निर्वर्ग अध्यापन
निर्वर्ग अध्यापन
विदयार्थ्यांचा 100 टक्के शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी विविध अध्यापन पध्दतींचा अवलंब शिक्षकांना करावा लागतो. व्दिशिक्षकी शाळेमध्ये किंवा तीन शिक्षकी शाळा व पाच वर्ग अथवा शिक्षक रजेवर असेल अशा ठिकाणी अध्ययन व अध्यापनाचे सुक्ष्म नियोजन शिक्षकांना करावे लागते. निर्वर्ग अध्यापन पध्दतीचा उत्कृष्ट वापर केल्यास शिक्षकांना चांगल्याप्रकारे अध्यापनाचे नियोजन करता येईल. या अध्यापन पध्दतीमध्ये विदयार्थ्यांचे बौध्दिक स्तर विचारात घेऊन गट करावेत व त्या गटांना त्यांच्या क्षमतेनुसार विषयातल्या उपघटकाचे काम पूर्ण करण्यास सांगावे. या विदयार्थी गटांना विशिष्ट नाव दिल्यास अजून आपले काम सोपे होऊ शकते.
सद्यपरिस्थितीत शाळाबाहय मुलांना वयानुरूप त्या-त्या इयत्तेत प्रवेश दिला जातो.काही मुले इतर काही कारणांमुळे अप्रगत राहतात. काही मुलांचा बौध्दीक स्तर चांगला असल्यामुळे त्यांना चांगले आकलन होते.ही मुले वर्गाचे व गटाचे नेतृत्व करू शकतात.त्यामुळे सर्वच मुलांना त्यांच्या क्षमतेने कौशल्य प्राप्त करून प्रगत होण्यासाठी निर्वर्ग अध्यापन पध्दत उपयोगी पडते.
कार्यपध्दती-
स्तरनिहाय गटामध्ये मुलांना बसविणे. भाषा व गणिताची जी कौशल्य प्राप्त करावयाची आहेत त्यासाठी शैक्षणिक अध्ययन अनुभव देणे. ही मुले गटात स्वतः साहीत्य हाताळतील त्यावरील शब्द ,अक्षर ,अंक इ.बाबत माहिती मिळवतील. त्यानुसार स्वतः अक्षर व शब्द ओळखतील ,संख्याज्ञान होईल. गटामध्ये बौध्दिक स्तर चांगला असलेला विदयार्थी गटाचे नेतृत्व करील. उच्च बौध्दिक स्तर असलेल्या गटातील मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार उच्च कौशल्य/प्रभुत्व मिळविण्यासाठी योग्य ते अध्ययन अनुभव दयावेत त्यासाठी आवश्यक सुविधा/साहित्य उपलब्ध करून दयावे.उदा. चित्रावरून गोष्ट,प्रसंगवर्णन, नोटा व नाणी यावरून संख्या व संख्यास्थान ओळखणे इ.
भाषा व गणित विषयानुसार शाळेतील सर्व वर्गांची स्तरनिश्चिती करणे.(उदा.-भाषा निकष- अक्षर,शब्द,वाक्य,परिच्छेद,गोष्ट इ.गणित निकष- संख्या, संख्याज्ञान,संख्यावरील क्रिया)
गटनिहाय वर्गीकरण :-
गट-1 उच्च क्षमताप्राप्त विदयार्थी.
गट-2 काही क्षमताप्राप्त विदयार्थी.
गट-3 काही दुस-या क्षमताप्राप्त विदयार्थी.
गट-4 क्षमता प्राप्तीमध्ये कच्चे विदयार्थी.
गट-5 क्षमता संपादणूकीमध्ये कच्चे विदयार्थी.
गट 1 आणि गट 4 यात गट 1 मधील विदयार्थी गट 4 मधील
यांचे सहअध्ययन विदयार्थ्यांना अध्ययनास मदत करतील.
गट 2 आणि गट 3 क्षमता संपादनातील त्रुटी विदयार्थी एकमेकांच्या
यांचे सहअध्ययन सहाय्याने दूर करतील.
गट 5 शिक्षक स्वतः विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
¤ परीपाठानंतर भाषा व गणित विषयाचे अध्यापन करणे.
धन्यवाद !!!

No comments :
Post a Comment