पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 26 September 2017

सुनीता विल्यम्स

सुनीता विल्यम्स

*🔆सुनीता विल्यम्स🔆*


 (सप्टेंबर १९, इ.स. १९६५ - हयात) ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे . २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम पहिले.

*♣सुरुवातीचे आयुष्य♣*

सुनीताचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या होते तर तिची आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या हे होते. सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना अँना हि ३ वर्ष मोठी आहे.

सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हाय स्कुल मधून ग्रॅजुएट झाली. तिला १९८७ साली युनायटेड स्टेटस नेव्हल अकॅडेमि कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्स ची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्स ची पदवी मिळाली .

*♣शिक्षण♣*

• नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.
• बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७.
• एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.

*♣मिलिटरी करिअर♣*

सुनीता विल्यम्स मे १९८७ ला युनाइटेड स्टेट्स नेव्ही मध्ये रुजू झाल्या. नेव्हल कोस्टल सिस्टिम कमांडमध्ये सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांची बेसिक डायविंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली.पुढे त्यांची जुलै १९८९ मध्ये नेव्हल एव्हिएटर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सप्टेंबर १९९२ मध्ये अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी मियामी, फ्लोरिडा येथे झालेल्या रिलीफ ऑपेरेशनमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. पुढे त्यांनी पायलट पद भूषविले. जून १९९८ मध्ये त्या सैपान येथे नियुतत असतांना त्यांची अवकाश मोहिमेकरिता नासा मध्ये निवड झाली.

*♣नासा करिअर♣*

सुनीताचे अंतराळवीर उमेदवारीचे प्रशिक्षण ऑगस्ट १९९८ मध्ये जॉन्सन स्पेस सेंटर येथे सुरु झाले . मार्च २०१६ पर्यंत सुनीताने एकूण ७ वेळा मिळून ५० तास ४० मिनिटे स्पेसवाक पूर्ण केले. जास्त स्पेसवाक केल्यामुळे ती सर्वाधिक अनुभवी अंतराळवीरांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचली

No comments :

Post a Comment