पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 26 September 2017

स्मार्टफोन रूट करणे म्हणजे नेमके काय

स्मार्टफोन रूट करणे म्हणजे नेमके काय

*स्मार्टफोन रूट करणे म्हणजे नेमके काय? रूट करण्याचे फायदे तसेच तोटे काय?*

*रूट म्हणजे नेमके काय?*

थोडक्यात सांगायचे झाले तर ज्याप्रमाणे कॉम्प्युटर ला guest आणि administrative असे दोन अकाउंटस् by default कार्यरत असतात. Administrative अकाउंटस् च्या हातामध्ये कॉम्प्युटर चा पूर्ण ताबा असतो. कुठलेही सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, फाईल्स विषयी ओपेरेशन चे सर्व अधिकार असतात. तसे guest अकाउंट ला हि कॉम्प्युटर वापरता येतो परंतु खूप सारे restrictions guest अकाउंट ला असतात. महत्वाचे ओपेरेशन कॉम्प्युटर वर करण्याची guest अकाउंट ला परवानगी नसते. त्यासाठी अडमीन अकाउंट ची परवानगी guest अकाउंट ला हवी असते.
अगदी त्याचप्रमाणे अँड्रॉइड प्रणाली किंवा ios प्रणाली वर चालणाऱ्या स्मार्टफोन वर दोन user mode अकाउंट असतात.
1. नॉर्मल/जनरल user
2. सुपर user

कंपनीतुन तयार होऊन बाहेर पडणाऱ्या ios किंवा अँड्रॉइड स्मार्टफोन वर नॉर्मल user अकाउंट हे बाय डिफॉल्ट enable करून देण्यात आलेले असते. या बाय डिफॉल्ट अकाउंट च्या मदतीने आपण सिस्टम प्रणालीच्या खूप खोलवर न जाता आपणांस दैनंदिन गरजेची कामे अगदी सहजपणे करता येतात. परंतु या नॉर्मल user ला ios किंवा अँड्रॉइड प्रणालीचा सर्वच फिचर चा उपयोग करता येत नाही. मात्र सुपर user ला सिस्टम चे सर्व फिचर्स चा फायदा हवा तसा उठवता येतो. हे सुपर user अकाउंट स्मार्टफोनवर enable करण्यासाठी ios प्रणालीवर जेलब्रेकिंग व अँड्रॉइड प्रणालीवर रूट प्रोसेस पूर्ण करावी लागते.

Root म्हणजे मूळ. रुटिंग प्रोसेस किंवा जेलब्रेकिंग प्रोसेस मुळे आपण डिव्हाईस च्या खोलवर अगदी मुळापर्यंत जाण्यास यशस्वी होती. म्हणजेच आपल्या हाती डिव्हाईस चा पूर्ण ताबा येऊन आपण सिस्टम मध्ये हवे तसे फेरबदल करू शकतो. सिस्टम शी किंवा डिव्हाईस हार्डवेअर शी छेडछाड करण्याची authority हि फक्त सुपर user लाच असते.
तर आपण डिव्हाईस रूट करण्याच्या प्रोसेसवर प्रकाश टाकू.-

● *_स्मार्टफोन डिव्हाईस रूट कसे करावे_* ●

आपला स्मार्टफोन रूट करण्यासाठी आपण ऍप्स ची मदत घेऊ शकता. असे ऍप्स इंटरनेट वर भरपूर उपलब्ध आहेत. परंतु रूट प्रोसेस चे गांभीर्य म्हणा किंवा धोका लक्षात घेता अगदी कमीत कमी स्टेप्स मध्ये डिव्हाईस रूट कसे करता येऊ शकेल हे पाहणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे kingroot किंवा kingoroot या ऍप्सच्या मदतीने आपण केवळ एका क्लिक मध्ये आपले डिव्हाईस रूट करू शकता.
(नोंद - स्मार्टफोनची बॅटरी मुबलक प्रमाणात असतानाच व इंटर्नल मेमरी बऱ्यापैकी रिकामी असतानाच रूट प्रोसेस चालू करा अन्यथा आपले डिव्हाईस कायमस्वरूपी brick/death होऊ शकते)

● *डिव्हाईस रूट करण्याचे फायदे* ●
_डिव्हाईस रूट करण्याचे खूप सारे फायदे आहेत._

1. कंपनीने अगोदरच इन्स्टॉल करून दिलेले ऍप्स(Predefined Apps) नॉर्मल user ला uninstall करता येत नाही. डिव्हाईस रूट केल्यानंतर आपण हे ऍप्स सहजरित्या हटवू शकता.

2. बॅटरी जास्त काळ टिकते.

3. Kernal(ऍप्लिकेशन आणि हार्डवेअर मधला दुवा) व प्रोसेसर चा पूर्ण ताबा हाती येतो. त्यामुळे त्याचा हवा तसा उपयोग करून स्मार्टफोन चा परफॉर्मन्स वाढवता येतो.

4. रॅम चा लोड कमी करता येतो.

5. Installed ऍप्स च्या कोड मध्ये फेरफार करता येतात.

6. परफॉर्मन्स वाढून स्मार्टफोन हँग होण्याचे प्रमाण कमी होते.

7. थर्ड पार्टी ऍप्स सहजरित्या इन्स्टॉल करता येतात.

8. मेमरी कार्ड ची उपलब्ध मेमरी इंटर्नल मेमरी मध्ये convert करता येते. त्यामुळे परफॉर्मन्स अजूनच वाढतो.

9. सिस्टम चे Official उपडेट्स येण्याअगोदर मेमरी फ्लॅश च्या मदतीने सिस्टम अपडेट करता येऊ शकते.

● *डिव्हाईस रूट करण्याचे तोटे* ●
_रूट करण्याचे फायद्यांबरोबर अनेक तोटेही आहेत. ते आता आपण पाहुयात._

*1. वॉरंटी समाप्त होते.-*
सॅमसंग, गुगल नेक्सास, मोटोरोला, मायक्रोमॅक्स सारख्या बड्या कंपन्यांची वारंटी स्मार्टफोन रूट केल्यानंतर तात्काळ समाप्त होते. त्यामुळे मोबाईल रूट केल्यानंतर त्यामध्ये काही बिघाड झाल्यानंतर वॉरंटी पिरियड चालू असतानाही दुरुस्तीसाठी आपणांस पैसे मोजावे लागतील.

*2. Brick/Death-*
रुटिंग प्रोसेस चालू असताना काही स्टेप्स स्किप झाल्या किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यास आपले डिव्हाईस सॉफ्ट किंवा हार्ड brick होऊ शकते.

*3. सिस्टम फाईल्स शी छेडछाड केल्यास-*
रूट केल्यानंतर आपला पूर्ण ताबा डिव्हाईस वर येतो. आपल्या हाती डिव्हाईस चा पूर्ण ताबा येतो. त्यामुळे आपण सिस्टम ची हिडन स्वरूपातील डिरेक्टरीस ऍक्सेस करू शकता यामध्ये सिस्टम फाईल्स चा समावेश होतो. आपण जर काही माहिती नसताना या फाईल्स च्या value मध्ये छेडछाड केल्यास आपले डिव्हाईस तात्काळ बंद पडू शकेल.

*4. हॅकर्सच्या निशाण्यावर-*
डिव्हाईस जोपर्यंत नॉर्मल user मोड वर असते तोपर्यंत अँड्रॉइड प्रणालीच्या सायबर सुरक्षितेवर गुगल कडून लक्ष दिले जाते. ज्यावेळी डिव्हाईस रूट केले जाते त्यावेळी गुगल कडून सदर डिव्हाईस चा security आणि privacy सपोर्ट काढून घेतला जातो. त्यामुळे असे डिव्हाईस हॅक करणे व आपल्या महत्वाच्या फाईल्स हॅकर्स ला चोरणे सोपे जाते. त्यामुळे रूट केल्यानंतर कुठलेही ऍप्स इन्स्टॉल करताना थोडी काळजी घेतली गेली नाहीतर आपण हॅकर्स च्या निशाण्यावर याल व आपली महत्वाची व गुप्त स्वरूपाची माहिती चोरी होऊ शकेल.

_(Recommendation- खरंच गरज असेल तरच स्मार्टफोन रूट करा. आजच्या घडीला आपण डिव्हाईस रूट न करताही अनेक महत्वाचे ऑपरेशन्स स्मार्टफोन वर करणे शक्य झाले आहे. जरी आपण स्मार्टफोन रूट केला तरीही अगदी सहजरित्या तो unroot हि करू शकता.)

No comments :

Post a Comment