पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday 29 August 2017

File देवाण घेवाण

फाइलची देवाण - घेवाण



कॉम्प्युटर आणि अॅण्‍ड्रॉइडच्‍या दरमयान फाईल पाठण्यासाठी कमी अंतरामध्ये Bluetooth चा वापर करु शकतो किंवा डाटा केबल कनेक्ट करुन फाईल पाठविता येतात. तसेच जर अंतर जास्त असेल तर e-mail, Dropbox, Google Drive किंवा OneDrive यांचा वापर करता येतो. पण या मार्गाने फाईल पाठवीण्याची पध्दत थोडी लांब आहे आणि जर तुम्हाला अतिशय सोपी पध्दत हवी असेल, ज्यात फाईल फक्त वेब ब्राऊझर मध्ये ड्रॉप करा आणि काही सेकंदातच हि फाईल तुमच्या अॅण्ड्रॉइड मोबाईल मध्ये आलेली असेल तर तुम्ही पुढील अॅप्स बदद्ल नक्कीच विचार करायला हवा.
यातील कोणतेही अॅप्स तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही काहीतरी गमाताय. मी येथे तीनच अॅप्स निवडले आहे कारण हे वापरण्यास अतिशय सोपे आहेत, तुमच्या अॅण्ड्राइडवर हे अॅप्स इन्स्टॉल करुन कॉम्प्युटरमधील वेब ब्राऊझर मधून यात प्रवेश मिळवता येतो.

AirDroid:
AirDroid हे वेब आधारीत अॅण्ड्राइड मोबाइलचा रिमोट कंन्ट्रोल आहे.
हे अॅप्स  Google Play वरुन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा आणि साइनअप करा.(मोबाईल मधील Settings - Accessiblity मधील Services या पर्यायाखालील AirDroid Notification mirror हा On करावा लागेल.)आता कॉम्प्युटरमधील वेब ब्राऊझर मध्ये web.airdroid.com यात तुमच्या युझरनेम आणि पासवर्डने लॉगीन करा किंवा QR code स्कॅन करुन कनेक्ट करा.एकदा हे कनेक्शन स्थापीत झाले तर तुम्ही वेब ब्राऊझर मध्ये तुमचा मोबाईल अॅक्सेस करु शकता.
AirDroid मधील मोफत अकाऊंट मध्ये तुम्ही अॅण्ड्रॉइड आणि कॉम्प्युटरच्या दरम्यान फाईल पाठऊ शकता, कॉल बघू शकता, फोटो बघू आणि डिलीट करु शकता, एसएमएस वाचू आणि पाठवू शकता, कॉन्टॅक्ट बघू शकता, नविन कॉन्टॅक्ट टाकू किंवा डिलीट करु शकता आणि तुमचे अॅप्लीकेशन्स अॅक्सेस करु शकता.
तसेच यात जर दुर्दैवाने तुमचा मोबाईल हरवला तर त्याचा शोध घेवू शकता, त्यावर चेतावणीसाठी आवाज काढू शकता, त्यावरील डाटा नष्ट करु शकता आणि मोबाईल लॉक करु शकता.
पण यातील मोफत वापरासाठी फक्त 100MB डाटा मिळतो. तसेच यात कॅमेरा आणि कॉल करण्याचे वैशिष्ट फक्त प्रिमीयम साठी उपलब्ध आहे.

Pushbullet:
Pushbullet म्हणजे files, links, text notes, list आणि webpages कॉम्प्युटर आणि अॅण्ड्रॉइड लच्या दरम्यान पाठविण्याचा सर्वात सोपा उपाय.
Pushbullet सुरु करण्यासाठी प्रथम हे अॅपGoogle Play वरुन मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन इस्टॉल करा.
नंतर यात Google चे अकाउंट वापरुन साइ्नइन करा.
(मोबाईल मधील Settings - Accessiblity मधील Services या पर्यायाखालील Pushbullet notification हे On करावे लागेल.)
आता कॉम्प्युटरमधील तुमच्या वेब ब्राऊझर मध्ये pushbullet.com साइट मध्ये याच अकाऊंटने लॉगइन करा.
येथे तुम्हाला या अकाउंटने लागीन केलेल्या सर्व साधनांची यादी दिसेल.
या सर्व साधनांमध्ये तुम्ही आता सहजपणे फाईल्सची देवाणघेवाण करु शकता.
तसेच Pushbullet हा push notification ला सपोर्ट करतो आणि मोबाईलच्या सर्व सुचना कॉम्प्युटरमध्ये दाखवतो.

JustbeamIt:
JustbeamIt ने मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये फाईल पाठविण्याची पध्दत खुप सोपी केली आहे. अॅण्ड्रॉइड मध्ये हे अॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर फाइलची देवाणघेवाण खुप सोपी होते. या अॅप्लीकेशन मध्ये फाईल निवडल्यानंतर आपोआप एक URL तयार होतो. हा URL कॉम्प्युटरमधील ब्राऊझर मध्ये ओपन करुन ही फाईल डाऊनलोड करु शकता.

No comments :

Post a Comment