पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday 26 September 2017

अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे


साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.

अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ
कलाकृतींची निर्मिती झाली.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

*अण्णाभाऊ साठे*

*लोकशाहिर व् समाजसुधारक*
*जन्मदिन-१आॅगस्ट १९२०*
*स्मृतिदिन - १८ जुलै १९६९*

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव इथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील आगळं-वेगळं साहित्यसंचित आहे. लावण्या, पोवाडा, वगनाट्याद्वारे त्यांनी जनजागृतीचे काम केले. १ ऑगस्ट १९२० रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे आणि वालुबाई यांच्या पोटी आण्णांचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची व हलाखाची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णा शाळेत फक्त दोनच दिवस गेले. बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीतच झाले. आम्हीही ही माणसं आहोत, आम्हालाही सुखाने, स्वाभिमानाने व स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. या न्याय्य मागणीने अण्णा पेटून उठले.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती.
वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन ते मुंबईत आले. पण पुढे १९६३ मध्ये अण्णांनी मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने केला. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे, `आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे`. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालचीस हाक' हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतरचे त्यांचे कवन, `जग बदल घालूनी घाव, गेले सांगून भिमराव' प्रसिध्द झाले तर `फकिरा' ही कादंबरी डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अण्णांनी अर्पण केली होती. अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे त्यांनी उभी केली. ग्रामीण पददलित लाचारीने जगणार्‍या माणसाचे साहित्य जीवन त्यांनी समाजासमोर उभे केले. फकिरा, माकडीचा माळ, मास्तर, गुलाम, भुताचा माळ, वारणेचा वाघ या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या. समाजाचा अचूक ठाव घेणारा लोकशाहीर म्हणून त्यांनी मान्यता मिळविली.
अण्णाभाऊंचं झोपडीवर अतिशय प्रेम होतं. ` जे जगतो तेच मी लिहितो` असं ते सांगत. ४५ कादंबर्‍या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिध्द झाले. अण्णाभाऊ माटुंग्याच्या लेबर कँपमध्ये रहायचे. इथेच त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कोणतीही ज्ञानाची शिक्षणाची परंपरा इथे त्यांना लाभली नाही. आज त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी संस्थांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहेत. माटुंग्याच्या लेबर कँपमधील मंडळीं विशेषत: नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली. याच कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट' होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना झाली. इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ व गव्हाणकर एकत्र आले.
फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते कळवळून सांगतात. `द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला । आवरोनी हात आपुला । भारतियांनो इभ्रत तुमची ईषेला पडली । काढा नौका । देशाची वादळात शिरली । धरा आवरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली । काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली।`
आजच्या काळातही ही लावणी उपयोगीच ठरते. त्यांचे `इनामदार` हे नाटक त्यात खेड्यातील `सावकारी पाश' शेतकर्‍यांभोवती कसे आवळले जातात. आणि गुन्हेगारीला प्रवृत्त होतात याचं चित्र स्पष्ट करते. आजही शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्येच्या वेळी हे नाटक आठवून जाते. पण हे नाटक मराठीत फारसं चाललं नाही. हिंदी रुपांतर मात्र लोकांना भावले.
अण्णांनी तमाशाला नवेरुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोकशिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय आण्णाभाऊंकडेच जाते. १९४८, १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली. वाटेगावहून मुंबईत वडिलांच्याबरोबर पायी चालत आलेला आण्णा विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन रशियाला गेला तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा' ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. `सुलतान` ही कथा लोकांना आवडली होती. तर `स्टालिनग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. या पार्श्वभूमीवर रशियात गेल्यानंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं. त्यांनी मुंबईची लावणी लिहून वास्तववादी भीषण अशा मुंबईच्या विषमतेचे दर्शन घडविले `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झाली. जगातील व भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल' साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. जगण्यासाठी लढणार्‍या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत. ते १९५७ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. असा हा पददलितांच्या जीवनावर वास्तव लिहणारा साहित्यकार सांगली जिल्ह्यात जन्मला होता.
अशा या वादळाच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
अण्णाभाऊ साठे जयंती


 प्रजातान्त्रिक हुकूमत के सामने रेंगती हुई पाई जाती है, जो किसी के शमशान की यात्रा को या तो अनेक रंगों से सबोरती है या अपना कैमरों में ही कफ़न लगा देती है, वो समय जहाँ सरकार कलाकारों से लेकर हर वो स्वतंत्रता के मंजर पर प्रतिबन्ध लगाने पे तुली हैं, अण्णाभाऊ की लोक तमाशा एक मार्गदर्शक के रूप में नजर आती है. उम्मीद है, उनके सड़क की साहित्य और कला इस प्रजातंत्र को बेहतर करती रहेगी.

अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र के सांगली जिला के दलित मातंग समुदाय से थे. अपनी जाति और ग़रीबी के कारण वो बचपन में पढाई नहीं कर पाए. पढाई क्या नहीं कर पाए, जाति के भेदभाव स्कूल में उनसे बर्दाश्त नहीं हुआ. फिर सुखे के कारण, ११ साल की उम्र में, उनका परिवार मुंबई के ब्य्कुल्ला के एक चोल में रहना लगा.

आण्णाभाऊ साठे मुंबई में दो चीजों की ओर आकर्षित हुए – एक अलग राजनीतिक संगठन था और दूसरा मूक फिल्में. फिल्मों और विज्ञापनों के पोस्टर जो गली गली में थे, उनसे उन्होंने अपने आप को पढाया. अपने कैरियर एक मिल मजदूर के रूप में शुरू किया, फिर मुंबई के तेज जीवन और धरना, बैठकों, सत्याग्रह और विरोध प्रदर्शन की रोमांचक राजनीतिक जीवन का अनुभव करने के बाद, वोे एक तमाशा मंडली में शामिल हो गए.

अण्णाभाऊ की तेज आवाज, याद करने के लिए अपनी क्षमता, हारमोनियम, तबला, ढोलकी, बुलबुल की तरह विभिन्न उपकरणों खेल में अपने कौशल, तमाशा की दुनिया में उन्हें स्टार बना दिया. क्यूंकि खुद वो बहुत कामों में मजदूरी किये थे इसलिए उनकी बातें और सोच हमेशा समाज के अंतिम व्यक्ति तक पहुँचती थी.

भारत के स्वतंत्रता आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन और गोवा मुक्ति आंदोलन के दौरान सामाजिक जागरण की ओर काफी योगदान दिया. कलाकार के रूप में हर कार्यक्रम और विरोध प्रदर्शन में भाग लिया. उनकी लावणी, पोवाडा लोक कला की पृष्ठभूमि थी और सड़क उनके साहित्य के लिए खेलता रहा.

1945 में साप्ताहिक लोकयुद्ध के लिए एक पत्रकार के रूप में काम करते हुए वह बेहद लोकप्रिय बने. आम आदमी के दुख के बारे में विशेष रूप से लेखन, एक लेखक के रूप में अन्न्भाव की अद्भुत सफलता के पीछे कारण है.
इसी अखबार में काम करते वक़्त उन्होंने अक्लेची गोष्ट, खाप्र्या चोर, मजही मुंबई जैसे नाटक लिखे. १९५० से १९६२ के बीच उनके अनेक उपन्यास भी प्रकाशित हुए जिनमें वैजयंता, माक्दिचा माल, चिखालातिल कमल, वार्नेछा वाघा, फकीरा शामिल है. उनकी लाल बावटा (वामपंथी कला मंच) और तमाशा पे इसी वक़्त सरकार ने प्रतिबन्ध लगाया था, जिसके बाद वो इन्हें फोल्क गीत में तब्दील कर दिए, और प्रतिबन्ध के कोई मायने न रहे.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

Annabhau Sathe – Social Reformer

Annabhau Sathe was a social reformer and writer from Maharashtra, India.
Annabhau Sathe was born in the village of Wategaon near Sangli in a family belonging to the Matang community. (The community has been identified by the Indian government as a scheduled caste.)
Poverty had prevented Annabhau from obtaining formal education. His brother Shankarbhau recounts in his biography of Sathe, titled Majhe Bhau Annabhau (My brother Annabhau), that the family members worked as laborers at the site of Kalyan tunnel when it was being constructed.
Despite lack of formal education, Annabhau Sathe wrote in Marathi 35 novels, one among which was Fakira (1959). Fakira, which is currently in its 19th edition, received a state government award in 1961.Vaijanta is the remarkable one.

There are 15 collections of Annabhau Sathe’s short stories. A large number of his short stories have been translated into many Indian and as many as 27 non-Indian languages.
Besides novels and short stories, Annabhau Sathe wrote a play, a travelogue on Russia, 12 screenplays, and 10 ballads (powade in Marathi).
Annabhau Sathe wrote directly from his experiences in life, and his novels celebrate the fighting spirit in their characters who work against all odds in life.
Lok Rajya, a Maharashtra state government fortnightly, published on November 1, 1993, a special commemorative issue concerning Annabhau Sathe. The state government also issued in 1998 a collection of his works under the title Lokshahir Annabhau Sathe Nivadak Sahitya. (Selected works of Lokshahir Annabhau Sathe)
To generate social awareness, he organized stage performances of powade and tamasha, ethnic dances chiefly performed by women, which are popular in rural Maharashtra. He produced 14 tamasha shows. In the late 1940s, the then Home Minister of the Bombay state government Morarji Desai had banned tamasha shows, but Annabhau Sathe courageously defied the ban by renaming them as lokanatya. People in Maharashtra conferred the epithet lok shahir on Annabhau Sathe.

Sathe was an important mobilizer in the Samyukta Maharashtra movement. He used the medium of powade to great effect in that movement. Annabhu sathe was the member of Matang Samaj Community at Satara and Sangli districts of Maharashtra.
Annabhau Sathe lived a life of destitution. After spending 22 years in a Ghatkopar slum, Sathe moved to a modest house in Goregaon which the state government provided him in 1968, one year before he died.
Annabhau Sathe decided to bring awareness among the masses against Brahminism which imposed untouchability and virtually compelled the deprived lot to take recourse to criminal and filthy occupations against the British Government which imposed the Criminal Tribes Act and subjected his community to harassment and against the forces of feudalism and capitalism which exploited his community and made life unbearable. He used his art and poetic genius in educating the masses.

No comments :

Post a Comment