पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 30 August 2017

P C format

PC फॉर्मेट कसा करावा ?

आपला PC/LAPTOP सारखा प्रॉब्लम येत असेल तर फॉर्मेट करावा लागतो.तो कसा करावा यासाठी आपण खाली दिलेल्या पद्धतीने विंडोज इंस्टॉल करू शकतो.
१.डाटा बॅकअप : c ड्राइव मधे असलेला डेटा वीडियो,इमेजेस pendrive मधे बैकअप करून घ्या.
   
२. CD किंवा DVD किंवा आपण आपल्या CD / DVD चा किंवा USB प्राधान्य प्रथम बूट साधन ड्राइव्ह करणे आवश्यक आहे USB ड्राइव्ह पासून बूट करा. आपल्या संगणकावर निर्माते लोगो स्क्रीन दिसेल तेव्हा सेट BIOS मध्ये प्रवेश सुरू असताना, हे करण्यासाठीउत्पादकलोगो स्क्रीन दिसते तेव्हा आपल्या संगणकावर सुरूअसताना हे सेटिंग पृष्ठ दाबा F2 दाबाF10F12 किंवाडेली की मध्ये प्रविष्ट करा. (विशेषतः की स्क्रीन खाली प्रदर्शित केले जाईल
 ३ आता, BIOS मेनू मध्ये बूट मेन्यू पर्याय जा. आणिप्रथम बूट साधन म्हणून सीडी ड्राइव्ह करून बूट साधनक्रम बदलू. तुमची प्रणाली सुरू असताना या सीडी ऐवजीहार्ड डिस्क पासून बूट करेल. आता ठराविक दिवशी (F10 दाबून आणि या मे प्रणाली प्रणाली बदलते) आपल्या आपण केलेले बदल आणि बाहेर पडा जतन करा आपल्या
संगणक रीस्टार्ट होईल.
टीप: आपण USB ड्राइव्ह पासून प्रतिष्ठापन करत असल्यास, नंतर आपण प्रथम बूट साधन प्राधान्यकाढण्याची स्टोरेज सेट आहे
४    1BIOS सेटअप पूर्ण केल्यानंतर बूट डिस्क अंतर्भूत करा व संगणक पुन्हा सुरू करा. आणि ते तुम्हाला कळतसुरू असताना आता आपण एक संदेश दिसेल "सीडीपासून बूट करण्यासाठी कुठलिही कि दाबा ..." म्हणूनकीबोर्ड आणि Windows 7 सेटअप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे कोणत्याही कळ दाबा.


५  आता आपण Windows फाइल लोड केले जाईलपाहू शकतापूर्ण केल्यानंतर विंडोज 7 लोगो दिसेलकाहीही कॉपी किंवा अजून तुमच्या संगणकावरबदलण्यात आले आहेआणि डेटा नंतर हटवले जाईल

६  या चरणात पसंती निवड करावी लागेल. येथे आपणपुष्टी करा आणि आपली भाषातुमचे वेळ क्षेत्र आणिचलन स्वरूपआणि कीबोर्ड-इनपुट पद्धत (यूएस)निर्देशीत करण्यासाठी सूचित केले जाईलअचूक पर्यायनिवडल्यावर तुमच्या प्रणालीसाठी पुढे क्लिक करा
 ७   आता वर क्लिक करा आता स्थापित करा. आपणपुन्हा स्थापित Windows द्वारे तुमची प्रणाली दुरुस्तीजरी दुरुस्ती क्लिक करू नका. एकदा सेटअप फक्त एकमिनिटे वाट आपोआप पुढे जाईलक्लिक
८  पुढील आणि क्लिक करा: आता ( करार आणि अटीवाचून 'मी परवाना अटी स्वीकारत आहे' वर क्लिक करा
९   आता एक पडदा विचारून दिसेल 'आपण कोणत्याही प्रकारचे प्रतिष्ठापन करू इच्छिता?' स्थापित सानुकूलनिवडा.
आपण विस्टा सुधारणा करू इच्छित असेल तर अपग्रेडवर क्लिक करा. विंडोज XP मध्ये 7 पासून सुधारणाशक्य नाही
 १०     एक नवीन विंडो विचारून दिसेल 'आपण Windows स्थापित करू इच्छिता कोठे आहे?' आता "(प्रगत) ड्राइव्ह पर्याय." वर क्लिक करा हटवूस्वरूपकिंवा विभाजने व्यवस्थापित करू शकता येथे क्लिक करा.
     आपल्या विद्यमान कार्यकारी प्रणाली विभाजन नीवडा.
आपल्या हार्ड डिस्क अनेक ड्राइव्ह असेल तर  नंतर खात्री करा आणि योग्य (साधारणपणे तो नेहमी आहे "[विभाजन 1]ड्राइव्हनिवडा. विभाजन या विशिष्टविभाजन अंतर्गत सर्वकाही हटवू स्वरुपण कारण.
आता ड्राइव्ह वर क्लिक करा आणि स्वरूप वर क्लिक करा.

 ११ या स्वरूपन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला सूचित केले जाईल.
फार प्रक्रिया पुढे क्लिक करा पूर्ण केल्यानंतरयाWindows प्रतिष्ठापन सुरू राहील. आणि ही प्रक्रियातुमची प्रणाली गती अवलंबून 1 तास 30 मि लागू शकतो.
 १२  प्रतिष्ठापन पूर्ण केल्यानंतर आपल्या संगणक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.



१३    ... सुरू ठेवण्यासाठी कोणतीही की 'सुरू प्रेसकेल्यानंतर "पुन्हा प्रदर्शित केला जाईल. पण आपण आधीच केले कारण नाही. काही दाबू नका.
  आता फक्त एक मिनिटे वाट आणि आपल्या PC बूटसुरू आणि फक्त काही अधिक मि आत संपूर्ण प्रतिष्ठापनप्रक्रिया पूर्ण होईल.
 १४   शेवटी प्रक्रिया पूर्ण
 १५   आता आपले वापरकर्तानाव प्रविष्ट करा (हेआपल्या Windows नाव असेल)
 


१६    आणि Windows पासवर्ड विचारेलहे वैकल्पिक आहे.
 १७  आता पुढे क्लिक करा व आपल्या Windows 7उत्पाद कळ टाइप करा. आणि "मी ऑनलाईन करतेवेळी आपोआप विंडोज सक्रिय" पर्याय तपासा. हे सत्यापित करा म्हणजे आपण इंटरनेट कनेक्ट आपल्या Windowsपुढील वेळी सक्रिय करणार नाही
 आता विंडोज अपडेट पर्याय निवडासुरक्षितपणे तुमची प्रणाली चालवण्यासाठी आणि स्थिरता तो आपण प्रथमदोन पर्यायांपैकी एक निवडा शिफारस केली जाते. प्रथमशोध आणि इंटरनेट वरून स्वयंचलितपणे अद्यतनेस्थापित करेल. महत्वाचे सुधारणा उपलब्ध आहेत तेव्हादुसरा पर्याय आपल्याला सूचित करेल.

पुढील विंडो मध्ये तारीख आणि वेळ सेट.
 पुढील निवडा संजाळ प्राधान्यतासाधारणपणेवापरकर्त्यांची सर्वात मुख्यपृष्ठ नेटवर्क निवडाआपल्यानेटवर्क सार्वजनिक ठिकाणी वापरले जात आहे, तरसार्वजनिक नेटवर्क निवडा
 शेवटीसर्व काही केलेअंतिम लोड केल्यानंतर विंडोजसुरू होईलआणि आता आपण आपल्या PC अन्वेषण करू शकता.

Tuesday, 29 August 2017

Computer slow solution

कॉम्प्युटर हळू [ Slow ] चालत 

असल्यास ? खालील steps अमलात 

आणा...



बर्‍याच वेळा आपला कॉम्प्युटर स्लो झाला आहे व तो पूर्वी चांगला फास्ट चालायचा पण आता हळू चालतो असे वाटते.

कॉम्प्युटर हळू चालणे किंवा स्लो होणे ही खरी गोष्ट आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये बरेच सॉफ्टवेअर / प्रोग्राम्स टाकल्यामूळे आपला कॉम्प्युटर स्लो होतो असे सर्वांना वाटते. परंतु या व्यतिरीक्त इतर अनेक कारणांमूळे आपला कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.

कॉम्प्युटर मधिल अनेक अनावश्यक गोष्टी आपला कॉम्प्युटर स्लो करतात. आपल्या कॉम्प्युटरचा वेग [ Speed ] व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत.

१) कॉम्प्युटरमध्ये नेहमीच अनावश्यक तात्पुरत्या फाईली [ Temporary Files ] तयार होत असतात. खास करुन इंटरनेट वापरल्यास कॉम्प्युटरमध्ये अशा अनावश्यक अनेक फाईली तयार होतात. कॉम्प्युटर मधिल 'डिस्क क्लिन‍अप' [ Disk Cleanup ] ह्या प्रोग्रामद्वारे अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करता येतात.

Start - Programs - Accessories - System Tools मधिल Disk Cleanup वर क्लिक केल्यास चालू होणाऱ्या चौकोनात [ C/D: ] निवडून OK करावे. त्या नंतरच्या चौकोनात निरनिराळ्या विभागात असलेल्या अनावश्यक फाईलींनी व्यापलेली जागा दाखविली जाते. इथे पुन्हा 'OK' वर क्लिक केल्यास कॉम्प्युटर त्या सर्व विभागातील अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करतो. साधारण दर आठवड्याने अशा प्रकारे अनावश्यक फाईली नष्ट कराव्या.

२) दर आठवड्याला विंडोजच्या 'डेस्कटॉप' [ Desktop ] म्हणजेच सुरवातीच्या पानावरील 'रिसायकल बीन'  [ Recycle Bin ] उघडून ते संपूर्ण खाली करावे. रिसायकल बीन मधिल सर्व फाईली एकाच वेळी नष्ट करण्यासाठी त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या 'Empty the Recycle Bin' वर क्लिक करुन [ Delete ] करावे.

३) कॉम्प्युटर नेहमी त्यामध्ये साठविलेल्या फाईली इतरत्र साठवत असतो, यामूळे देखिल कॉम्प्युटर थोडाफार स्लो होतो.

- Start - Programs - Accessories - system Tool मध्ये Disk Defragmenter वर क्लिक करा. इथे चालू होणाऱ्या प्रोग्राममध्ये वरच्या बाजूस आपणास C: , D: असेकॉम्प्युटर मधिल विभाग दिसतील. सुरवातीला C: वर क्लिक करुन खाली असलेल्या Defragment ह्या बटनावर क्लिक करावे. हा प्रोग्राम इतरत्र पसरलेल्या फाईलींची देखिल व्यवस्थित मांडणी करतो. त्याचे हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण १-३ तास लागू शकतात. त्याला लागणारा हा वेळ कॉम्प्युटरमध्ये असलेल्या फाईलींवर अवलंबून असतो. आपला कॉम्प्युटर जेवढा भरलेला असेल तेवढाच त्याला जास्त वेळ लागतो.

या प्रोग्रामच्या खालच्या बाजूस % मध्ये काम किती शिल्लक आहे ते दाखविले जाते. अशा प्रकारे कॉम्प्युटरमध्ये Defragmenting दर पंधरा दिवसांनी केले तर कॉम्प्युटरच्या वेगामध्ये थोडाफार फरक दिसून येतो.

४) कॉम्प्युटर सुरु होताना इतर बरेच अनावश्यक प्रोग्राम सुरु होतात. असे अनेक अनावश्यक प्रोग्राम कॉम्प्युटर सुरु होताना चालू होतात जे चालू जरी नाही झालेत तरी काहीच फरक पडत नाही. परंतु ते सुरवातीला चालू होत असल्याने आपला कॉम्प्युटर स्लो होतो. अशा अनावश्यक चालू होणाऱ्या प्रोग्राम्सना सुरु होण्यापासून थांबवण्यासाठी खाली सांगितल्याप्रमाणे करावे.

- Start - Run वर क्लिक करावे. आता Msconfig टाईप करुन 'OK' करावे त्यामूळे स्क्रिनवर System Configuration Utility असा प्रोग्राम चालू होईल.

या प्रोग्राममध्ये इतर कुठल्याही विभागामध्ये न जाता सरळ 'Startup' ह्या विभागावर क्लिक करावे. इथे 'Startup Item' या नावाखाली तुम्हाला काही नावांची मोठी यादी [ List ] दिसेल व त्याच्या पूढे [ ] असे बरोबरचे चिन्ह असेल, त्या यादीतील सर्व [ ] असे बरोबरच्या चिन्हावर क्लिक करुन ते बंद करावे. नंतर 'Apply' व नंतर 'Close' बटनावर क्लिक करावे. या नंतर कॉम्प्युटर 'Restart' चा मेसेज देईल व कॉम्प्युटर एकदा बंद होऊन पुन्हा सुरु होईल. यामुळे अनावश्यक असलेले बरेच प्रोग्राम कॉम्प्युटर दरवेळेस सुरु करणार नाही.

५) सध्या इंटरनेटवरील अनेक वेबसाईटवर कॉम्प्युटरचा तसेच इंटरनेटचा वेग वाढविणारे अनेक प्रोग्राम मोफत मिळतात. परंतू त्यातील नक्की कुठला प्रोग्राम चांगला हे ओळखणे कठीण असते, कारण चांगल्या नावाने हानिकारक प्रोग्राम देखिल मिळू शकतात, याला पर्याय म्हणजे नविन एखादा प्रोग्राम पडताळण्यापेक्ष्या जास्त वापरला जाणारा आणि अनेकांनी सुचविलेलाच प्रोग्राम वापरणे योग्य. सध्या ' CCleaner ' हा जास्त ओळखला जातो, याचे कारण म्हणजे तो इंटरनेट एक्सप्लोरर, ऑपेरा, फायरफॉक्स या ब्राऊझरच्या तात्पुरत्या नको असलेल्या फाईल्स डिलिट करतो, विंडोज मधिल अनावश्यक फाईल्स, लॉग फाईल्स डिलिट करतो, सॉफ्टवेअरच्या कॉम्प्युटरमधल्या नोंदी व्यवस्थित करतो तसेच तो १००% हानिकारक नाही.

फेसबुकवर तुमच्या प्रोफाईलला कोणी भेट दिली हे ओळखा

फेसबुकवर तुमच्या प्रोफाईलला कोणी भेट दिली हे ओळखा


हल्ली सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी सहजपणे व्हायरल होतात. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर कोणतीही गोष्ट टाकायची खोटी ती लगेच पसरते. हल्लीची पिढी तर या सोशल साईट्सवर २४ तास ऑनलाईन असते.

मग कोणाच्या ना कोणाच्या प्रोफाईलला भेट देणे हे सर्रासपणे केले जाते. कोणी कोणता फोटो शेअर केलाय. त्याचे स्टेट्स काय हे त्याच्या प्रोफाईलवर जाऊन पाहिले जाते. सुरुवातीला आपल्या फेसबुक प्रोफाईलला कोणी भेट दिली हे समजायचे नाही. मात्र आता ते शक्य आहे.

१. सुरुवतीला फेसबुकला लॉगइन करा
२. टाईमलाईनवर राईट क्लिक करुन "view page source" ला सिलेक्ट करा
३. या पेजवर तुम्हाला खूप सारे को़ड दिसतील
४. त्यानंतर CTRL + F हे बटण दाबा
५. तेथे सर्च फिल्डमध्ये  InitialChatFriendsList हे त्या बॉक्समध्ये टाईप करा.
६. नंबरची लिस्ट येईल.
७. यात ज्यांनी आपल्या प्रोफाईलला भेट दिलीये त्यांचे आयडी येतील.

File देवाण घेवाण

फाइलची देवाण - घेवाण



कॉम्प्युटर आणि अॅण्‍ड्रॉइडच्‍या दरमयान फाईल पाठण्यासाठी कमी अंतरामध्ये Bluetooth चा वापर करु शकतो किंवा डाटा केबल कनेक्ट करुन फाईल पाठविता येतात. तसेच जर अंतर जास्त असेल तर e-mail, Dropbox, Google Drive किंवा OneDrive यांचा वापर करता येतो. पण या मार्गाने फाईल पाठवीण्याची पध्दत थोडी लांब आहे आणि जर तुम्हाला अतिशय सोपी पध्दत हवी असेल, ज्यात फाईल फक्त वेब ब्राऊझर मध्ये ड्रॉप करा आणि काही सेकंदातच हि फाईल तुमच्या अॅण्ड्रॉइड मोबाईल मध्ये आलेली असेल तर तुम्ही पुढील अॅप्स बदद्ल नक्कीच विचार करायला हवा.
यातील कोणतेही अॅप्स तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही काहीतरी गमाताय. मी येथे तीनच अॅप्स निवडले आहे कारण हे वापरण्यास अतिशय सोपे आहेत, तुमच्या अॅण्ड्राइडवर हे अॅप्स इन्स्टॉल करुन कॉम्प्युटरमधील वेब ब्राऊझर मधून यात प्रवेश मिळवता येतो.

AirDroid:
AirDroid हे वेब आधारीत अॅण्ड्राइड मोबाइलचा रिमोट कंन्ट्रोल आहे.
हे अॅप्स  Google Play वरुन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा आणि साइनअप करा.(मोबाईल मधील Settings - Accessiblity मधील Services या पर्यायाखालील AirDroid Notification mirror हा On करावा लागेल.)आता कॉम्प्युटरमधील वेब ब्राऊझर मध्ये web.airdroid.com यात तुमच्या युझरनेम आणि पासवर्डने लॉगीन करा किंवा QR code स्कॅन करुन कनेक्ट करा.एकदा हे कनेक्शन स्थापीत झाले तर तुम्ही वेब ब्राऊझर मध्ये तुमचा मोबाईल अॅक्सेस करु शकता.
AirDroid मधील मोफत अकाऊंट मध्ये तुम्ही अॅण्ड्रॉइड आणि कॉम्प्युटरच्या दरम्यान फाईल पाठऊ शकता, कॉल बघू शकता, फोटो बघू आणि डिलीट करु शकता, एसएमएस वाचू आणि पाठवू शकता, कॉन्टॅक्ट बघू शकता, नविन कॉन्टॅक्ट टाकू किंवा डिलीट करु शकता आणि तुमचे अॅप्लीकेशन्स अॅक्सेस करु शकता.
तसेच यात जर दुर्दैवाने तुमचा मोबाईल हरवला तर त्याचा शोध घेवू शकता, त्यावर चेतावणीसाठी आवाज काढू शकता, त्यावरील डाटा नष्ट करु शकता आणि मोबाईल लॉक करु शकता.
पण यातील मोफत वापरासाठी फक्त 100MB डाटा मिळतो. तसेच यात कॅमेरा आणि कॉल करण्याचे वैशिष्ट फक्त प्रिमीयम साठी उपलब्ध आहे.

Pushbullet:
Pushbullet म्हणजे files, links, text notes, list आणि webpages कॉम्प्युटर आणि अॅण्ड्रॉइड लच्या दरम्यान पाठविण्याचा सर्वात सोपा उपाय.
Pushbullet सुरु करण्यासाठी प्रथम हे अॅपGoogle Play वरुन मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन इस्टॉल करा.
नंतर यात Google चे अकाउंट वापरुन साइ्नइन करा.
(मोबाईल मधील Settings - Accessiblity मधील Services या पर्यायाखालील Pushbullet notification हे On करावे लागेल.)
आता कॉम्प्युटरमधील तुमच्या वेब ब्राऊझर मध्ये pushbullet.com साइट मध्ये याच अकाऊंटने लॉगइन करा.
येथे तुम्हाला या अकाउंटने लागीन केलेल्या सर्व साधनांची यादी दिसेल.
या सर्व साधनांमध्ये तुम्ही आता सहजपणे फाईल्सची देवाणघेवाण करु शकता.
तसेच Pushbullet हा push notification ला सपोर्ट करतो आणि मोबाईलच्या सर्व सुचना कॉम्प्युटरमध्ये दाखवतो.

JustbeamIt:
JustbeamIt ने मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये फाईल पाठविण्याची पध्दत खुप सोपी केली आहे. अॅण्ड्रॉइड मध्ये हे अॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर फाइलची देवाणघेवाण खुप सोपी होते. या अॅप्लीकेशन मध्ये फाईल निवडल्यानंतर आपोआप एक URL तयार होतो. हा URL कॉम्प्युटरमधील ब्राऊझर मध्ये ओपन करुन ही फाईल डाऊनलोड करु शकता.

CAPTCHA

CAPTCHA म्हणजे काय ?

ते कसे  काम  करतात ?

CAPTCHA हे असे प्रोग्रॅम्स असतात जे एक टेस्ट तयार करतात ज्यात फक्त मानवच पास होऊ शकतात पण कॉम्प्युटर प्रोग्रॅम यांत भाग घेऊ शकत नाहीत. उदा. खालील प्रकारची वाकडया वळणाची अक्षरे फक्त मानवच वाचू शकतो, पण कॉम्प्युटर प्रोग्रॅम वाचू शकत नाहीत.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास CAPTCHA हे एक शब्द तपासणारी परीक्षा आहे जी फक्त माणसे वाचु शकतात, पण कॉम्प्युटर प्रोग्रॅम वाचु शकत नाहीत.

Why does CAPTCHA developed?
असे लक्षात आले कि बरेच वेब साईट तयार करणारे त्यांची वेब साईट ची प्रसिध्दी वाढविण्यसाठी आणि सर्च इंजिन मधिल श्रेणी वाढविण्यासाठी आपोआप ब्लॉग साठी कमेंटस पाठविता येणारी प्रोग्रॅम्स तयार करु लागले.तसेच अनेक वेब साईट उदा. Yahoo, Gmail हे फ्रि ई मेल सुविधा पुरवितात. पण काही वर्षापुर्वी या वेब साईट bots नावाच्या एका व्हायरस हल्याने बाधित झाल्या होत्या, ज्यात एकाच वेळी हजारो ई मेल तयार करण्यासाठी आपोआप फॉर्म भरले जात होते.
या सर्वांपासुन वाचविण्यासाठी CAPTCHA तयार झाले. CAPTCHA म्हणजे for Completely Automated Public Turing Test To Tell Computers and Humans Apart
याची रचना सन 2000 साली Carnegie Mellon University मधिल Luis von Ahn, Manuel Blum, Nicholas Hopper and John Langford यांनी केली. सर्वात आधी याचा उपयोग Yahoo साठी केला गेला.

Features of CAPTCHA :
Preventing Comment Spam in Blogs :- एखादया ब्लॉग्मध्ये कमेंटस हे फक्त्मानवाने देण्यासाठी CAPTCHA चा वापर केला जातो. येथे युझरला साईन अप करण्यासाची गरज नसते.
Protecting Website Registration :- वेब साईट वर register करतांना CAPTCHA चा वापर केला जातो, जेणे करुन आपोआप register करण्या-या प्रोग्रॅम पासुन सुरक्षीतता मिळेल,
Online Polls :- CAPTCHA हे online polls ला अधिक सुरक्षित बनवतात, जेणे करुन फक्त माणसेच यात भाग घेऊ शकतील.
Preventing Dictionary Attacks :- CAPTCHA यांचा पासवर्ड सिस्टिम मध्ये वापर करुन Dictionary attack पासुन वाचता येते.
Search Engine Bots :- वेब साईट मध्ये bots चा शिरकाव होऊ नसे म्हणून CAPTCHAs वापरतात.
Worms and Spam :- CAPTCHA हे ई मेल worms आणि spams पासुन सुरक्षतता पुरविण्यासाचे काम CAPTCHA करतो.

You tube वरील video डाउनलोड करा

You tube वरील video डाउनलोड करा


        you tube वरील असंख्य videos ऑनलाइन पहायला मिळते मात्र डायरेक्ट डाउनलोड करून घेण्याची सुविधा देत नाही. you tube वरील आवडलेली videos डाउनलोड करण्यासाठी You tube downloader, Tubemate, अशा त्रयस्थ सॉफ्टवेयरची मदत घेऊन video डाउनलोड करावे लागते.
You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...

you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...
https://www.youtube.com/watch?v=8uhmkQXfxPU

वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.

पद्धत :- 1 (Method 1)
वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=8uhmkQXfxPU

      आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की...

तयार झालेला नवीन लिंक-
https://www.ssyoutube.com/watch?v=8uhmkQXfxPU

पद्धत :- 2 (Method 2)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=2wBWtn3fW0U

वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...

तयार झालेला लिंक-
https://www.dlyoutube.com/watch?v=2wBWtn3fW0U

पद्धत :-3 (Method 3)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=V4P2BE6CKPo

यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.saveyoutube.com/watch?v=V4P2BE6CKPo

पद्धत :-4 (Method 4)

मूळ लिंक:-
https://www.youtube.com/watch?v=65D5HTt7WIQ

यामध्ये यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...

नवीन लिंक:-
pwnyoutube.com/watch?v=65D5HTt7WIQ

पद्धत :-5 (Method 5)

मूळ लिंक-

https://www.youtube.com/watch?v=ebGfXUL2D8I

     यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...

नवीन लिंक:-
https://www.cickyoutube.com/watch?v=ebGfXUL2D8I

पद्धत :-6 (Method 6)

मूळ लिंक-

https://www.youtube.com/watch?v=G_oopyEouV4

       यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"
टाइप करा जसे की...

नवीन लिंक-

https://www.deturl.com/watch?v=G_oopyEouV4
                   

WhatsApp वर ऑनलाइन न दिसता ही वाचा मॅसेज

WhatsApp वर ऑनलाइन न दिसता ही वाचा मॅसेज

what's app वर  कुणालाही online न दिसता ही तुम्ही मॅसेज वाचु शकता. पण त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काही सेटिंग्स बदलाव्या लागतील.
त्या नंतर तुम्ही सहज invisible होऊ शकता....
मग तुम्ही मॅसेज वाचा किंवा नका वाचु... कोणालाच कळणार नाही की, तुम्ही केंव्हा ऑनलाइन होतात.

ब्लू टिक्समुळे मॅसेज वाचला का ते  कळते.*

ब्लू टिक्स hide करा खालील पध्दतीने...

👉🏻 hide  असे करा....

Account ->Privacy -> Uncheck Read Receipts box मध्‍ये जाऊन तुम्ही ते hide करु शकता.

👉🏻hide असे करा......

Settings -> Privacy -> Profile Photo -> Nobody मध्‍ये जाऊन तुम्ही hide करु शकता.

👉🏻 hide असे करा....

Settings -> Privacy -> Status -> Nobody करा.


👉🏻Last seen hide असे करा

Settings > Privacy > last seen> Nobody करा. आता कोणालाही कळणार नाही तुम्ही केव्हा ऑनलाइन होता.

👉🏻असे Pause करा WhatsApp

Setting > Apps > WhatsApp > Force Stop जाऊन  WhatsApp ला काही दिवसांसाठी Pause करु शकता. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा पुन्हा Active mode करुन सुरू करू शकता.

📱 *मात्र हे फीचर फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी आहेत.

Offline you tube

ऑफलाईन बघा ‘यूट्यूब’ वरील व्हिडिओ

अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलेल्या यूट्यूबचे अनेक भन्नाट पर्याय तुम्हाला माहित नसतील. त्या बहुविध फीचर्सचा घेतलेला हा आढावा....
लॉग इन करा अन् स्पीड वाढवा

सहज यूट्यूबवर गेलात आणि सर्च करण्याचा प्रयत्न केला, तर बऱ्याच वेळ बफरिंगमध्ये वेळ जातो. मात्र यूट्यूबवर लॉग इन होऊन सर्च केल्यास सर्चचा वेग वाढतो. तसंच सदस्य नसलेल्यांना पाहता न येणारे व्हिडिओदेखील सहज पाहता येतात. यूट्यूब ही 'गुगल'चीच सेवा असल्याने तुम्ही तुमचे गुगल अकाऊंट लॉग इन केल्यानंतर यूट्यूबचे लॉग इन करण्याचा मार्ग मोकळा होतो.

ऑफलाइन यूट्यूब

इंटरनेट कनेक्शन नसतानाही यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेता यावा, म्हणून यूट्यूबने ऑफलाइनची सेवाही उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक व्हिडिओच्या खाली 'अॅड टू ऑफलाइन' हा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक केल्यावर संबंधित व्हिडिओ ऑफलाइन व्हिडिओच्या लिस्टमध्ये समाविष्ट होतो.

३६० अंशांचा व्हिडिओ

यूट्यूब ३६० डिग्री व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण परिसराचा वेध घेणारा व्हिडिओ अपलोड करता येतो. क्रोम किंवा मॅकवरून हे व्हिडिओ अपलोड करता येतात. कम्प्युटरवर ३६० डिग्री मेटा डेटा अॅपच्या मदतीने अशाप्रकारचे ३६० अंशांमध्ये चित्रित केलेले हे भन्नाट व्हिडिओ पाहता येतात किंवा अपलोडही करता येतात.

थ्रीडी व्हिडिओ

यूट्यूबवर थ्रीडी व्हिडिओ पाहण्यासाठी www.youtube.com/3d या लिंकला भेट द्या. आजच्या घडीला या लिंकवर मोठ्या प्रमाणात थ्रीडी व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. व्हिडिओखाली देण्यात येणाऱ्या थ्रीडी आयकॉनवर क्लिक करून तुमच्याकडील थ्रीडी चष्म्यांप्रमाणे थ्रीडीचा प्रकार हवा तसा अॅडजेस्ट करून घेता येतो.

व्हिडिओ करा सेव्ह

अनेकदा एखादा व्हिडिओ शोधण्यासाठी आणि पाहण्यासाठी बराच वेळ जातो. अशा वेळी तुम्ही त्या व्हिडिओची लिंक सेव्ह करून ठेवू शकता. व्हिडीओखालील 'अॅड टू' या पर्यायावर क्लिक करून तुम्ही 'वॉच लेटर'चा पर्याय निवडा. हा व्हिडिओ तुमच्या खासगी प्ले लिस्टमध्ये सेव्ह होतो.

व्हिडिओतील विशिष्ट भाग बघण्यासाठी...

एखाद्या व्हिडिओमधील एखादा खास भाग मित्राला दाखविण्याची इच्छा असेल तर तशी सुविधाही यूट्यूबवर उपलब्ध आहे. एखाद्या व्हिडिओमधील खास भाग मित्राला, नातेवाइकांना दाखवायची असेल, तर व्हिडिओ शेअरचा पर्याय क्लिक करा. त्यानंतर यूआरएलच्या खालील बाजूला असणाऱ्या पर्यायांमधील सॉर्ट अॅट या पर्यायावर क्लिक करून व्हिडिओमधील तो सीन ज्या वेळेला आहे ती वेळ तेथे टाकावी. उदाहरणार्थ, पाच मिनिटांच्या व्हिडिओमधील ३.५५ सेकंदाला ते दृश्य दिसणार असेल तर सॉर्ट अॅट ३.५५ असं टाइप करावं. जेणेकरून पाच मिनिटांच्या व्हिडिओमधील ३.५५ सेकंदांनंतर येणारे दृश्य तुम्हाला पाहता येईल.

काही शॉर्टकट्स

यूट्यूब व्हिडिओच्या लिंकमध्ये youtube या शब्दाआधी 'ss' ही अक्षरे टाकल्यास तुम्हाला व्हिडिओ थेट डाऊनलोड करता येतो. किबोर्डवर 'K' लेटर दाबून तुम्हाला व्हिडिओ पॉज तसेच परत प्ले करता येईल. 'J' ने व्हिडिओ दहा सेकंद मागे तर, 'L'ने व्हिडिओ दहा सेकंद पुढे नेता येईल. 'M' ने व्हिडिओचा आवाज बंद करता येईल

स्वच्छतेविषयी घोषवाक्ये

स्वच्छतेविषयी घोषवाक्ये


1) गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र.
2) स्वच्छता आली अंगणात, समाज का अंधारात.
3) सुरक्षित साधन पाण्याचे , महत्व पटवा हातपंपाचे.
4) हगवण , अतिसार रोगाचा प्रसार ,हे तर दूषित पाण्याचेप्रहार.
5) उघड्यावर शौचास बासु नका, रोगांना आमंत्रण देऊनका.
6) पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन.
7) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगीबनवू.
8) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, डासांची अंडी पळवुनलावा.
9) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याचीहानी.
10) नका बसु उघड्यावर संडासाला ,संधि मिळेल रोगाराईपसरण्याला.
11) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईलआरोग्याची पहाट.
12) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे , दूषित करू नकातुमच्या हाताने.
13) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र , ग्रामिणआरोग्याचा हाच कानमंत्र.
14) ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सुबता.
15) रंग भगवा त्यागाचा, मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.
16) पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू.
17) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू, सर्व रोगराईनादूर पळवू .
18) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिकआरोग्याला गती.
19) " स्वच्छता" माणसाचे आत्मदर्शन घडविते.
20) वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासुन मिळेल मुक्ति.
21) हातात मोबाईल घरात फोन , उघड्यावर शौचालाबसलयं कोण.
22) जेवणापूर्वी धुवा हात, जेवणानंतर धुवा दात.
23) नखे कापा बोटाची  , नाही होणार व्याधि पोटाची.
24) असेल दृष्टी , तर दिसेल स्वच्छ सृष्टि.
25) संडास बांधा घरोघरी , आरोग्य नांदेल त्याच्या दारी.
26) सांडपाण्याला आळा  , रोगाराई टाळा.
27) स्वच्छ सुंदर परिसर ,  जीवन निरोगी निरंतर.
28)  स्वच्छ शाळा करा हातांनी , सुंदर गाणी गाऊ मुखांनी.
29) स्वच्छ सुंदर परिसरातुच , सुंदर सुसंस्कृत नागरिकघडतात.
30) गावकरी मिळुन एक काम करू, शौचालयाचा वापरकरू.
31) शौचालय असेल जेथे , खरी प्रतिष्ठा येईल तेथे.
32) संडास बांधण्या नाही म्हणू नये, शौचाला लोटा घेऊनजाऊ नये.
33) आधी केले मग सांगितले , आधी आपल्या घरीशौचालय बांधले.
34) स्वच्छ घर , सुंदर परिसर , शोचखड्याचा करुयावापर.
35) कचरा कुंडिचा वापर करू , सुंदर परिसर निर्माण करू

डिलीट झालेले मोबाइल नंबर परत मिळवा

डिलीट झालेले मोबाइल नंबर परत मिळवा





 चुकुन आपल्याकडून मोबाईल मधील मॅसेजेस आणि नंबर डिलीट होतात. आणि मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण येवढे करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मॅसेज आपणार परत मिळत नाही.परंतु आता यावर उपाय आहे आणि आता आपण डिलीट केलेले मॅसेज आणि नंबर परत मिळवू शकतो.
यासाठी Pro Data Doctor SIM


 Card files rescure software डाऊनलोड करावे.
PRO DATA DOCTOR .COM
या सॉफ्टवेअर मध्ये आताच डिलीट केलेले टेक्स्ट मॅसेज आणि मोबाईल नंबर्स परत मिळवून देण्याची क्षमता आहे. यात मिनिटाच्या आत डिलीट केलेले मॅसेज आणि फोन बुक कॉन्टॅक्ट परत मिळवता येतात.यासाठी एक USB SIM card reader लागते, तुमच्या मोबाईलमधील डिलीट केलेले नंबर आणि मॅसेज परत मिळविण्यासाठी.या सॉफ्टवेअर मध्ये सिम कार्ड मधील माहिती (कॉन्टॅक्ट नंबर, डिलीट केलेले टेक्स्ट मॅसेज आणि त्यांचा पाठविण्याचा आणि येणाच्या वेळेनुसार)वाचता येते.
वैशिष्टेः
यात डिलीट केलेले सर्व मॅसेज (Inbox unread, outbox send, outbox later send आणि deleted messages).
यात सर्व कॉन्टॅक्ट नावासोबतच सर्व मोबाईल नंबर वाचता येतात.सिम कार्ड मधील सर्व माहिती एका मिनीटात परत मिळवता येते.कोणत्याही नेटवर्कच्या सिम कार्डसाठी हे वापरता येते.कोणत्याही देशातील GSM सिम कार्डला हे सपोर्ट करते.सिम कार्ड वरील प्रिंट केलेला ICC Identification number आणि सर्व्हिस प्रोव्हाडरचे नांव सुध्दा वाचु शकतो.हे सहज ईन्स्टॉल होते आणि वापरण्यास सोपे आहे.

You tube Restricted mode

          *युट्युब ओपन केल्यानंतर आपोआप येणार Recommended अश्लील व हिंसक व्हिडीओनां प्रतिबंध*


*मित्रहो*,


*आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अश्लील व हिंसक व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात*

*पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो*

*या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे*

*आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील*

*१ ) संगणकावर setting करणे*

*सर्व प्रथम युट्युब ओपन करा*

*आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा*

*Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा*

*आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on  या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल*

*सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा*

*अशा प्रकारे आपण restricted mode ओंन करू शकतो*

*२ ) मोबाईल वर setting करणे*

*सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा*

*स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा*

*सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा*

*आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा*

*सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल*
*आता back या अशा प्रकारे मोबाईलवर  restricted mode ऑन झाला असेल*

*या settings करून आपण सुमारे 98% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब बिनधास्त  वापरू शकतो*

                *धन्यवाद*

Google form

गुगल फॉर्म तयार करा




1. गुगल फॉर्म तयार करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले G-mail ला खाते असले पाहिजे.

2.  युजर आय डी व पासवर्डच्या मदतीने G- mail खाते Login करावे.




G- mail अकाउंट उघडल्यानंतर लाल बाणाने दाखविल्या प्रमाणे Google Drive  वर क्लिक करावे. त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे Google Drive ओपन होईल.

3. Google Drive ओपन झाल्यानंतर New  वर क्लिक करावे . त्यानंतर More मधील Google Form वर क्लिक करावे



4.  खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे Form Tittle मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा. याठिकाणी पाठयपुस्तकांची मागणी हा विषय टाईप केला आहे.



5. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे  फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुदद्या प्रमाणे माहिती Edit  करावी. इमेज मध्ये बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी Done वर क्लिक करावे.


6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते  4 थी पर्यंतच्या वर्गांची माहिती त्यात भरावी.







      वरील इमेज मध्ये दाखविल्या बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत व शेवटी Send form  वर क्लिक करावे. 


7. Send Form वर क्लिक केल्यानंतर खालील विंडो ओपन होईल. Link to Share या खाली आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती Copy करुन ठेवावी.   त्यानंतर  Done  वर क्लिक करावे.




8.  त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, व्हॉटस अप, फेसबुक, ईमेल ने इतरांकडे पाठवू शकतो. इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा झालेली माहिती आपणास संंकलन होवून  Excel फॉरमॅट मध्ये मिळते.



9. खाली दाखविलेल्या Insert Tab चा वापर करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक डिझाइन करु शकतो. 

Monday, 28 August 2017

स्काऊट कार्यशाळा आटपाडी २९-८-१७

      कब बुलबुल स्काऊट गाईड कार्यशाळा 29.08.2017 स्थळ :- श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी वेळ 11 ते 5    
       

Sunday, 27 August 2017

Android

अ अॅन्ड्रॉईड चा !


अ अॅन्ड्रॉईड चा !

कोणे एके काळी,  माझ्याकडे एक मोठ्ठा संगणक होता, ज्याने एक आख्खं टेबल व्यापलं होतं. त्याला आम्ही ‘डेस्कटॉप पीसी’ असं म्हणायचो. (अजूनही म्हणतो) त्याला एक डायल अप इंटरनेट कनेक्शन जोडलेलं होतं. जोडीला एक घरचा दूरध्वनी. मी बाहेर कुठे मीटिंग ला गेलो, की नेमके घरी फोन येणार, घरचे बिचारे लोक निरोप लिहून घेणार, मी पुन्हा घरी आलो की, मी ते निरोप वाचून डेस्कटॉप पीसी चालू करून ई-मेल वाचणार, असं आयुष्य निवांत होतं.

मग आले लॅपटॉप. ते बॅगमध्ये ठेवले, की कुठेही घेऊन जा, आणि तिकडे बसून काम करा. यांना एक वाय फाय कनेक्शनची सोय होती. म्हणजे, जिथे मी जायचो, तिथे वाय-फाय इंटरनेट असलं, आणि त्याचा पासवर्ड त्या लोकांनी मला दिला, तर मी कुठेही ई-मेल पाहू शकायचो. जोडीला आले पेजर, मग मोबाईल. आता लोक मला कुठेही गाठायला लागले. कामाची बोलणी विनाविलंब व्हायला लागली.

पण नुसतीच बोलणी व्हायची. एक तर प्रत्येक ठिकाणी लॅपटॉप घेऊन जाणं अजूनही खूप अवघड होतं, आणि त्यात घेऊनही गेलो, तरी प्रत्येक ठिकाणी वाय फाय इंटरनेट मिळेलच याची शाश्वती नाही !

जेव्हा वर्षोनुवर्षे जगभर खूप लोकांना ही समस्या सतावू लागली, तेव्हा त्यातून एक विचार पुढे आला, मोबाईल वरच इंटरनेट, ई-मेल, डेटा फाईल्स, इत्यादी सगळं मिळालं तर? म्हणजे फोन सुद्धा, आणि काम सुद्धा, दोन्ही एकत्र !

आणि ही कल्पना वस्तुस्थितीत आली साधारणत: एकोणीसशे नव्वद च्या दशकात, जेव्हा आय बी एम, मायक्रोसॉफ्ट, नोकीया, सॅमसंग इत्यादी कंपन्यांनी Palm OS, Symbian, Windows CE, Bada अशा ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरून मोबाईल आणि पी.डी.ए. (Personal Digital Assistant) नामक मोबाईलची सुधारीत आवृत्ती बाजारात आणली.

साधारणत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टची Windows Mobile OS, ब्लॅकबेरी लिमिटेडची Blackberry OS अशा अनेक सुधारीत ऑपरेटिंग सिस्टिम्स बाजारात आल्या.

मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती घडवली ती स्टीव जॉब्स यांनी. सन २००७ ला अॅपल कंपनीनं iPhone नामक ‘स्मार्टफोन’ बाजारात आणला. iPhone नं मोबाईल मार्केट हलवून सोडलं. iPhone हा screen touch interface नं काम करणारा जगातला पहिला मोबाईल फोन. या screen touch interface मुळे मोबाईलवर काम करणं सामान्य लोकांसाठी कितीतरी पटीनं सोप्पं झालं.

मोबाईल जगतातील पुढची क्रांती अॅन्डी रुबीन यानं गुगलच्या साथीनं घडवली. त्यानं अॅन्ड्रॉईड  ही Open source ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणली. या आधीच्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स या पेड लायसन्स प्रकारात मोडणा-या होत्या, म्हणजेच त्यांचे पैसे येन केन प्रकारेण ग्राहकाला पडायचे. Open source license खाली येणा-या सिस्टिम्स ग्राहक एकही पैसा खर्च न करता (चकटफू) वापरू शकतो. या कारणानं अॅन्ड्रॉईड  वापरणारे डिव्हाईसेस (मोबाईल, टॅबलेट इत्यादी) खूप कमी दरात ग्राहकांना मिळू लागले.

भारत हा काटकसरी लोकांचा देश आहे. भारतीय मार्केट हे सगळ्या जगात ‘चोखंदळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय लोक एखादया वस्तूची उपयुक्तता, गुणवत्ता, आणि किंमत याची योग्य ती सांगड घालून खरेदी करतात. अॅन्ड्रॉईड च्या आधी असलेलं जागतिक स्मार्टफोन मार्केट उपयुक्तता आणि गुणवत्ता यात आघाडीवर होतं, पण किंमती भरमसाट असल्यानं ते भारतीय ग्राहकाला पटवण्यात फारसं यशस्वी झालं नाही. पण अॅन्ड्रॉईड नं यात चांगलीच मुसंडी मारली.

आज जागतिक स्मार्टफोन बाजारातला ८० टक्के, तर भारतीय बाजारातला ९० टक्क्यांच्या वर हिस्सा फक्त एकटया अॅन्ड्रॉईड नं व्यापला आहे, यावरून अॅन्ड्रॉईड ची ग्राहाकांवरची पकड स्पष्ट दिसून येते.

सॅमसंग, झोलो, मायक्रोमॅक्स, लेनोव्हो इत्यादी आघाडीवरच्या स्मार्टफोन बनविणा-या कंपन्या अॅन्ड्रॉईड  वापरत आहेत. एवढंच नाही, तर आता गुगल ग्लास, गुगल टेलिव्हिजन इत्यादी डिव्हाईसेस वर सुद्धा अॅन्ड्रॉईड  वापरली जात आहे. यावरून अॅन्ड्रॉईड चा व्यापक वापर आणि उपयुक्तता सहज लक्षात येते.

अॅन्ड्रॉईड ची एक गम्मत म्हणजे इंग्रजी अक्षर A पासून सुरु होऊन त्याची पुढची व्हर्जन्स आता K पर्यंत आली आहेत, आणि यातली C पासून पुढची सर्व नावं म्हणजे खाण्याच्या गोष्टी आहेत. Alpha, Beta, Cupcake, Donut, Eclair, Froyo, Gingerbread, Honeycomb, Ice cream sandwich, Jelly bean, Kit Kat ही अॅन्ड्रॉईड ची नावं. तोंडाला पाणी सुटलं लिहितांनाच !

असं काय आहे या अॅन्ड्रॉईड  मध्ये की जनमानसाची एवढी पकड यानं घेतलीये? पाहुया अॅन्ड्रॉईड चे काही वैशिष्टये.

फोन संभाषण (Telephonic features) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम voice call, video call, conference call इत्यादी संभाषण सुविधा पुरवते.


मेसेजिंग (messaging) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम SMS (Short Messaging Service) आणि MMS (Multimedia Messaging Service) दोन्हीला सपोर्ट करते.


इंटरनेट कनेक्टीव्हीटी (Internet connectivity) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम वाय-फाय द्वारे इंटरनेट कनेक्शन वापरू शकते. शिवाय, आपण आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरला (Idea, Airtel, BSNL etc.) सांगून आपल्या सीम कार्ड द्वारे डेटा कनेक्शन प्लॅन अॅक्टिवेट करू शकतो, ज्या द्वारे आपल्याला 2G अथवा 3G सर्व्हिस अॅन्ड्रॉईड  मध्ये वापरता येते. (2G चा स्पीड कमी असतो, पण 3G चा स्पीड जास्त असला तरी त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते हे लक्षात घेऊन जेथे इंटरनेट स्पीड खूप जास्त गरजेचा आहे तेथेच 3G वापरणे कधीही सोयीस्कर ठरते.)


अॅप्स (APPs) – स्मार्टफोनवर वापरल्या जाणा-या प्रोग्रॅम्सना अॅप्स म्हणतात. अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आपण अनेक उपयुक्त अॅप्स गुगलच्या गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करू शकतो, आणि वापरू शकतो. यामध्ये अनेक वर्तमानपत्रे, social networking APPs, गेम्स, इत्यादींचा समावेश होतो. यापैकी काही अॅप्स हे पूर्णपणे फुकट असतात, तर काहींना पैसे पडतात.


मल्टी टास्कींग (Multitasking) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम एकाच वेळेला अनेक अॅप्स वापरण्याची सोय देते. यापैकी एक अॅप हे स्क्रीनवर असते, तर बाकीचे लपलेले (hidden) असतात, ज्यांना ग्राहक एका पूर्वनियोजित कृतीने कधीही पाहू शकतो, आणि ते पुढे चालू ठेवू शकतो.

गुगल सर्च (Voice based Google search facility) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आपण बोलून सुद्धा अनेक गोष्टी शोधू शकतो. उदाहरणार्थ, “शनिवार वाडा” असं बोलल्यास अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम आपल्याला शनिवार वाडा असलेलं ठिकाण, त्याची माहिती, तेथपर्यंत जाण्याचा रस्ता, जायला लागणारा वेळ, इत्यादी सर्व माहिती पुरवते.



गुगल नेव्हिगेशन (Google navigation) – यामध्ये आपण दोन ठिकाणांना जोडणारे रस्ते शोधणे, त्यांमधील अंतर शोधणे, जवळची सार्वजनिक ठिकाणे (बस थांबा, खानावळ, शाळा) शोधणे, आपण आत्ता कुठे आहोत हे GPS (Global Positioning System) च्या सहायाने बघणे इत्यादी सुविधा आपल्याला वापरता येतात.


गुगल कॅलेंडर (Google calendar) – यामध्ये आपण आपले इव्हेंट्स, सुट्ट्यांचे दिवस, वाढदिवस इत्यादी पाहू शकतो, आणि त्यांचे रीमाईन्डर्स लावू शकतो.

एकाच गुगल अकाऊंटने सगळं काही (One Google account for all) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम ग्राहकाचा एक गुगल अकाऊंट घेते, आणि तोच एक अकाऊंट गुगलच्या विविध सर्व्हिसेस करता वापरते. उदाहरणार्थ, Google mail (ज्यामध्ये आपले ई-मेल्स व फोन कॉन्टॅक्टस् साठवले जातात), Google Maps (ज्यामध्ये आपण आपली घर व कचेरीची ठिकाणे साठवू शकतो, व वेळेला त्याचा उपयोग नेव्हिगेशन करता करू शकतो), Google Keep (ज्यामध्ये नोट्स साठवल्या जातात), Google Play (जेथून अॅप्स डाऊनलोड केले जातात), Google Drive (आपल्या फाईल्स करता ऑनलाईन स्टोअर) इत्यादी. एक अजून चांगली सुविधा म्हणजे, आपल्या स्मार्टफोनवर वापरलेल्या अकाऊंटद्वारे ही माहिती गुगल सर्व्हर वर साठवली जाते, जी आपण आपल्या डेस्कटॉप / लॅपटॉप वर सुद्धा कधीही वापरू शकतो, अगदी आपला स्मार्टफोन जवळ नसतांना सुद्धा आपले सगळे ई-मेल्स, फोन कॉन्टॅक्टस् इत्यादी  सर्व आपल्याला सहज मिळते.

प्रादेशिक भाषा वापर (Multi language support) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिममध्ये आपण अनेक प्रादेशिक  भाषांचा वापर करू शकतो. आपल्या मातृभाषेत संदेश (SMS) पाठवण्याचा आनंदच काही वेगळा !


वापरातील सुलभता (Accessibility) – कमी अथवा न ऐकू येणा-या, कमी अथवा काहीच न दिसणा-या व्यक्तींकरता अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम काही सुलभ सुविधा देते. यामध्ये स्क्रीनवर बोट टेकवल्यास आपण काय क्रिया करणार आहोत, याची आगाऊ सूचना देणे, केलेली क्रिया ग्राहकाला ऐकवणे, स्क्रीन वरील अक्षरे मोठी दाखवणे, स्क्रीनचा प्रकाश वाढवणे इत्यादी  सुविधा येतात.


फाईल्स हस्तांतरण (Files transfer between devices) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे आपण Bluetooth connectivity सुविधा वापरून आपल्या स्मार्टफोनमधील फाईल्स दुस-या डिव्हाईसवर (संगणक, मोबाईल, स्मार्टफोन, टॅबलेट इत्यादी) ट्रान्सफर करू शकतो. शिवाय, दुस-या डिव्हाईसवरील फाईल्स आपल्या स्मार्टफोन वर आणू शकतो. यासाठी आपला व समोरचा डिव्हाईस Bluetooth supported असणं गरजेचं आहे.



मल्टिमिडीया (Multimedia support) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिममधील गॅलरी, कॅमेरा, म्युझिक प्लेअर, साऊंड रेकॉर्डर, व्हिडीओ प्लेअर अशी अनेक अॅप्स आपल्याला  फोटो, गाणी, व्हिडीओ यांचा मनमुराद आनंद देतात.


फोन सुरक्षितता (Phone security features) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम आपल्याला फोन लॉकिंग करता विविध पर्याय देते. यात प्रामुख्याने पॅटर्न लॉक (यामध्ये ठराविक पद्धतीने बिंदू जोडत गेल्यास स्क्रीन अनलॉक होतो), पिन / पासवर्ड लॉक (यामध्ये ठराविक key combination टाईप केल्यास स्क्रीन अनलॉक होतो), व्हॉईस लॉक (यामध्ये ठराविक व्यक्ती ठराविक शब्द बोलल्यास स्क्रीन अनलॉक होतो), फेस लॉक (यामध्ये ठराविक व्यक्तीचा चेहरा स्मार्टफोनच्या समोर धरल्यास अथवा ठराविक व्यक्तीच्या चेह-याने ठराविक क्रिया केल्यास, उदाहरणार्थ डोळे मिचकावणे, स्क्रीन अनलॉक होतो).

याशिवाय अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिममध्ये घातलेले काही अॅप्सही आपल्यासाठी सुरक्षिततेची व्यवस्था करतात. क्विक हील अॅन्टिव्हायरस ठराविक फोन नंबर्स वरून येणारे फोन्स अथवा संदेश ब्लॉक करतं, अॅपलॉक हे अॅप एक पूर्वनियोजित पासवर्ड टाकल्याखेरीज आपल्याला बाकीचे कुठलेही अॅप्स वापरू देत नाही.

अशा पद्धतीनं स्मार्टफोन हे आता एक चालतं बोलतं ऑफिस झालंय. जग खूप छोटं झालंय, अगदी खिशात बसायला लागलंय. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, अगदी स्मार्टफोनचा सुद्धा ! सतत स्मार्टफोन्सवर लक्ष दिल्याने कामातलं लक्ष उडणं (distraction), वैयक्तिक संबंधांमधले बिघाड इत्यादी समस्या आत्तापासूनच भेडसावतायेत. सदैव संपर्कात राहिल्यानं थोडासुद्धा निवांतपणा मिळेनासा झालाय. त्यामुळे चिडचिड, उदासीनता, सततची चिंता इत्यादी  मानसिक समस्या उद्भवत आहेत.

स्वत:वर ताबा ठेवून स्मार्टफोनच्या आहारी न जाता त्याचा वापर करायला शिकूया. तर करूया सुरुवात?

अ अ अॅन्ड्रॉईड  चा…

Speech to text

Speech to Text

                     इंग्रजी लिहन्यासाठी उपयुक्त

हा अँप्स वापरणे अतिषय सोपे आहे. अँप्स ओपन केल्यानंतर किबोर्ड ओपन करा तिथे तसा पर्याय आहे. स्पीकर वर टच करा नंतर तुम्ही मोबाइल तोंडासमोर धरा. व तुम्ही english भाषेत काहीपन बोला ते तुमच्या पेजवर लिहने सुरु  होइल बाजुला ट्रान्सलेट आँफसेन मध्ये हिंदी भाषा उपलब्ध आहे.

बोलताना जर शब्द निट लिहला गेला नाही तर कट करा किवा किबोर्ड वर सुधारणा करा.

आता तुम्ही बोललेली माहीती पेजवर दिसत आहे ...

मग तुम्हाला हि माहीती  दुसर्याला सेंन्ड करायची आहे.   काळजी करन्याची गरज नाही बाजुला सेंन्ड करन्याची सुविधा उपलब्ध आहे.. whatsapp वर सुद्धा सेंन्ड करु शकता....

वापर करतांना जास्त अडचन येनार नाही..

हा अँप्स playstore वर उपलब्ध  आहे.... *Speechnotes* हे अँप्स चे नाव आहे playstore वर जा आणी *Speechnotes* सर्च करा .. पुढील चित्राचा अँप्स डावुनलोड करा...👇🏻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*Voice typing and taking notes, has never been so efficient and easy.*
Patent pending voice & punctuation keys-commands combo.

*NEW: Bluetooth* supported! Talk through your bluetooth microphone / earpiece / car -> Speechnotes will write down every word!

*Super easy:* Simply click the microphone and start dictating. No need to login or register.

*Super fast & efficient:* punctuation marks can be either dictated by voice commands or single click-inserted with our unique (patent-pending) punctuation keyboard. All that - without ever stopping dictation - type and dictate simultaneously! Like it? There's more:

*Custom keys -*
 instead of typing or dictating your name, signature, greetings or any other most-frequently used text - simply stamp it using the custom-keys row on our keyboard. [Premium feature]

*Continuous* (for real): Unlike other apps, where you have to click the mic over and over again for long dictations, Speechnotes will not stop even when you take longer breaks between sentences.

*Clean*: The clean elegant design, along with the non-stop voice recognition and other features means you can relax and focus on your thoughts and content.

*Super accurate:* using Google's voice recognition engines (best on the market)
* Works for you, with you: Automatic spacing and capitalization. Auto saves every change. Single click to share (send) your notes with any other app.
* Offline (depends on device & settings).
* Fun & personal: Fun font types and sizes for your choice. Dark & light modes - for battery saving or style.[Premium feature]

Powerful speech-enabled (voice-typing) notepad, designed to empower your ideas and creativity.

Featured on Gizmo's, GeekTime & other leading tech magazines. The highest rated Speech-to-Text Chrome app.

A Free Alternative to the pricy Dragon Naturally Speaking
Many of you told us that in some ways, it even outperforms Dragon. If you need to dictate an article, you will find Speechnotes not only cheaper, but perhaps even better for you.

System Requirements
Google speech recognition enabled as the default speech recognizer.
Internet connectivity (though works offline - internet is recommended)
Optional - but will get better results: download the necessary language packages

*Multilingual.*
Voice Commands in English:
We support a variety of useful voice commands in numerous languages. Here is a list of the main ones in English:
Period; comma; question mark; colon; semicolon; exclamation mark; exclamation point; new line; new paragraph; open parentheses; close parentheses; hyphen; smiley; smiley face; sad face; dash; open quotation; close quotation; quotation

*Privacy*
We very much value and protect your privacy. We don't store any of your data. We don't share it 3rd parties, other than Google, for the speech-to-text engine. We use the Android's native speech-recognizer - so Android's and your device's maker's privacy policies apply.

*Terms*
This app is given for your usage and enjoyment AS-IS. We do our best to develop the best apps, but, as with any software, we might have errors and furthermore, we rely on Google as our service provider, which might change its software without notice. Therefor, we cannot be responsible for any data loss, or failure in the software's performance. Furthermore, we rely on Google and Android as our speech recognition engine, so changes in their APIs might affect our app's performance. Failures might happen without notice. We encourage you to test the app before purchasing. In general, purchases are not refundable. Subscriptions can be stopped at any time.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰