पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 26 September 2017

जलद आणि सोप्या पध्दतीने USB Drives remove करा

जलद आणि सोप्या पध्दतीने USB Drives remove करा

जलद आणि सोप्या पध्दतीने USB Drives remove करा.

कल्पना करा कि, तुम्ही USB drive मध्ये काम केल्यानंतर तुम्हाला तो disconnect करावयाचा आहे आणि तेव्‍हा तुम्हाला स्क्रिनवर – “The volume can't be ejected because it's currently in use ...” असा मॅसेज दिसतो. Background मध्ये प्रोसेस चालू असल्यामुळे असा मॅसेज दिसतो, आणि यावेळी तुम्हाला हि चालू असलेली प्रोसेस Task Manager मध्ये जाऊन बंद करावी लागते. तसेच USB drive eject करण्यासाठी त्या drive वर right click करुन Eject करावे लागते, जे अनेकांना नको असते. मग अश्या वेळी तुमच्या मदतीला USB Disk Ejector हा प्रोग्रॅम आहे.
USB Disk Ejector हा एक छोटा आणि open source code असलेला प्रोग्रॅम आहे जो अतिशय जलद गतीने USB drive विंडोज मधून disconnect करतो. हो प्रोग्रॅम USB disks, Firewire disks आणि memory cards eject करतो. हा एक जलद गतीचा, लहान आकाराचा विंडोज मधील USB disconnect करण्याच्या पध्दतीला पर्याय म्हणून आहे. हा प्रोग्रॅम Windows XP, Vista, 7 आणि Server मध्ये चालतो.
हा प्राग्रॅम आकाराने अतिशय लहान आहे, याचा आकार 1 MB पेक्षाही कमी आहे, तसेच तो इन्स्टॉल करावा लागत नाही. फक्त रन करुन जो drive disconnect करावयाचा आहे, त्यावर डबल क्लिक करावे. तसेच यातील More या बटनावर क्लिक करुन आपण हवा असलेला drive disconnect करण्यासाठी शॉर्टकट किज देखील सेट करुन ठेऊ शकतो. आणि नंतर भविष्यात जेव्हा हा USB drive disconnect करावयाचा असेल तेव्हा फक्त या शॉर्टकट किज चा वापर करावा.

No comments :

Post a Comment