जुन्या मोबाइलचा CCTV म्हणून वापर
रजेच्या वेळी जुन्या मोबाइलचा CCTV म्हणून वापर करुन वर्गावर LIVE नियंत्रण ठेवणे
1) जूना मोबाइल चार्जिंगसह सर्व वर्गातील विद्यार्थी दिसतील अश्या ठिकाणी लावून ठेवा.
2) जुन्या मोबाइलमध्ये At home video streamer - monitor हे app (निळ्या रंगाचे) इंस्टॉल करावे।app ओपन केल्यावर Generate QR code वर क्लिक करावे.3) वापरात असलेल्या आपल्या दुसऱ्या मोबाइलमध्ये At home camera हे app(लाल रंगाचे) इंस्टॉल करावे. app ओपन केल्यावर उजव्या कोपरातील + या चिन्हावर क्लिक करावे.
4) पुढे Add camera by QR code वर क्लिक करावे.
5) त्यानंतर जूना मोबाइल खाली धरून व् आपला स्वतःचा मोबाइल त्यावर पकडून जुन्या मोबाइलमधील QR कोड स्कॅन करावे.
6) आता आपल्या मोबाइल मध्ये live CCTV सुरु होईल. आपण रजेच्या वेळी घरी बसून वर्गात विद्यार्थी अभ्यास कसे करतात ,हे पाहू शकतो.
7) दोन्ही मोबाइलमध्ये इंटरनेट असावे लागते. मोठ्या स्पीकरच्या साह्याने रजेच्या वेळी विद्यर्थ्याना अभ्यासाच्या सूचना आपण देवू शकतो.
No comments :
Post a Comment