पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 26 September 2017

कल्पना चावला

कल्पना चावला


कल्पना चावला

आकाशाला आपल्या कवेत घेतलेल्या कल्पनांबद्दल, थोडेसे.

अवकाश आणि अवकाशवीर हा विषय निघाल्यावर कल्पना चावला ची आठवण निघाल्याशिवाय विषयच पूर्ण होऊ शकत नाही. चला आज जाणून घेऊया कोण होत्या कल्पना चावला आणि त्यांचे

कार्य.

कल्पना चावला
अनेकांना असा गैरसमज आहे कि कल्पना चावला या भारतीय अंतराळवीर होत्या, तसे नसून त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर होत्या. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ मध्ये हरियाणा येथे झाला.

शिक्षण


टागोर बाळ निकेतन – कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण येथे झाले.
अंतराळवीर बनण्या साठी नक्कीच त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. तरीही त्यांचे शालेय शिक्षण हे गावातीलच शाळेत झाले, वर फक्त उच्च-शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठ्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमात मुले भरती करणाऱ्यांसाठी हे एक उदाहरण ठरू शकते. पंजाब मध्येच १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च-अभियांत्रिकी शिक्षण घेतले आणि १९८८ साली कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळवली.

कार्य

१९८८ मध्ये त्यांनी नासा एम्स रिसर्च सेंटर मध्ये Vertical/Short Takeoff and Landing वर संगणकीय द्रव प्रेरक शक्ती [ Computational fluid dynamics (CFD) ] चे संशोधन केले. १९९३ मध्ये त्या ओवरसेट मेथड्स व्हाईस प्रेसिडेंट आणि संशोधक म्हणून रुजू झाल्या. १९९१ मध्ये

अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारल्यावर त्यांनी नासा ऍस्ट्रोनात कॅम्प मध्ये मध्ये भरती होण्याचा अर्ज केला होता. त्या मार्च १९९५ मध्ये कॉर्पस मध्ये निवडल्या गेल्या व १९९६ मध्ये त्यांची १५ व्हा अंतराळवीर समूहात उड्डाणासाठी निवड झाली. विना गुरुत्वाकर्षणाच्या पोकळीत प्रवास करताना त्या म्हणाल्या होत्या “तुमची बुद्धिमत्ता हेच तुम्ही आहेत” [“You are just your intelligence”]. त्यांनी १०६.७ लाख किमी ३७६ तास व ३४ मिनिट प्रवास केला, जो पृथ्वीच्या परिघाच्या २५२ पट आहे.

मृत्यू

१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आणखी काही

तुम्हाला हे माहित आहे का? कराडच्या टिळक हायस्कुल मध्ये संजय पुजारी या शिक्षकाने, कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरु केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी व अश्या अनेक कल्पना चावला घडाव्यात यासाठी केलेल्या या परिश्रमांसाठी संजय सरांनाही सलाम.


कल्पना चावला विज्ञान केंद्र
हे केंद्र १ जुलै २००६ रोजी सुरु करण्यात आले. येथे कल्पना चावला चे वडील व बहीण भेट देऊन गेलेले आहेत. तुम्ही कधी जाताय? या विज्ञान केंद्रात ग्रंथालय, विज्ञानाशी संबंधित वाचन सामग्री, पर्यावरण संबंधी माहिती साहित्ये उपलब्ध आहेत. थ्री इडियट्स च्या अमीर खान ने सुरु केलेल्या शाळेसारखी, “शाळेबाहेरची शाळा.”
अश्या अनेक कल्पना चावला या भारत भूमीच्या कुशीत घडत राहो हि इच्छा.

No comments :

Post a Comment