पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday 26 September 2017

अस्वच्छतेवर मात करा

अस्वच्छतेवर मात करा

अस्वच्छतेवर मात करा

विश्वची माझे घर असे संत मंडळी बोलून गेलीआहेत .आपण
स्वत: ते विश्व या आयुष्याच्या प्रवासात आपले कुटुंब,घर, शेजारी पाजारी,परिसर,गाव ,तालुका,जिल्हा ,राज्य, देश या सार्यांशी आपली व्यक्ती म्हणून देशाचा जबाबदार नागरीक म्हणून बांधिलकी असते.
        'स्वच्छता' ही अशीच वैयक्तिकते कडून सामाजिकते कडे नेणारी गोष्ट आहे.
स्वच्छतेचे बाळकडू : बालपणापासून आपणास मिळत आले,स्वच्छतेच्या चांगल्या सवयी जोपासत आपण शाळा शिकलो ,मोठे झालो.कुटुंबातून ,शिक्षकांकडून ,पाठ्यपुस्तकातून स्वच्छता का करायची हे ऐकत आलोआणि तेपटणारेच होते. सकाळच्या रम्य प्रहरी शरीराची ,घराची ,परिसराची स्वच्छता झाली की प्रसन्न वाटते.या प्रसन्नतेत देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले वा घरच्याच देव्हार्यासमोर प्रार्थना श्लोक म्हटले की मनही ताजे तवाने होऊन जाते.मनातील नकारात्मक विचारांची जागा सुविचार कधी घेतात कळतही नाही.आणि मग जाणीव होते स्वच्छता म्हणजे नेमके काय याची.शरीरातील,मनातील घरातील नको असणारे निरूपयोगी,अडगळ ,अस्वच्छ असे सारे दूर केल्याने योग्य विल्हेवाट लावल्याने मंगलमय असे वातावरण तयार होते.ज्याची सर्व प्राणी मात्रांना गरज आहे.
    देह देवाचे मंदीर
    आत्मा एक पंढरपूर

हे खरे आहे.जसे देहामधे परमेश्वराचे अस्तित्व आहे तसेच ते चरचरात भरून उरले आहे मग आपण या सृष्टीची किती स्वच्छता ठेवायला हवी हे वेगळे सांगायला नको.
      स्वच्छ शरीरामुळे व स्वच्छतेच्या सवयींमुळे उत्तम आरोग्याचा लाभ होतो .हे वैयक्तिक आरोग्य ा बरोबरच सामाजिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे.कचर्याची योग्यप्रकारे सुका कचरा ओला कचरा अशी विभागणी करण्याची सवयही अंगीकारणे गरजेचे आहे.डंपिंग ग्राउंडची समस्या उग्र रूप धारण करते आहे .हे सामाजिक भान आपल्यात जागवणे ही काळाची गरज आहे.आज ई_कचरा ही सुद्धा दिवसा गणिक वाढणारी समस्या ठरते आहे याकडेही  समाजाचे लक्ष वेधणे व स्वच्छतेच्या प्रश्नाकडे अधिक सजगतेने पहाणे गरजेचे आहे.
    मी ,माझ्यापुरते पाहून चालणार नाही.देशाच्या स्वच्छता अभियानाचे आपण सारे जण अग्रदूत होउन काम केले तर स्वच्छ गाव,स्चछ देश हे स्वप्न सत्या त उतरेल नाहीतर माझ्या एकट्याने स्वच्छतेचे महत्व जाणून काय होणार? हा नकारात्मक विचार झटकून स्वच्छतेची क्रांती लाट यायला हवी.विज्ञानयुगात स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणार्या अनेक बातम्या, शोध ,जाहिराती प्रसारीत होतात.अनेक रोगजंतूचा प्रसार रोखण्यासाठी रोग बरे होण्यासाठी औषधांबरोबरच आरोग्यदायी वातावरणाची
नितांत आवश्यकता आहे.

सत्यम शिवम सुंदरम,अशी वाटचाल करायची तर स्वच्छ  शरीर व स्वच्छ सुंदर मन घडवायलाच हवे.ज्याची सुरूवात स्वतापासून करूया तरच स्वताची कर्तव्ये पार पाडण्यासाठी योग्य उर्जेची प्राप्ती होईल.निसर्ग सुंदर आहे,आयुष्य सुंदरआहे. चला तर मग हाती घेऊन हात अस्वच्छतेवर करू मात
सुविचारांना देऊ साथ
आरोग्यदायी  उगवेल प्रभात

No comments :

Post a Comment