशाच्या यश आणि विकासाची गुरुकिल्ली आहे कारण ते आपल्या देशाला नवीन आणि तांत्रिकदृष्ट्या नेतृत्व करतील. ते मौल्यवान मोत्यांप्रमाणे चमकदार आणि आकर्षक आहेत.पालकांना इशावाराद्वारे दिलेली भेटवस्तू आहेत . मुले ही निर्दोष, प्रशंसनीय, शुद्ध आणि प्रेमळ असतात.14 नोव्हेंबर (पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वाढदिवस) संपूर्ण भारताला बालदिन म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जन्म 14 नोव्हेंबर रोजी झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच ते पंतप्रधान बनले. दर वर्षी बालदिन साजरा केला जातो, कारण पालकामध्ये या दिवसाची जाणीव राहावी.



➤ बालक  दिवस का साजरा केला जातो ?

बाल दिवस हा पंडित जवाहरलाल नेहरू या महान व्यक्तीच्या जन्म दिवसाच्या रुपात साजरा केला जातो.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी तरुणांच्या कल्याणाकरिता अतिशय उत्तम काम केले.त्यांनी भारतातील मुलांचे शिक्षण, प्रगती आणि कल्याणासाठी भरपूर काम केले.ते मुलांबद्दल खूप प्रेमळ होते आणि त्यांच्यातच चाचा नेहरू म्हणून प्रसिद्ध झाले.भारतातील तरुणांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी भारतीय शैक्षणिक संस्था इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना केली होती.त्यांनी पंच व वार्षिक योजना तयार केली ज्यात भारतात कुपोषणापासून संरक्षण करण्यासाठी मोफत प्राथमिक शिक्षण, शाळेत मुलांसाठी दूध, मोफत अन्न यांचा समावेश होता. बालकाचा चाचा नेहरूंसाठी प्रेम आणि आवड बघता त्यांचा जन्मदिन म्हणून बालक दिन म्हणून साजरा केला जातो.भविष्यकाळात राष्ट्राची संपत्ती म्हणून यशस्वी होण्यासाठी, प्रत्येकाच्या जीवनात बालपण हा एक महत्वाचा क्षण आहे, बालपण योग्य मार्गावर जाण्याची आवश्यकता असते. अयोग्य दिशेने चांगले आयुष्य गमावू शकतो. हे केवळ शिक्षण, काळजी आणि प्रगतीसाठी योग्य मार्ग देऊनच करता येते.

➤पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल थोडे

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे महान नेते होते आणि 1 9 47 मध्ये भारत स्वतंत्रतेनंतर तत्कालीन पंतप्रधान म्हणून भारताचे नेतृत्व करत होता. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 188 9 रोजी झाला, प्रसिद्ध वकील मोतीलाल नेहरू आणि अलाहाबादच्या रक्षा राणीचा जन्म झाला. अतिशय प्रतिभाशाली असल्याने, त्यांचे नाव जवाहरलाल ठेवण्यात आले होते.त्यांनी नंतरचे शिक्षण इंग्लंड येथून केले आणि भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीयांना मदत करायला सुरुवात केली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले. ते एक महान कवी होते. त्यांच्या काही प्रसिद्ध लेखांमध्ये 'विश्व इतिहासची झलक', 'भारतीय शोध' इत्यादी आहेत.गुलाबांची फुले त्यांना मुलांप्रमाणे आवडते असे,ते म्हणतात की मुले उद्यानचे कोठार आहेत. ते असेही म्हणत असत की मुले भविष्यात विकसित होणाऱ्या समाजाची निर्मिती करतील कारण ती देशातील मूळ ताकद असतात. 
बाल दिवस कसा साजरा करावा -


  • मुलांना भेटी आणि चॉकोलेट वितरित करा
  • विविध स्पर्धा जसे की: फॅन्सी ड्रेस, वादविवाद, स्वातंत्र्यसैनिक, देश, कथा आणि प्रश्नोत्तर स्पर्धांसंबंधीचे भाषण.
  • मनोरंजन, गायन, नृत्य आणि इतर संगीत वादन यांसारख्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाद्वारे आयोजित केले जाते.
  • अनाथ मुलांना संगीत वाद्ययंत्र, स्टेशनरी, पुस्तके, कपडे आणि खेळणी वितरीत करून मनोरंजन करता येते.
  • स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित काही कार्यक्रमांचे आयोजन करू शकता.
  • कोडी, मिष्टान्न आणि चीनी खजिना शोधा शोध इत्यादि काही क्रिडा उपक्रमांचे आयोजन करू शकता.
  • प्रतिकूल परिस्थितीतील मुलांनासाठी सुप्रसिद्ध संगीतकार,आरोग्यविषयक कार्यक्रम आणि आरोग्य, संगोपन आणि मुलांच्या प्रगती  भाषण आयोजित केले जाऊ शकतात. 
  •     

    पंडीत जवाहरलाल नेहरू

    *🌸पंडीत जवाहरलाल नेहरू🌸*

     हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात.

    *🌸वैयक्तिक आयुष्य🌸*

    श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्‍नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.

    *🌸राजकीय आयुष्य🌸*

    जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.

    १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
    सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.

    १९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

    *🔹नेहरूंनी लिहिलेली🔹*

    आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - ना.ग. गोरे)
    इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)

    भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - साने गुरुजी)

    *🔹नेहरूंवर लिहिली गेलेली पुस्तके🔹*

    अग्निदिव्य : कमला नेहरू (धनंजय राजे)

    आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. डी.डी. पाटील, प्रा. ए.आर. पाटील)

    आपले नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - साने गुरुजी)

    गोष्टीरूप जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - श्यामकांत कुलकर्णी)

    जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे)

    नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक)

    नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - करुणा गोखले)
    नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद)

    पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. नीला पांढरे)
    पंडित जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - राजा मंगळवेढेकर)

    पंडित जवाहरलाल नेहरू : व्यक्ती आणि कार्य (महाराष्ट्र सरकार)

No comments :

Post a Comment