*शाळासिध्दी वेबपोर्टल चा अड्रेस बदलला आहे.*
नवीन अड्रेस पुढीलप्रमाणे www.shaalasiddhi.nuepa.org
प्रथम
1) 30 मार्च 2016
2) 3 नोव्हेंबर 2016 KRA
3) 7 जानेवारी 2017 चे
शाळासिध्दी संदर्भातील शासननिर्णय वाचा.
यापूर्वी बर्याच शाळांनी नोंदणी केली आहे. परंतु आता सर्वच शाळांना या नवीन वेब साईटवर जाऊन लॉगिन व्हायला हवे. काही शाळांमध्ये अकौंट डिसेबल असा संदेश पहायला मिळत होता. तो आता दिसणार नाही. कारण येथे पासवर्ड बदलण्याची सोय करून दिली आहे.
🔹1)www shaalasiddhi nuepa.org वर जा.
🔹 2) तेथे प्रथम sse - national university of planning and..... असा result दिसेल तो सोडून दुसर्या क्रमांकाचे shaalasiddhi अशा result वर क्लिक करावे.
🔹3)आता स्क्रीन वर प्रथम होम व शेवटी login अशी आडवी टॅब दिसतात. तर आता login बटणावर क्लिक करा.
🔹 4)समोर 7 रंगाची 7 क्षेत्र दिसतात. तेथे आताच काही करू नका.
🔹5)login वर username च्या जागी शाळेचा udise नंबर टाकून पासवर्ड नवीन घालायचे आहे. या करिता तेथेच खाली New user वर क्लिक करा.
🔹 6)समोर creat user दिसेल. step 1 new user details दिसते.
🔹 7)select user मध्ये school user निवडावे. खाली युडायस नंबर टाकावा. आता मुख्याध्यापक यांचे नाव व मोबाइल नंबर हा संगणक हाताळणारे शिक्षक किंवा शिक्षकेतर यांचा टाकावा. कारण one time password या क्रमांकावर मिळणार आहे. आता त्याखालील generate pin(otp) वर क्लिक करा.
🔹8)आता step 2 create password ही टॅब दिसते. तेथे सूचनेप्रमाणे कार्यवाही करा. डाव्या बाजूला दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून तशी कार्यवाही करा.
🔹9) आपण आता मोबाइलवर आलेला otp टाकून login झालात.
🔹10)आता यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार डाव्या बाजूच्या home, manage user request ला न जाता evaluation start खाली दिलेल्या Learners, teachers, school evaluation composite matrix, मधील 7 क्षेत्रांची स्वयंमुल्यमापन स्टेपनुसार भरावे. Action for continues school improvement plan मध्ये शाब्दिक माहिती भरावी. व submit करावी. तुमचे स्वयंमुल्यमापन पूर्ण झाले.
🔹11) reports टॅबवर क्लिक करून सर्व reports मिळतात त्याची प्रिंट काढून घ्या.
🔹12)आता तुम्ही जर स्वयंमुल्यमापनात 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले असतील तर आपण बाह्यमूल्यमापनासाठी सिद्ध झालात.
*आपल्या सर्व शाळांना शाळासिध्दी यशस्वीतेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.*
No comments :
Post a Comment