पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Friday, 15 September 2017

स्वच्छता ही सेवा

  स्वच्छता  ही  सेवा 

     कालावधी   १५ सप्टेंबर  ते   २ अॉक्टोबर  

   

 

स्वच्छतेचे महत्त्व

* स्वच्छतेचे महत्त्व *


स्वच्छता म्हणजे फक्त बाह्य स्वरूप नाही.तर स्वछता हे आरोग्यदायी जीवनाचे बहुसमावेशक तत्व आहे.ती मनाची व अंतः करणाची अवस्था देखील आहे. ज्यामध्ये आपली नैतिक मूल्ये आणि उपासना यांचा समावेश होतो. गावागावातून ज्यांनी स्वच्छतेचे धडे दिले त्या संत गाडगेबाबांना एकाने प्रश्न विचारला , बाबा आपण मंदिरात का येत नाहीत? तेंव्हा बाबा बोलले अरे देव दगडात नाही तर माणसात आहे. आणि त्याच्या निरोगी जीवनासाठी मला हा मंदिराबाहेरील पडलेले फुले, नारळाचा कचरा साफ करणे गरजेचे वाटते. त्यांचा हा विचार आपल्याला अगदी विचार करायला लावणारा आहे.
जगभरात स्वच्छतेविषयी एकसमान दर्जे नाहीत आणि वेगवेगळ्या लोकांना स्वच्छतेविषयी वेगवेगळ्या कल्पना असतात. पूर्वी, शाळेचा परिसर स्वच्छ, नीटनेटका असायचा आणि त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी चांगल्या सवयी लागत असतात.
दररोजच्या जीवनात किंवा व्यापारी जगातही स्वच्छतेच्या बाबतीत प्रौढ नेहमीच आदर्श नसतात. जसे की, पुष्कळशी सार्वजनिक ठिकाणे घाणेरडी, गलिच्छ असतात. काही कंपन्यांमुळे वातावरणात प्रदूषण होते. प्रदूषणाला, कारखाने आणि व्यापार नव्हे तर त्यातील लोक जबाबदार आहेत. प्रदूषण व त्याच्या दुष्परिणामांच्या जागतिक समस्येचे प्रमुख कारण स्वार्थ असला तरीही लोकांच्या अस्वच्छ वैयक्तिक सवयी देखील काही अंशी याला कारणीभूत आहेत. ऑस्ट्रेलियन राष्ट्रसंघाचे भूतपूर्व अध्यक्ष यांनीही या निष्कर्षाला सहमती दर्शवत असे म्हटले: “सार्वजनिक आरोग्यासंबंधीचे सर्व प्रश्न प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मुलावर अवलंबून आहेत.”
स्वच्छता स्वतः पासून सुरु करा . वैयक्तिक  स्वचतेच्या लक्ष्मण रेषा पाळल्या की सामाजिक स्वच्छता आपोआपच घडून येते.
म्हणूनच घेऊ वसा मन प्रसन्न करण्याचा,
 शरीर निरोगी करण्याचा , घर -परिसर स्वच्छ ठेवण्याचा,समाज निरोगी करण्याचा!!

      जल प्रतिज्ञा



            मी प्रतिज्ञा करतो की
पाणी हे जीवन असुन
त्याचा वापर गरजे पुरता व काटकसरीने करेन .

मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही.

नैसर्गिक प्रवाह जलाशय कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभुत सुविधांचे मी रक्षण करेन.

पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन.

पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन.

पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे. ही माझी सामाजिक बांधीलकी मानुन. त्याचे सदैव पालन करीन.

*जयहिंद जय महाराष्ट्र* 


No comments :

Post a Comment