पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Saturday, 26 August 2017

PDF तयार करणे

Pdf file तयार करा


Pdf file तयार करा

Wps office हे अप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा.या अप्लिकेशन च्या मदतीने तुम्ही सर्व pdf file, ppt वाचू शकता,पाहू शकता, ppt व pdf file तयार करू शकता
       मित्रांनो Wps office मधून pdf file बनविण्यासाठी दोन पर्याय आहेत.
1) रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे व
2) WPS Office मध्ये मेसेज टाईप करून pdf file बनविणे.
          आज आपण wps office मध्ये pdf file कशी तयार करायची याची माहिती घेऊया.
रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे :
यामध्ये Hike, Facebook and What's app वरील मेसेजची pdf file बनवणे याचा समावेश आहे.
चला तर मग मी सांगतो तशी कृती करा.
1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.
2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा.
3) आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा.
4) आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPE केलेला मेसेज दिसेल.
5)  आता त्या खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.)
6)  त्यानंतर आपल्याला SD CARD मधील फोल्डर आणि खाली फाईल चे नाव दिसतात. पाहिजे ते फोल्डर निवडा व फाईलचे नाव टाका आणि खालील Exports to pdf ला टच करा. आपली फाईल 100% pdf मध्ये CONVERT झाली आहे.

eady made file  PDF मध्ये Convert होताना राहणारे दोष :

i) ही तुमची फाईल साध्या पद्धतीने pdf मध्ये convert झाली आहे. पण ही pdf मला पसंत नाही. कारण आपली ही फाईल  Ready-made  फाईल होती.

ii) ती जशीच्या तशी pdf करताना File Font 11 राहतो. म्हणजे एकदम लहान. शिवाय आपल्याला पाहिजे तसा परिच्छेद मिळालेला नसतो.

iii) अक्षरे bold नसतात. शिवाय अक्षरांना लुक नसतो. दोन ओळींच्या मध्ये जास्त अंतर राहते. म्हणजे जास्त जागा आणि कमी शब्द असे होते आणि प्रिंट पण हवी तशी मिळत नाही.

iv) पेज साईज पण Letter असते ती A4 नसते. याकरिता आपण Ready made फाईल copy करून paste केल्यावर direct pdf मध्ये Convert न करता अगोदर ती edit (दुरूस्त) करून घ्यायची आणि मग pdf मध्ये convert करायची. म्हणजे मग आपल्याला हवी तशी फाईल तयार करता येते.
यासाठी कृती आहे ती खालीलप्रमाणे :

1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.

2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा.

3) आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा.

4) आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPY केलेला मेसेज दिसेल.
आता ही फाईल आपल्याला edit (दुरूस्त) करायची आहे.

5) यासाठी खाली दिलेल्या Tools मधील View button ला टच करून page setup ला टच करा. यामध्ये Letter ला टच करून A4 साईज निवडा.त्यानंतर Orientation मधून Portrait म्हणजे उभे पेज किंवा Landscape म्हणजे आडवे पेज यापैकी तुम्हाला ते निवडा. Page margin मधून सर्व बाजूला छोटे बाण दिसतात. तुम्ही त्या बाणांनी हवी तशी मार्जिन करून घ्या. कोपर्‍यात OK button दिसते त्याला टच केले की आपले Page setup पूर्ण होते.

6) View मध्येच page background ला टच केले की आपल्याला पेजचा background बदलण्यासाठी पाहिजे ते कलर उपलब्ध आहेत. योग्य तो कलर निवडून घ्या. Background कलर घेतलाच पाहिजे असे नाही. नाही घेतला तरी चालेल.

7) आता आपल्याला font type बदलायचा आहे. त्यासाठी समोर दिसणार्‍या मेसेज मधील
अगदी सुरुवातीच्या शब्दाजवळ बोटाने थोडा वेळ दाबून धरा. काही options दिसतील. यामधील Select all ला टच करा. आता पुन्हा खालील Tools ला टच करून त्यामधील Font ला टच करा. लगेच आपल्याला size 11 दिसेल. त्याला टच केले की आपल्याला हवी ती Font size निवडून घ्या. जर अक्षरे गडद रंगाची हवे असेल तर खालील B ला टच करा. तसेच तुम्हाला अक्षरांना खालील हवे ते effects निवडता येतील. ते दिले की कोपर्‍यात Done दिसेल त्याला टच करा. आता तुमची अक्षरे बदललेली दिसतील.

8) मित्रांनो Tools मध्ये insert म्हणून एक टॅब आहे. यामधून तुम्हाला हवे ते चित्र घेण्यासाठी pictures option आहे. . तसेच आडवे उभे रकाने हवे असतील तर त्यासाठी Table पण आहे. तसेच header footer पण आहे.

9) मेसेजमध्ये हवी तेवढी दुरूस्ती केल्यानंतर आपल्याला आता या मेसेज ची pdf file तयार करायची आहे.त्यासाठी खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.)

विशेष सूचना :

ज्या वेळी आपण done किंवा OK कराल त्यावेळी फाईल पूर्ण होत असते. अशा वेळी Tools मधील नवीन टॅब वापरायची गरज असेल तर पेज च्या कोपर्‍यात edit शब्दाला टच करा. लगेच तुम्हाला की बोर्ड उपलब्ध होईल.
आता  तुम्ही मोबाईल PC ला connect करून तुम्ही Save केलेली फाईल PC, Laptop वर घेऊ शकता. किंवा मेमरी कार्ड काढून PC ला कनेक्ट करू शकता.

फायदे :

मित्रांनो हल्ली Hike किंवा whatsapp वर जनरल नॉलेज चे बरेच प्रश्न आणि उत्तर येतात. English word येतात. समानार्थी, विरूद्ध अर्थाचे शब्द येतात. अशी आणि यापेक्षाही उपयुक्त माहिती दररोज येत असते. या माहितीची pdf file तयार करून त्याच्या प्रिंट काढून आपल्या वर्गातील मुलांना देता येईल. याशिवाय आपल्याकडे प्रचंड ज्ञानाचे भांडार होईल.

No comments :

Post a Comment