पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 27 September 2017

Adhar

आधारकार्ड अपडेट करा

१. प्रथम https://uidai.gov.in/ या बेवसाईटवर जा.
२. 'Update Your Aadhaar Card' या टॅबवर क्लिक करा.
३. नवं पेज उघडल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं आधार कार्डावरील चुका दुरुस्त करू शकता.
पहिली पद्धत म्हणजे फॉर्म डाऊनलोड करून ऑफलाईन पद्धतीने आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने.
४. 'Fill up 4-Step Online Request' च्या खाली चार स्टेप दिल्या आहे. त्यातील 'Update Aadhaar Data' या ऑप्शनवर क्लिक करा.
५. नवं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाल तीन प्रश्न दिसतील. आणि त्यांची उत्तरंही. 
(१) ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते आपलं आधार कार्ड अपडेट करू शकतील. व्यक्ती आपलं नावपत्तालिंग,जन्मदिवसमोबाईल क्रमांक आणि ईमेल या पोर्टलच्या मदतीनं अपडेट करू शकतात
(२) डिटेल्ससाठी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 'click here'  वर क्लिक करा.
(३) अपडेट रिक्वेस्टसोबत तुम्हाला कोणती कागदपत्रं ऑनलाईन पाठवायचीत त्यांची माहिती तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मिळेल.
६. यानंतर तुम्हाला 'To submit your update/ correction request online please' च्या समोर 'Click Hereवर क्लिक करावं लागेल.
७. यानंतर 'Aadhaar Self Service Update Portal' ओपन होईल. तिथे तुम्हाला अगोदर ज्या आधार कार्ड वरील माहितीची सुधारणा करावयाची आहे त्या आधार कार्ड वरील '12 अंकांचा आधार क्रमांक' टाकावा लागेल. 
८. त्यानंतर  टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 'OTP' चा मेसेज येईल.
९. त्यानंतर तुम्हाला तुमचं नावलिंगजन्मतारीखपत्ता,मोबाईल क्रमांकईमेल आयडी यातील जी माहितीमध्ये बदल करावयाचा आहे त्यावर क्लिक करा
१०. 'Data Update Request'  ओपन झाल्यानंतर त्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
११. सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एका पानावर दिसेल, त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा.
१२. सबमिट केल्यानंतर  'Document Upload'  चा भाग समोर येईल. इथे तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड करू शकता.
१३. तिथेच तुम्हाला बीपीओ सर्विस प्रोव्हायडरचं नाव सिलेक्ट करावं लागेल.
१४. यानंतर तुम्हाला मोबाईलवरही एक मॅसेज येईल, या मॅसेजमध्ये असलेल्या URN क्रमांकानं तुम्ही तुमची रिक्वेस्टची स्थिती पाहू शकता. 
आधार कार्डवरील माहितीत जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल नंबर किंवा आणखी इतर काही बदल करायचा असेल तर हे सर्व आपण कोठेही सायबर कॅफे किंवा इतर ठिकाणी न जाता व एकही पैसा खर्च न करता घरबसल्या काही मिनिटात ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

No comments :

Post a Comment