पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday 29 August 2017

Offline you tube

ऑफलाईन बघा ‘यूट्यूब’ वरील व्हिडिओ

अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलेल्या यूट्यूबचे अनेक भन्नाट पर्याय तुम्हाला माहित नसतील. त्या बहुविध फीचर्सचा घेतलेला हा आढावा....
लॉग इन करा अन् स्पीड वाढवा

सहज यूट्यूबवर गेलात आणि सर्च करण्याचा प्रयत्न केला, तर बऱ्याच वेळ बफरिंगमध्ये वेळ जातो. मात्र यूट्यूबवर लॉग इन होऊन सर्च केल्यास सर्चचा वेग वाढतो. तसंच सदस्य नसलेल्यांना पाहता न येणारे व्हिडिओदेखील सहज पाहता येतात. यूट्यूब ही 'गुगल'चीच सेवा असल्याने तुम्ही तुमचे गुगल अकाऊंट लॉग इन केल्यानंतर यूट्यूबचे लॉग इन करण्याचा मार्ग मोकळा होतो.

ऑफलाइन यूट्यूब

इंटरनेट कनेक्शन नसतानाही यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेता यावा, म्हणून यूट्यूबने ऑफलाइनची सेवाही उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक व्हिडिओच्या खाली 'अॅड टू ऑफलाइन' हा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक केल्यावर संबंधित व्हिडिओ ऑफलाइन व्हिडिओच्या लिस्टमध्ये समाविष्ट होतो.

३६० अंशांचा व्हिडिओ

यूट्यूब ३६० डिग्री व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण परिसराचा वेध घेणारा व्हिडिओ अपलोड करता येतो. क्रोम किंवा मॅकवरून हे व्हिडिओ अपलोड करता येतात. कम्प्युटरवर ३६० डिग्री मेटा डेटा अॅपच्या मदतीने अशाप्रकारचे ३६० अंशांमध्ये चित्रित केलेले हे भन्नाट व्हिडिओ पाहता येतात किंवा अपलोडही करता येतात.

थ्रीडी व्हिडिओ

यूट्यूबवर थ्रीडी व्हिडिओ पाहण्यासाठी www.youtube.com/3d या लिंकला भेट द्या. आजच्या घडीला या लिंकवर मोठ्या प्रमाणात थ्रीडी व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. व्हिडिओखाली देण्यात येणाऱ्या थ्रीडी आयकॉनवर क्लिक करून तुमच्याकडील थ्रीडी चष्म्यांप्रमाणे थ्रीडीचा प्रकार हवा तसा अॅडजेस्ट करून घेता येतो.

व्हिडिओ करा सेव्ह

अनेकदा एखादा व्हिडिओ शोधण्यासाठी आणि पाहण्यासाठी बराच वेळ जातो. अशा वेळी तुम्ही त्या व्हिडिओची लिंक सेव्ह करून ठेवू शकता. व्हिडीओखालील 'अॅड टू' या पर्यायावर क्लिक करून तुम्ही 'वॉच लेटर'चा पर्याय निवडा. हा व्हिडिओ तुमच्या खासगी प्ले लिस्टमध्ये सेव्ह होतो.

व्हिडिओतील विशिष्ट भाग बघण्यासाठी...

एखाद्या व्हिडिओमधील एखादा खास भाग मित्राला दाखविण्याची इच्छा असेल तर तशी सुविधाही यूट्यूबवर उपलब्ध आहे. एखाद्या व्हिडिओमधील खास भाग मित्राला, नातेवाइकांना दाखवायची असेल, तर व्हिडिओ शेअरचा पर्याय क्लिक करा. त्यानंतर यूआरएलच्या खालील बाजूला असणाऱ्या पर्यायांमधील सॉर्ट अॅट या पर्यायावर क्लिक करून व्हिडिओमधील तो सीन ज्या वेळेला आहे ती वेळ तेथे टाकावी. उदाहरणार्थ, पाच मिनिटांच्या व्हिडिओमधील ३.५५ सेकंदाला ते दृश्य दिसणार असेल तर सॉर्ट अॅट ३.५५ असं टाइप करावं. जेणेकरून पाच मिनिटांच्या व्हिडिओमधील ३.५५ सेकंदांनंतर येणारे दृश्य तुम्हाला पाहता येईल.

काही शॉर्टकट्स

यूट्यूब व्हिडिओच्या लिंकमध्ये youtube या शब्दाआधी 'ss' ही अक्षरे टाकल्यास तुम्हाला व्हिडिओ थेट डाऊनलोड करता येतो. किबोर्डवर 'K' लेटर दाबून तुम्हाला व्हिडिओ पॉज तसेच परत प्ले करता येईल. 'J' ने व्हिडिओ दहा सेकंद मागे तर, 'L'ने व्हिडिओ दहा सेकंद पुढे नेता येईल. 'M' ने व्हिडिओचा आवाज बंद करता येईल

No comments :

Post a Comment