देशातील पहिल्या १३ जिल्ह्यात सांगली*
Published On: Sep 12 2017
सांगली : प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता दर्पण रँकिंगमध्ये सांगली जिल्हा देशातील पहिल्या तेरा जिल्ह्यात आला आहे. सांगली जिल्ह्याने 158 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. सांगली लवकरच देशातील पहिल्या दहा जिल्ह्यात स्थान पटकावेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) दीपाली पाटील उपस्थित होत्या. केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यांचे रँकिंग सुरू केले आहे. शंभर गुणांवर आधारित हे रँकिंग आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त गाव, वैयक्तिक शौचालय सुविधा, शौचालय सुविधांसाठी केलेले प्रयत्न, पाठपुरावा यासाठी 50 गुण आहेत.
स्वच्छ भारत मिशनमधील सातत्य, प्रचार व प्रसार निधीच्या खर्चाची उपयोगिता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यासाठी 25 गुण आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामातील पारदर्शीपणासाठी 25 गुण आहेत. यामध्ये शौचालय सुविधांबाबतचे फोटो अपलोड करणे, हागणदारीमुक्त गावांची पडताळणी, आधार मॅपिंगचा समावेश आहे. सांगली जिल्ह्याने देशातील पहिल्या 13 जिल्ह्यात, तर महाराष्ट्रात पहिल्या तीन जिल्ह्यात स्थान पटकावले आहेत. राज्यात सातारा जिल्हा नंबर एक, सिंधुदूर्ग जिल्हा दोन नंबरवर आहे. सांगली जिल्हा तिसर्या क्रमांकावर आहे.
No comments :
Post a Comment