पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Friday, 13 October 2017

सरल महत्वाचे

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१११५*
*दिनांक* : *१३/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

*मा.न्यायालयाने आज दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,*

➡ १) *बदली अधिकार प्राप्त शिक्षक-TBR (संवर्ग-३) यांची यापूर्वी झालेल्या बदलीमध्ये बदल केलेला असून या संवर्गातील ज्या शिक्षकांनी बदलीसाठी फॉर्म भरलेले होते ते सर्व फॉर्म आज unverify करण्यात येत आहे.या संवर्गातील शिक्षकांना यापूर्वी जिल्ह्यातील एकूण बदली अधिकार प्राप्त (TBR) शिक्षकांच्या संख्येच्या दीड पट बदली पात्र शिक्षकांच्या जागा खो साठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये आता बदल करून संवर्ग-३ मधील शिक्षकांना आपल्या जिल्ह्यातील सर्व बदलीपात्र (TUC) शिक्षकांच्या जागा खो देण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे आता बदली अधिकार प्राप्त शिक्षक (अवडघड क्षेत्रातील शिक्षक) कोणत्याही बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची जागा आपल्या पसंतीक्रमामध्ये भरू शकता, हे लक्षात घ्यावे.*

➡ २) *मागील पाच दिवसापासून संवर्ग-१,संवर्ग-२ व,संवर्ग-३ तसेच समाणिकरणामुळे रिक्त ठेवावयाच्या जागांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.परंतु आज मा.न्यायालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे सदर प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलेला असून आता जिल्ह्यातील सर्व बदली पात्र शिक्षक(TUC) हे संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरू शकणार आहेत.हे बदलीपात्र शिक्षक आपल्यापेक्षा   या संवर्गातील बदली पात्र शिक्षकांनी आपला फॉर्म कसा भरावा यासाठी उद्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉगला मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.त्यानंतर आपण आपले फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करावी ही विनंती.तसेच या आधी संवर्ग-४ मध्ये भरलेले फॉर्म हे unverify करून दिलेले आहेत हे देखील सर्वांनी लक्षात घ्यावे.*

➡ ३) *सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की,बदली प्रक्रियेमध्ये विशेष बाब म्हणून कोणत्याही संवर्गातील/जिल्ह्यातील शिक्षकांना सूट देण्यात आलेली नाही.कृपया कोणत्याही चुकीच्या व तर्कहीन माहितीवर विश्वास ठेवून आपल्या बदली प्रकियेत अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.*

➡ *टीप: संवर्ग-१ व संवर्ग-२ मधील शिक्षकांनी आपले फॉर्म पुन्हा भरावयाचे नाही याची नोंद घ्यावी.त्यांनी यापूर्वी भरलेले फॉर्म हे नव्याने घेतल्या जाणाऱ्या बदलीच्या राऊंडसाठी अंतिम समजले जाणार आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *बदली अधिकार क्षेत्रातील व बदलीपात्र अशा दोन्ही संवर्गातील शिक्षकांना अशा दोन्ही संवर्गातील शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-३ व ४ मधील शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी व मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.*
pradeepbhosale.blogspot.in

➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com  ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

No comments :

Post a Comment