डॉ कलाम यांच्या विषयी सामान्यपणे माहिती नसलेल्या या 10 गोष्टी जाणून घ्या...
1. देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी डॉ. कलाम हे एका खोलीच्या फ्लॅटमध्ये राहत होते आणि देशाच्या आघाडीच्या संरक्षण तंत्रज्ञानासाठी नव्या शोधाचं काम करत होते.
2. डॉ. कलाम यांच्या लहानपणी त्यांचे सर्वात जवळचे तीन मित्र होते. रामानंद शास्त्री, अरविंदम आणि शिवप्रकसन... हे तिन्ही जण हिंदू ब्राह्मण कुटुंबातील होते.
3. रामेश्वरम मंदिरातील प्रमुख लक्ष्मण शास्त्री हे डॉ. कलाम यांच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते.
4. डॉ. कलाम यांना कर्नाटक संगीत आणि एमएस सुब्बलक्ष्मी यांच्याबद्दल खूप आदर होता. कर्नाटक संगीत त्यांना खूप आवडायचं. सुब्बलक्ष्मी स्वत: आपल्या हातांनी जेवण बनवून डॉ. कलाम यांना वाढायच्या. त्यावेळी जेवतांना ते अगदी पारंपरिक पद्धतीनं म्हणजे खाली जमिनीवर बसून केळीच्या पानात जेवायचे.
5. डॉ. कलाम यांना दाक्षिणात्य पदार्थ विशेष करून इडली खूप आवडायची.
6. जेव्हा डॉ. कलाम यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी निवडलं गेलं. तेव्हा शपथविधी कार्यक्रमाला त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते. पण डॉ. कलाम हे असे व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या पदाचा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर केला नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांना सेंकड एसी रेल्वेनं दिल्लीला शपथविधीसाठी आणलं.
7. एकदा एका दीक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉ. कलाम यांची खूर्ची इतर खूर्च्यांपेक्षा वेगळी आणि मोठी होती. त्यामुळं त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार देत, साध्या खूर्चीवर ते बसले होते.
8. एकदा कलाम यांनी फुटलेली काच इमारतीला बसवायला नकार दिला होता. ती फॅशनसाठी होती. पण त्यामुळं पक्ष्यांना नुकसान झालं असतं, असं सांगत कलाम यांनी हा सल्ला नाकारला होता.
9. एकदा 400 विद्यार्थ्यांसमोर बोलत असतांना अचानक लाईट गेले. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठेही बाधा न येऊ देता डॉ. कलाम संपूर्ण विद्यार्थ्यांच्यामधून रांगेत फिरले आणि आपली चर्चा कायम ठेवली.
10. राष्ट्रपती बनल्यानंतर केरळच्या राज भवनात डॉ. कलाम यांनी सर्वात पहिल्यांदा निमंत्रित केलेले पाहूणे म्हणजे रस्त्यावर काम करणारा एका चांभार आणि छोट्या रेस्टॉरंटचा मालक.
-----------------------------------------------------------------------------
मराठी भाषण
सन्मानीय मंच,मंचावर उपस्तीत सर्व अतिथी महोदय व माझ्या बालमित्रांनो आपण सर्वांना माहीतच आहे की आपण ह्या ठिकाणी का जमलो आहोत,हो अगदी बरोबर आज 15 ऑक्टोबर ह्या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम याची जयंती व हा दिवस भारत सरकारने सर्वत्र "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा करायचा शासन आदेश दिले आहे.आज आपण ह्या ठिकाणी हा दिवस साजरा करत आहोत.ह्या निमित्ताने मी आज आपण ह्या महान व्यक्ती विशेष विषयी दोन शब्द सांगणार आहे कृपया आपण ते शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.रामेश्वरमधील कनिष्ठ मध्यमवर्गात जैनुलद्दीम कलाम या अशिक्षित पण बहुश्रुत पित्याच्या व सहनशील मातेच्या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म १९३१ साली झाला. रामेश्वरम ते धनुष्कोडी असा प्रवास करणाऱ्यांचे नाविकाचे काम करणे हा वडिलांचा व्यवसाय. सीताराम कल्याण या वार्षिक महोत्सवात रामाची मृर्ती आणण्याचा मान त्यांच्या नावेला मिळत होता. ते धार्मिक वृत्तीचे होते. शिवमंदिराचे मुख्य पुजारी पाक्षी लक्ष्मणशास्त्री हे त्यांचे घनिष्ट मित्र. त्या दोघांची आध्यात्मिक चर्चा ऐकण्यात कलामचे बालपण गेले.
सर्वधर्मसमभावाची शिकवण लहानपनापासुन त्यांचा मनावर ठसलेली होती. प्राथमिक शिक्षण आटोपून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते. त्याआधी भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी मद्रास (चेन्नई) इन्स्टीटयूट ऑफ टेकनोलॉजीत प्रवेश घेतला. तिथे त्यांनी एरोडायनॉमिक्सचा परिचय करून घेतला व उड्डानाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला. पण हवाईदलात त्यांना प्रवेश मिळाला नाही. स्वामी शिवानंदांशी त्यांची भेट झाली. ”तुझ्या नशिबी याहीपेक्षा काहीतरी उदात्त आहे.” असे ते म्हणाले. पुढे ते संरक्षण आणी उत्पादन विभागाचे प्रमुख बनले. व १९५८ साली ज्येष्ठ वैज्ञानिक अभियंता बनले.
त्यांनी संपूर्ण देशांतर्गत बनावटीचा हॉवरक्रफ्टचा आराखडा तयार करून तो संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना दाखविला व एका वर्षात त्यांनी हॉ वरक्रफ्टचा तयार केली. ‘नंदी’ हे त्यांचे नाव. पण प्रयोग पाहून आणखी उच्च प्रतीची हॉवरक्रफ्ट तयार करण्याची संधी मात्र मिळाली नाही. पुढे डॉ. विक्रम साराभाई यांच्याशी त्यांचा स्नेह जमला.
अमेरिकेत टिपू सुलतानच्या युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरु केले. रोहिणी या उपग्रहाणे सुरु झालेल्या हा प्रयत्न पृथ्वी,अग्नी, आकाश, नाग अशी विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तयार करून थांबला. त्यांचा वैज्ञानिक प्रवास आता उपग्रहांपर्यंत पोहोचला आहे.
डॉ. साराभाई, प्रा. मेनन,डॉ. राजा रामण्णा,डॉ. धवन, डॉ. ब्रम्ह प्रकाश यांचे कर्तुत्व व सहकार्य यांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात कृतज्ञतापुर्वक उल्लेख केला आहे. ”मला भाषणे करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी २५ हजार कि. मी. च्या वेगाने जाणारा अग्निबाण बनवायला सांगा, ते जमेल” एका सभेत ते उद्गारले. त्यावेळी ते इंदिरा गांधीसह त्या सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.
त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वाच्च नागरी पुरस्कार देऊन महान गौरव केला.
कलाम यांचे निधन २७ जुलै, २०१५ मध्ये शिलॉंग मध्ये झाले. ‘राहण्यायोग्य पृथ्वी निर्माण करणे’ य विषयावर इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना ते अचानक कोसळले. बेथनी येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतातच नव्हे तर सर्व जगातील विज्ञान प्रेमींवर शोककळा पसरली. कलाम यांनी आपल्या भरीव कामगिरीने, उत्तम बुद्धिमत्तेने आणि विनम्र स्वभावाने देशातील आजच्या व भावी पिढीसाठी उत्तम आदर्श ठेवला आहे. त्यांची कमतरता भारताला सदैव जाणवत राहील.
No comments :
Post a Comment