Whatsapp profile check
व्हाट्स अॅप प्रोफाईल कोणी चेक केले हे जाणून घेण्यासाठी सोप्या '३' स्टेप्स !
तुमच्या व्हाट्सअप प्रोफाईल फोटोला कोणत्याही प्रकारचा सिक्युरिटी अलर्ट नसल्याने कोणीही तुमचा फोटो डाऊनलोड करून सेव्ह करू शकतो. त्याचबरोबर तुमचा प्रोफाईल फोटो कोणी कोणी चेक केला हे समजण्यासाठी देखील व्हाट्सअपकडे कोणतेही फिचर नाही.
परंतु, काही सोप्या स्टेप्सने तुम्ही हे जाणून घेऊ शकता. यासाठी गुगल प्ले वरून Whats Tracker नावाचे अॅप डाउनलोड करा. हे अॅप फ्री आणि पेड या दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. फ्री व्हर्जनमध्ये ७ दिवसांपूर्वी तुमच्या प्रोफाईला कोणी भेट दिली हे समजते. तर पेड व्हर्जनमध्ये तुमचे प्रोफाईल कोण ओपन करते, याच्या वेळेसहीत माहिती मिळते. परंतु, यासाठी तुम्हाला १.९९ डॉलर म्हणजेच १३० रुपये खर्च करावे लागतील.
३ स्टेप्स :
१. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी अॅनरॉईड युजर्सने गुगल प्ले वर जावे.
२. त्यानंतर Whats Tracker हे अॅप डाउनलोड करून इंस्टाल करावे.
३. त्यानंतर युजर व्हिजिट या ऑप्शनवर जाऊन प्रोफाईल कोणी चेक केले, हे माहित करून घ्या.
अॅप संबंधित अधिक माहिती :
हे अॅप tamazons या कंपनीने डिजाईन केले असून त्याच कंपनीने Whats Web नावाचे अॅप देखील बनवले आहे. हे अॅप अॅनरॉईड ४.१ आणि त्याच्या लेटेस्ट व्हर्जनवर देखील इंस्टाल करू शकतो. यावरून तुम्ही व्हाट्सअप कॉन्टॅक्टचे लोकेशन देखील ट्रॅक करू शकता. हे वापरण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये GPS फीचर असणे गरजेचे आहे.
No comments :
Post a Comment