अशी वाढवा मोबाईलची स्पेस
अशी वाढवा मोबाईलची स्पेस
मित्रांनो,
आज आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हाटसअॅप चे बरेच ग्रुप आहेत. सतत येणारे मॅसेज, फोटो इ. मुळे बऱ्याच वेळा आपला फोन हँग होतो..!
व्हाटसअॅप चा डाटासुध्दा खूप वाढतो, मग फोटो, मॅसेज डिलीट करत बसावे लागते.
आपल्या स्मार्टफोन ला व्हाटसअॅपपासून हँग होण्यापासून वाचविण्याची एक सोप्पी ट्रिक शेअर करावीसी वाटली..!
मी ही ट्रिक वापरतो, त्यामूळे माझे व्हॉटसअॅप हँग होत नाही...! हं प्रांजळपणे हे मात्र कबूल करतो की, या ट्रिकचे डिसअडव्हॉन्टेज मात्र मला माहीत नाहीत. पण मला तस कधी जाणवलं नाही.
तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा.. !
खालील स्टेप्स वापरा ➖
💢 आपल्या मोबाईलचे इंटरनल स्टोरेज ओपन करा.
💢 यातील whatsapp नावाची फाईल ओपन करा.
💢 नंतर Databases नावाची फाईल उघडा.
💢 यामध्ये msgstore.db.crypt12 या सारख्या नावाच्या वेगवेगळ्या दिनांकांच्या अनेक फाईल्स तुम्हाला दिसतील.
💢 यातील आजच्या दिनांकाची फाईल सोडून बाकी सर्व फाईल्स डिलीट करा.
💢 बघा तुमच्या मोबाईलचा स्पेस (मेमरी) वाढते की नाही..!
💢 आपण मागील दिनांकाच्या डिलीट केलेल्या फाईल्स म्हणजे व्हाटसअॅप जे रोज रात्री २ वा. बॅक अॅप घेत असत त्या असतात.
💢 त्या डिलीट केल्या तर कोणतेही नुकसान नाही, उलट आपला मोबाईलचा इंटरनल स्पेस मोकळा होतो.
No comments :
Post a Comment