सहपत्र फ
मूल्यवर्धन कार्यक्रम
पर्यवेक्षकीय अधिकारी सहविचार बैठक अहवाल
स्थळ: विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र शासन, पुणे
पार्श्वभूमी:
२०१५ पासून महाराष्ट्र राज्यात ३४ जिल्ह्यांत मूल्यवर्धन हा कार्यक्रम चालू आहे. हा कार्यक्रम सर्व जिल्ह्यातील प्रत्येकी एका केंद्रातील सर्व मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरु आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावी रीतीने होण्याच्या दृष्टीने पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचा पुरेसा परिचय होणे आवश्यक असल्याने शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यवेक्षकीय अधिकारी सहविचार बैठक घेण्याचे नियोजन होऊन ही बैठक दिनांक १५ व १६ डिसेंबर २०१६ रोजी पार पडली.
मूल्यवर्धन कार्यक्रमात निनिराळ्या पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व भूमिका
१. मुख्याध्यापक / प्रभारी मुख्याध्यापक
· संपूर्ण मूल्यवर्धन उपक्रमांचे शिक्षकांच्या सहकार्याने वार्षिक नियोजन करावे.
· शिक्षकांना मूल्यवर्धनसाठी प्रेरित करावे आणि व त्यांच्या बरोबर अंमलबजावणी संदर्भात चर्चा करावी.
· मुख्याध्यापकाने आठवड्यातून एकदा / महिन्यातून एकदा मुलांचा मूल्यवर्धनचा एक तास घ्यावा / मुलांबरोबर चर्चा करावी / एखाद्या तासिकेला हजर राहावे.
· मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिकांची तपासणी करावी.
· तासिका अपेक्षित पद्धतीने घेतात का? सर्व मुलांचा सहभाग असतो का? याचे निरीक्षण करावे.
· माता संघ, पालक संघ तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठ्कामध्ये मूल्यवर्धनचे सादरीकरण करावे.
· मूल्यवर्धन उपक्रमांना आवश्यक साहित्याची यादी करून साहित्य तयार ठेवावे.
· प्रत्येक वर्गाच्या आठवड्याला तीन मूल्यवर्धन तासिका होतात का, याची पडताळणी करावी.
· दर शनिवारी शिक्षकांची बैठक घेऊन झालेल्या उपक्रमांचा आढावा घ्यावा. मूल्यवर्धन संबंधी येणारे चांगले अनुभव, समस्या, मुलांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये कार्यक्रमामुळे वर्तनबदल यावर चर्चा करावी.
· वर्गनियमांची अमलबजावणी होते का नाही याची पडताळणी करावी.
· घेतलेला आढावा हा केंद्रप्रमुखांकडे सादर करण्यात यावा. (बैठकीमध्ये / लिखित नमुन्यात सादर करावा.)
· ज्या शिक्षकांचे मूल्यवर्धनविषयी प्रशिक्षण झालेले नाही, अशा शिक्षकांना त्याविषयी संकल्पना आणि अंमलबजावणीची पद्धत समजून सांगावी.
· वरिष्ठ पातळीवरून मूल्यवर्धनसंबंधी आलेल्या सूचना शिक्षकांपर्यंत पोहोचवाव्यात.
· शाळेतील मूल्यवर्धन कार्यक्रमासंबंधी चित्रीकरण करून ठेवावे. फोटो काढावेत. whats app वर शेअर करावेत.
२. केंद्रप्रमुख :
· महिन्यातून २ वेळा प्रत्येक शाळेस भेट देऊन किमान अर्धा तास मूल्यवर्धनसाठी द्यावा.
· शाळाभेटीच्या वेळी वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा.
· शाळाभेटीच्या दरम्यान वर्गात जाऊन मुलांबरोबर चर्चा करावी, संवाद साधावा व मुलांचा प्रतिसाद जाणून घ्यावा.
· शाळाभेटीच्या दरम्यान मूल्यवर्धन तासिकांचे निरीक्षण करावे व शिक्षकांना मार्गदर्शन करावे.
· प्रत्यक्ष वर्गभेटी कराव्यात किंवा एखादा मूल्यवर्धनचा उपक्रम /तास घ्यावा.
· शिक्षकांकडून मूल्यवर्धनबाबत अधिकच्या प्रशिक्षणाची गरज असल्यास गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी करावी.
· व्हिडीओ क्लिप्स एकत्रित करून त्या वेगवेगळ्या शाळेत दाखवाव्यात अथवा त्या शाळांना देण्यात याव्यात.
· शाळानिहाय विद्यार्थांमध्ये दिसून आलेल्या बदलांची विशेष नोंद घ्यावी.
· शालेय व्यवस्थापन समितीची सभा/ पालक सभा इ. सभेत केंद्रप्रमुखांनी मूल्यवर्धनविषयी माहिती द्यावी.
· शाळेचा चांगला उपक्रम हा सामाजिक माध्यमे व साईटवर शेअर करावा.
· मूल्यवर्धन संबंधित साहित्याचा वापर केला जातो का नाही याची पडताळणी करावी.
· मुख्याध्यापकांकडून प्राप्त झालेला आढावा विषयक माहितीची शहानिशा करावी आणि त्या विषयीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर विस्तार अधिकारी यांच्याकडे पाठवून द्यावा.
· केंद्रस्तरावर बैठकीमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल चर्चा घडवून आणावी. कार्यक्रम राबवताना येणाऱ्या समस्या / अडचणी यावर चर्चा करावी व त्यावर उपाययोजना करावी. (आढावा घ्यावा.)
· केंद्रातील चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करावे आणि इतर शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे.
· केंद्रस्तरावर बैठकीमध्ये चांगल्या उपक्रमांचे, प्रात्यक्षिकांचे आयोजन करावे.
३. विस्तार अधिकारी :
· शाळा भेटीच्या वेळी मूल्यवर्धन तासिका पहावी. मुख्याध्यापक शिक्षकांशी चर्चा करावी.
· चांगले उपक्रम घेणारे शिक्षक व शाळा यांना प्रोत्साहित करून त्यांची नोंद करून घ्यावी.
· दरमहा भेटीत संपूर्ण आढावा घ्यावा. किमान एक तासिका पहावी. विद्यार्थांचा प्रतिसाद व प्रत्यक्ष सहभाग पहावा. परिणामकारकता तपासावी.
· मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी केंद्रप्रमुखांशी चर्चा करावी. मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आढावा घेऊन त्याची पडताळणी करावी.
· ज्या केंद्रामध्ये मूल्यवर्धनचे काम चांगले चालले आहे, त्या केंद्रप्रमुखांना प्रोत्साहन देऊन इतर केंद्रप्रमुखांना त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास सांगावे.
· पंचायत समितीमध्ये मूल्यवर्धनचे सादरीकरण करावे.
· बीटस्तरावर शिक्षकांच्या मागणीनुसार प्रशिक्षणाचे आयोजन करावे.
· वार्षिक तपासणी करताना जाणीवपूर्वक मूल्यवर्धन उपक्रमांचा आढावा घ्यावा.
· बीटस्तरावर मूल्यवर्धनचा आढावा महिन्यातून एकदा घ्यावा.
· विस्तार अधिकारी यांनी मासिक अहवाल हा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यावा.
४. गट शिक्षणाधिकारी :
· एखाद्या शाळेला भेट देऊन विद्यार्थांची स्थिती व मूल्यवर्धनबाबत माहिती जाणून घ्यावी.
· मूल्यवर्धन संदर्भात शिक्षकांना अडचणी येतात का हे जाणून घेऊन अडचणी येत असल्यास त्यावर उपाययोजना सुचवाव्यात.
· केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडून मासिक बैठकीत मूल्यवर्धन कार्यक्रमाबाबत आढावा घ्यावा. त्यांच्याबरोबर चर्चा करावी.
· मूल्यवर्धन सादरीकरणाला वाव द्यावा.
· मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी होते किंवा नाही याची खात्री करावी.
· आलेल्या अहवालावरून शाळांना भेटी देणे, जेथे मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, तेथे त्यांना मार्गदर्शन द्यावे
· विद्यार्थांच्या वर्तनात झालेले बदल लेखी स्वरूपात ठेवण्यासाठी मार्गदर्शन करावे.
· मूल्यवर्धन कार्यक्रम असलेल्या केंद्रप्रमुखांना इतर केंद्रांचा अतिरिक्त भार देऊ नये.
· उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मूल्यवर्धन शिक्षकांचा विशेष कार्यक्रमात सन्मान करावा.
· शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्यात समन्वय साधून चर्चा व मार्गदर्शन करावे तसेच कार्यशाळाही घ्यावी.
पर्यवेक्षकीय अधिकारी बैठकीत झालेले निर्णय
१. सर्व जिल्ह्यात मूल्यवर्धन कार्यक्रम शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून चांगल्या प्रकारे स्वीकारला गेला आहे. आता या कार्यक्रमाचे संनियंत्रणाचे नियोजन अधिक पद्धतशीरपणे निश्चित करण्याची गरज आहे
२. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे संनियंत्रण कसे करावे आणि कोणत्या आराखड्यामध्ये माहितीचे संकलन करावे हे बैठकीत झालेल्या चर्चेनुसार अंतिम करण्यात येईल आणि कळविण्यात येईल. हे काम किमान आणि अर्थपूर्ण राहावे असा प्रयत्न करण्यात येईल
३. तथापि सर्वसाधारणपणे पर्यवेक्षकांनी हा कार्यक्रम समजून घेऊन, शाळा भेटींमध्ये या कार्यक्रमाचा आढावा घ्यावा, वर्गात कार्यक्रम पाहावा, चांगल्या कामाची दखल घ्यावी आणि दस्तावेजीकरण करावे.
४. मूल्यवर्धन कार्यक्रमाबाबत केंद्रस्तरावरील मुख्य प्रमुख समन्वयक व्यक्ती म्हणून (नोडल पर्सन) जबाबदारी विस्तार अधिकारी यांनी स्वीकारावी.
५. हा कार्यक्रम सुरु करण्याविषयी प्रायोगिक केंद्रातील शाळांशिवाय इतर अनेक केंद्रातून मागणी येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता अधिक विस्तार करण्याची गरज आहे.
६. कार्यक्रमाच्या विस्तारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून १५ संसाधन व्यक्तींची नावे बैठकीत विहित केलेल्या निकषानुसार विहित आराखड्यात ३१ डिसेंबरपर्यंत विद्या प्राधिकरणातील अभ्यासक्रम विकसन विभागास कळवावीत.
No comments :
Post a Comment