पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Friday, 4 August 2017

प्रकल्प कसा असावा व प्रकल्प माहिती

प्रकल्प कसा असावा
प्रकल्प कसा असावा?
शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प
प्रकल्प म्हणजे काय ?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे 
1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी. प्रकल्पकार्य लेखन कसे कराल? प्रकल्पकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्पकार्य लेखन कसे करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे –
( विद्यार्थ्यांसाठी )
1. प्रकल्पाचे नाव (विषयासह) – निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
2. प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
3. प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा.
4. प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखनसाहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.
5. प्रकल्पाची कार्यपद्धती – प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
6. प्रकल्पाचे निवेदन – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
7. प्रकल्पाचे सादरीकरण – संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
8. आकृत्या व चित्रांकनासाठी – येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
( शिक्षकांसाठी )
9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
10. मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा.
शालेय प्रकल्पांसाठी यादी 
1. माहिती संकलन –
थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थोर खेळाडू, थोर समाजसेवक, थोर समाजसेविका इत्यादी.
2. संग्रह –
म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविचार संग्रह, कवितासंग्रह, भावगीत संग्रह, पोवाडा संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह, शंख-शिंपले संग्रह, तिकिटे संग्रह, जुनी नाणी संग्रह इत्यादी.
3. प्रदर्शन –
चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञानप्रकल्प प्रदर्शन, विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.
4. तक्ते
शालेय शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी.5. आदर्श
आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका, आदर्श महिला, आदर्श गाव, आदर्श शहर, आदर्श राष्ट्र इत्यादी.

🎯 101 शालेय प्रकल्प यादी 🎯

--------------------------------------------
मागे मी  101 प्रक्रल्पांची नावे  दिली  होती...
मागील  अंकावरून  पुढे. .
1) दिनदर्शिका  तयार  करणे
2) प्रादेशिक  शब्द -अर्थ
3) नदी  किनारा
4) समुद्र किनारा
5) सागर  सहल
6) कुडींतील लागवड
7) हातरूमालाचा वापर
8) शालेय  दप्तर
9) मातकामातील वस्तू
10) शिवणकामातील  लहान   -लहान कपडे
11) कापडी बॅचेस(बिल्ले )तयार  करणे
12) वाया गेलेल्या  कागदापासून वस्तू  तयार करणे
13) पुठ्ठा कामातून वस्तू  तयार  करणे
14) भरती  ओहोटी  कारणे
15) सागरी  लाटा  फायदे- तोटे
16) आदर्श शाळा
17) पाण्यावरील नाव- होडी
18) हाऊस बोट  जहाज
19) पाण्याचा वापर  कसा करावा
20) वर्गमुळ-घनमुळ यांचा  तक्ता
21) बेरीज -वजाबाकी-भागाकार गुणाकार  तक्ता
22) हवेतील  तापमान  कसे  ओळखावे
23) विविध  अक्षरांवरून वाक्यप्रचार तयार करणे
24) समानार्थी शब्द
25) विशेषण  विशेषनाम
26) लिंग -पुल्लिंग -स्त्रीलिंग
27) विरुद्धधार्थी  शब्द
28) श्रम  हाच  देवता /श्रम  हीच पूजा
29) स्वच्छता  हाच  परमेश्वर 30) आई  हिच  देवता
31) उत्तम  आरोग्य
32) राखण्याचे  उपाय
33) परिश्रम  हिच  पुजा
34) कुलदैवत  हेच  वैभव
35) आदर्श  गाव
36) आदर्श विद्यार्थी
37) आदर्श  बालक
38) वीर  बालक- बालिका
39) रोपवाटिका
40) आरोग्य  हिच  संपत्ती
41) कलावंताची  माहिती
42) पावसाची  गाणी -कविता
43)  स्वरांपासून प्रतिकृती  तयार  करणे
44) परसबाग
45) फुलझाडांची लागवड
46) गच्चीवरील  बगीचा
47) शैक्षणिक  खेळणी
48) मासे  यांची  चित्रे  काढणे
49)  प्राण्याची  चित्रे काढणे
50) पक्ष्यांची  चित्रे काढणे
51) परिसरातील  झाडे
52) परिसरातील  उद्याने
53) परिसरातील मंदिरे
54) परिसरातील  घरे
55) स्वातंत्रगीतांचा  संग्रह  करणे
56) ग्रामसभा  आयोजित  करणे
57) ग्रामपंचायतीची  रचना
58) महापुराचे  वर्णन
59) धूर  विना  चूल
60) फळझाडे
61) आमराई
62) नारळी -फोफळीच्या बागा
63) माझा  कोकण
64) कोकण  वैभव
65) रात्रीचे  चांदणे
66) सुर्यदेवता
67) वर्षादेवता
68) जलदेवता
69) खेडूत  जिवन
70) मेंढपाळ
71) शेळीपालन
72) शेतातील  पिके
73) वृक्षदेवता
74) भौमितिक  आकृतींच्या 75) साहाय्याने प्रतिकृती करणे
76) भौमितिक  आकृत्यांचा परिचय
77) प्राथमिक  आजार -उपाय  78) रोगप्रसार व उपाय
79) गोबर गॅस
80) पाना -फुलांची  चित्रे काढणे
81) विद्युत  उपकरण  दुरुस्ती
82) संत  महिलांचा परिचय
83) तुळशीच्या  वृंदावनाचे
84) चित्र काढा
85) रांगोळी  काढा (साधी )
86) नक्षीदार  रांगोळी
87) रांगोळीचा गालिचा
88) पणत्यांची  प्रतिकृती
89) खडू तयार करणे
90) धूपबत्ती तयार  करणे
91) मी  पाहिलेली  जत्रा
92) आमच्या  गावाची  जत्रा
93) विविध  खाद्य पदार्थ
94) पदार्थाच्या चवी  उदा.खारट,तिखट इ.
95) पोस्टबाॅक्सचे चित्र - आकार- प्रकार
96) जाहिरात  संग्रह
97) वृक्षांची  आकृती  उदा.आंबा
98) सुचीपर्णी वृक्ष
99) नारळाचे  झाड
100) चिंचेचे  झाड
101) अशोकाचे झाड
********************************************



       प्रकल्प
1.  शैक्षणिक प्रकल्प,प्रकल्पासाठी लागणाऱ्या बाबी
     व  कसा तयार करून घ्यावा.
       शालेय  प्रकल्प म्हणजे काय ?-
          विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा
         एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले
         वय,आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज
         उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला
         उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

  अ. प्रकल्पाची उद्दिष्टे-
 स्वयंअध्ययनाची सवय लागणे.
 स्व-कुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
 स्वतःमध्ये उपजतच असणाऱ्या निरिक्षण,निवेदन,संकलन, सादरीकरण आदी क्षमताचा विकास      घडवणे.
 तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
कल्पकता,सृजनशीलता,संग्रहवृत्ती,श्रमप्रतिष्ठा,स्वयंशिस्त,चिकाटी,सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा   नीटनीटकेपणा,संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडविणे.
 आत्मविश्वास प्राप्त करणे.
 या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्टे अभ्यासणे. उदा. भाषा विषय-उच्चतमशुद्धता,
 पाठांतर क्षमता,विचार मांडण्याची क्षमता इत्यादी
 ब. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे -
  प्रकल्प कार्य करणे जितके महत्वाचे आहे,तितकेच केलेल्या प्रकल्प कार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्वाचे आहे, कारण निवेदन,सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे हि प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्प कार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे, याचे मुद्धेसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे-
 विद्यार्थ्यांसाठी-
   1. प्रकल्पाचे नाव विषयासह-निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयाची निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
   2. प्रकल्पाचा प्रकार- निवड केलेला प्रकल्प पुढील पैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा-  सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प,तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
   3. प्रकल्पाची  सुयोग्य उद्दिष्टे लिहा.
   4. प्रकल्पाचे साहित्य- विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखन साहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करावा.
   5. प्रकल्पाची कार्यपद्धती- प्रकल्प सकारात असताना कर्नुअत येणाऱ्या कृतीचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
   6. प्रकल्पाचे निवेदन-  यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
   7. प्रकल्पाचे सादरीकरण- संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदत्कार्याचाही उल्लेख करा.घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
   8. आकृत्या व चित्रांकणासाठी- येथे प्रकल्पाशीसंबंधित चित्रे आकृत्या नकाशे चिटकवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
   9. प्रकल्पपूर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद-यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
   10. मूल्यमापन- यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते  ज्ञान प्राप्त झाले?
    11. प्रकल्पाबाबत स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पूर्ण करताना मिळालेल्या  स्व-आनंदाचा  उल्लेख एक दोन वाक्यात करा.

क. शालेय प्रकल्पासाठी यादी-
     1. माहीती संकलन - थोर संत, थोर समाजसुधारक,थोर राष्ट्रपुरुष,थोर शास्त्रज्ञ,थोर खेळाडू,थोर समाजसेवक,थोर समाजसेविका इत्यादी.
   2. संग्रह : म्हणी संग्रह, वाक्यप्रचार संग्रह, अभंगसंग्रह,  श्लोकसंग्रह,  
सुविचारसंग्रह,  कवितासंग्रह, भावगीतसंग्रह,  पोवाडासंग्रह,   समरगीतसंग्रह,  देशभक्तीपरसंग्रह,  गीते पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह इत्यादी
   3. प्रदर्शन : चित्रकलाकृती प्रदर्शन,ग्रंथप्रदर्शनपुस्तकेप्रदर्शन विज्ञान प्रकल्प प्रदर्शन विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.
   4. तक्ते : शालेय शैषणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी
   5. आदर्श : आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका आदर्श महिला आदर्श गाव आदर्श शहर आदर्श राष्ट्र इत्यादी
   

   
2.  शैक्षणिक प्रकल्पवही डाउनलोड किंवा प्रिंट काढून तयार करा.
Note:-  प्रकल्प वही तयार करण्यासाठी खालील क्रमाने
 1, 2, 3, 4,  5,  6, या अंकांना क्लीक करून pdf फाईल मधील
 open या  चौकटीस क्लीक करून वर्ड फाईल edit करून प्रिंट घ्याव्यात.
   
     पजेस     1       2       3       4         5         6











📝शालेय  प्रकल्प  यादी 🌀
========================
---------'---------------------------------------
1) थोर संताची माहिती  मिळविणे
2) थोर समाजसेवकांची माहीती
3) थोर राष्ट्रपुरूषांची माहिती
 4) थोर समाजसेविकांची  माहिती
5) आदर्श महिलांची माहिती
6) नामवंत खेळाडूंची माहिती
7) थोर शिक्षकतज्ञांची माहिती
8) थोर शास्त्रज्ञांची माहिती
9) थोर विरांगनांची माहिती
10) श्रेष्ठ गायिकांची माहिती
 11) श्रेष्ठ गायकांची माहिती
12) आदर्श शिक्षक
13) आदर्श शिक्षिका
14) माझा गाव /आदर्श गाव 15) आदर्श समाजसेवक
16) माझा भारत महान
17) थोरांचे विचार
18) थोर हुतात्मा
19) राष्ट्रीय स्मारके
20) राष्ट्रीय प्रतिके
21 )प्राचीन मंदिर
22) ऐतिहासिक वाडे
23) महाराष्ट्रातील किल्ले
24) जलाशय  तलाव
25) धरणे
26) सरोवरे
27) खनिज  संपत्ती
28)जलसंपत्ती /समुद्र  संपत्ती
29) वनसंपत्ती/वन हिच संपत्ती
30) औषधी वनस्पती
31) वाहतुकीचे नियम
32) वाहनांची घ्यावयाची दक्षता
33) माझे आवडते वाहन
34) रेल्वे स्टेशन
35) बसस्थानक
36) निबंध  कसा  लिहावा?
37) विरामचिन्हांचा वापर
38) पत्रलेखन  कसे करावे ?
39)कथा  कशी  सांगावी ?
40) कथालेखन कसे करावे?
41) कवितांचा संग्रह
42) भावगीतांचा संग्रह
43) सारलेखन कसे  करावे ?
44) मुद्यांवरून गोष्ट
45) चित्रमय गोष्ट
46) संवाद लेखन
47) वक्तृत्व कसे करावे ?
48) नृत्यप्रकार ओळखणे
49) वाद्यांची ओळख
50) हुमाउपंथी मंदिरे
51) वाक्प्रचारांचा संग्रह करणे
52) म्हणींचा संग्रह करणे
53) सुविचारांचा संग्रह करणे
54) सुभाषितांचा संग्रह करणे 55) अभंगाचा संग्रह करणे
56) श्लोकांचा संग्रह करणे
57) देशभक्तीपर गीतांचा संग्रह  करणे
58) राष्ट्रीयगीतांचा संग्रह
59) 'आई' या विषयावरील  कवितांचा-गीतांचा संग्रह
60) गणितातील गमतीजमती
61) आकाशवाणी
62) दूरदर्शन
63) वर्तमानपत्र
64) प्रदर्शन खेळण्याचे
65) प्राणिसंग्रहालय
66) पशुसंग्रहालय
67) पुरातनवस्तु संग्रहालय
68) भाजीपाला मंडई
69) किराणा दुकान
70) आपली वाहने
71) बियांचा संग्रह
72) जुन्या टिकिटांचा संग्रह
73) नाण्यांचा संग्रह
74) भेटकार्डांचा संग्रह
75) लग्नपत्रिकांचा संग्रह
76) निसर्ग चित्रांचा संग्रह
77) पिसांचा संग्रह
78) खेळण्यांचा संग्रह
79) मातीचे नमुने
80) खडकांचे प्रकार
81) दगडांचे नमुने
82) वैज्ञानिक खेळणी
83) शंख -शिंपल्यांचा  संग्रह
84) राख्यांचा संग्रह
85) दो-यांचा संग्रह
85) वाहनांच्या चित्रांचा संग्रह
86) माझी शाळा
87)  फुलांच्या चित्रांचा संग्रह
88) प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह
89) विविध धर्मियांची प्रार्थना  स्थळे
90) नूतन वर्षांभिनंदन
91) भारतीय सैनिकांची  शौर्यगाथा
92) आपला आवडता छंद
93) आवडते पुस्तक
94) आवडता  लेखक
95) आवडता गायक
96) आवडती गायिका
97) आवडता चित्रकार
98) आवडते गीत
99) आपल्या  जवळचा मित्र
100) ग्रामदेवता
101) माझा देश 

1 comment :