पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday 6 August 2017

नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रम
                                                                  नाविण्यपूर्ण उपक्रम
                 शिक्षक स्वतः कल्पक असतात. शाळांमध्ये स्थानिक, भौगोलिक ,सामाजिक परिस्थिती स्तर विचारात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. या उपक्रमांमुळे शिक्षक –विद्यार्थी, शिक्षक-पालक व समाज यांच्यामधील सहसंबंध सकारात्मक होतात. मुलांची एकाग्रता वाढावी,त्यांना सलगपणे बसण्याची सवय लागावी यासाठी काही छोटे छोटे खेळ/उपक्रम घेता येतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते.त्याचा स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होतो गावाला शाळा आपली वाटते व शाळेला गाव आपले वाटते.  पर्यायाने मुलांचा, शाळेचा आणि गावाचा विकास होतो.
   

                          1.दैनंदिन उपक्रम

1) मुलांचे वाढदिवस साजरा करताना पुस्तक भेट देणे/घेणे.
2) उपस्थिती ध्वज.
3) आजचे राजकुमार व राजकुमारी - स्वच्छ व टापटीप गणवेश इ.
4) गृहपाठ तपासणी रोज करून प्रोत्साहनपर 1 ते 5 स्टार देणे.
5) विदयार्थ्यांसाठी गृहपाठ डायरी विकसित करणे व पालकांची स्वाक्षरी घेणे.
6) मधल्या सुटटीत कवितांची/पाढयांची कॅसेट लाऊडस्पीकरवर लावणे.
7) वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन करणे.
8) दररोज मुलांना उपयुक्त असे अवांतर वाचन करावयास पुस्तके उपलब्ध करून देणे.
9) शाळा सुटण्यापूर्वी दिवसभरातील घटकांचे  विदयार्थी शंकांचे निरसन करणे.
10) गुरूजनांना अभिवादन/ वर्गमित्रांसोबत हस्तांदोलन.
 
               वार्षिक उपक्रम

1. गांडूळखत निर्मिती, परसबाग,तुळसबाग तयार करणे.
2. वृक्षारोपन,शेतीच्या कामात प्रत्यक्ष शेतक-यास मदत करणे ( मी शेतकरी)
3. पाण्याची  बचत, रेन हार्वेस्टींग ,पाणी शुध्दीकरण
4. सांस्कृतिक कार्यक्रम
5. हस्तलिखीत तयार करणे. ग्रंथ प्रदर्शन.
6. माझी बचत बँक.बँका,पोष्ट ऑफीस,पतपेढी भेट
7. शालेय लेझीम पथक.झंाजपथक, स्काऊट गाईड पथक.
10. शालेय गीतमंच.
11. FM band 101 वरील We Learn English हा कार्यक्रम ठिक 11.00
12.लेक शिकवा,लेक वाचवा अभियान.
13. विज्ञान प्रदर्शन ,विज्ञान जत्रा
14.विविध प्रकारच्या क्रिडास्पर्धा व क्रिडा प्रबोधनी.

No comments :

Post a Comment