पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday 27 August 2017

Photo--windows--icon

फोटोला विंडोज आयकॉन मध्‍ये बदलण्‍याचा आश्‍चर्यकारक जलद आणि सोपा मार्ग

तुमच्‍या पर्सनल फोटोला विंडोज आयकॉन मध्‍ये बदलण्‍याचा आश्‍चर्यकारक जलद आणि सोपा मार्ग


तुमच्या पीसी मध्ये अनेक फोल्डर्स असतील, पण तुम्हाला नेहमी स्वतःचे पर्सनल फोल्डर इतरांपेक्षा वेगळे दिसावे अशी इच्छा असते. जर तुम्ही काही फोल्डर्सला इतरांपेक्षा वेगळा लुक देऊ इच्छित असाल तर तुमचा आवडता फोटो तुम्ही विंडोज आयकॉन म्हणून सेट करू शकता.पण प्रथम हे समजून घेऊ या कि विंडोज आयकॉन काय आहे? आयकॉन हे एक छोटे चित्र असते, जे एखादी फाइल किंवा प्रोग्रामचे प्रतिनिधित्व करते आणि त्याचे एक्सटेंशन .ico असते. यात एक इमेज असते, जी विविध आकार आणि कलर डेप्थ मध्ये असते. याचा आकार हा 48x48, 32x32, 24x24, आणि 16x16 मध्ये मोजतात.पण घाबरू नका, स्वत: च्या इमेजचा आयकॉन तयार करण्याची प्रोसेस खुप सोपी आहे. सध्या स्वतःचा आयकॉन करण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी असंख्य सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. पण ऑनलाइन टूलचा वापर करून आयकॉन तयार करणे ही सर्वात सोपी आणि जलद प्रोसेस आहे आणि यासाठी तुम्हाला कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागत नाही आणि त्यात कसे काम करावे हे शिकावे देखील लागत नाही.
खाली काही ऑनलाइन टूल्स आहेत ज्यात आयकॉन तयार आणि इडिट करता येतात -
www.converticon.com
http://www.icoconverter.com/
https://iconverticons.com/online/




येथे तुम्हाला फक्त तुमची इमेज अपलोड करायची आहे, फाम्रॅट सेट करायचा आहे आणि 16x16, 32x32,  48x48 हे तिन्ही आकार सिलेक्ट करायचे आहेत.नंतर ही तयार झालेली .ico फाइल डाउनलोड करा.
आता ज्या फोल्डरचा आयकॉन बदलायचा आहे, त्यावर राइट क्लिक करून Properties सिलेक्ट करा.Customize tab मधून Change Icon बटनावर क्लिक करा.
Browse बटनाला क्लिक करून डाउनलोड केलेल्या .ico फाइलला सिलेक्ट करा. बस्स!

नोट – आयकॉनचा आकार हा नेहमी स्क्वेअर असतो आणि म्हणून शक्यतो यासाठी इमेजसुध्दा स्क्वेअर सिलेक्ट करा. पण जर इमेज स्क्वेअर नसेल तर हि इमेज स्क्वेअर करण्यासाठी येथे रिक्त जागा
रिकाम्या जागेने भरली जाईल.

No comments :

Post a Comment