UDISE Plus Online Computerized Guide2022- 2023
**********************,*************
मराठी Data capture pdf
***
Udise Guidance pdf download below
Click
UDISE Plus Online Computerized Guide
सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती सन २०२२-२३ यु - डायस प्लस ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना
( https://udiseplus.gov.in/ )
संदर्भ : स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय , भारत सरकार यांचे पत्र क्र . D.O.No.२३-७ / २०२२- Stats दि . ३० ऑगस्ट , २०२२ .
भारत सरकारकडून संदर्भिय पत्राद्वारे राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती यु - डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे . यु - डायस प्लस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० , राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक ( PGI ) , National Achievement Sur नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे .
School Education Qulity Index ( SEQI ) निर्देशांकांची प्रभावीपणे अंग 2/3 यु - डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे .
प्रथम टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती ( शाळेचे ठिकाण , व्यवस्थापन , माध्यम , इत्यादी ) शाळा सुरक्षा , अनुदान व खर्च , व्यावसायिक प्रशिक्षण , भौतिक सुविधा , साहित्य उपक्रमे , संगणक आणि नाविन्यपूर्ण डिजीटल उपक्रम , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इत्यादि माहिती संगणकीकृत करण्यात येणार आहे . याकरिता सर्व शाळांना तालुका स्तरावरून Username व Password उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
. दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांचे नाव , वडिलांचे नाव , आईचे नाव , मोबाईल नंबर , घराचा पत्ता , वर्ग , जनरल रजिस्टर नंबर , जन्म दिनांक , जात , BPL , दिव्यांगांचे प्रकार , शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा , व्यावसायिक शिक्षण संबंधित माहिती , शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती , आधार संबंधित माहिती , RTE प्रवेश , सहाय्यभूत सुविधा इ . यु - डायस प्लस सॉफ्टवेअरमध्ये शाळास्तरावरून अद्ययावत करण्यात येणार आहे .
दि . १७ ऑक्टोबर , २०२२ पासून यु - डायस प्रणालीमध्ये शाळांची माहिती संगणकीकृत करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय सूचना केंद्र , शालेय शिक्षण मंत्रालय , नवी दिल्ली यांचेकडून प्रणाली सुरू करण्यात आली आहे . सन २०२२-२३ चे यु - डायस प्रपत्राबाबत झालेले बद्दल याबाबत जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांना दि . २० सप्टेंबर , २०२२ रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद , मुंबई कार्यालयामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे .
प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी यु डायस प्लस प्रणालीचे काम करण्याऱ्या अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करून जिल्ह्यातील यु - डायस संबंधित काम करणारे संबंधित गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी , केंद्र प्रमुख , Data entry operator , MIS - Coordinator , सहा . कार्यक्रम अधिकारी , बांधकाम विभागाचे अधिकारी , दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता काम करणारे अधिकारी , मोबाईल शिक्षक , इ . अधिकाऱ्यांचे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात यावे . सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुकास्तरावर याचप्रमाणे तालुक्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांना य - डायस प्लस
प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात यावे . प्रशिक्षणामध्ये माहिती संकलनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे. सदरची माहिती भारत सरकार व राज्य सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणासाठी करणार असल्याने सदरची माहिती अचूक असणे आवश्यक आहे .
भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सर्वांना कळविण्यात येते , की सन २०२२-२३ या वर्षातील सर्व शाळांची माहिती दिनांक १० नोव्हेंबर , २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करून अंतिम माहिती भारत सरकारला वेळेत सादर करण्याकरिता आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे .
सन २०२३ २४ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे व याच माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो ●
No comments :
Post a Comment