पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 4 October 2017

*सरल महत्वाचे* : *सूचना क्रमांक* : *११०८* *दिनांक* : *०४/१०/२०१७*



  *सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११०७*
*दिनांक* : *०४/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡  *सर्व शिक्षक बांधवाना सूचित करण्यात येत आहे की,जिल्हाअंतर्गत बदली-संवर्ग-४ साठी फॉर्म भरण्यासाठीची अंतिम मुदत ही दिनांक ०७/१०/२०१७ सायं ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.तरी सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म भरून वेरीफाय करावे.यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही.*

➡ *काही तांत्रिक अडचणीमुळे समाणिकरणाच्या याद्या अद्याप ceo लॉगिन ला उपलब्ध होऊ न शकल्याने संबंधित शिक्षकांना फॉर्म भरता यावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे,याची नोंद घ्यावी.*

➡ *समाणिकरणाच्या याद्यांबाबतचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून सदर यादी उद्या ceo लॉगिन ला उपलब्ध होणे अपेक्षित आहे,हे लक्षात घ्यावे.त्यानंतरच समाणिकरानांमुळे संवर्ग-४ मध्ये आलेल्या शिक्षकांनी आपले फॉर्म भरण्यास सुरुवात करावी.*

➡ *यापूर्वी समाणिकरणाची एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.परंतु जिल्हा लेवल वरून भरलेल्या माहितीमध्ये चूक झाल्याने ही यादी रद्द करण्यात आलेली आहे.परंतु दरम्यानच्या काळात त्या यादीनुसार जे शिक्षक समाणिकरणामुळे संवर्ग-४ मध्ये गणले गेले होते त्यांनी आपले फॉर्म ट्रान्सफर पोर्टल मध्ये भरलेले आहेत.जे शिक्षक आधी प्रसिद्ध झालेल्या यादीत होते आणि त्यांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु आता प्रसिद्ध होणाऱ्या नवीन यादीत त्यांचा समावेश  नसेल अशा शिक्षकांनी आपल्या बदली/फॉर्म बाबत अधिक काळजी करू नये.अशा शिक्षकांचे फॉर्म सिस्टिम द्वारे Delete करण्यात येईल.मात्र नवीन यादीत नव्याने समावेश होणाऱ्या शिक्षकांना मात्र आपले फॉर्म भरावे लागतील याची नोंद घ्यावी.तसेच समाणिकरणाच्या अद्ययावत नवीन यादीमुळे संवर्ग/१,संवर्ग-२ तसेच संवर्ग-३ मधील शिक्षकांच्या बदलीमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या यादीमध्ये काही जिल्ह्यामध्ये अंशतः बदल होऊ शकतो हे लक्षात घ्यावे.परंतु या पूर्वीच फॉर्म भरलेल्या शिक्षकांनी वर सूचना केल्याप्रमाणे आपले नाव कमी अधिक झाल्यास अधिक काळजी करण्याची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी.*

➡ *काही तांत्रिक अडचणीमुळे संवर्ग-४ साठी पुणे जिल्ह्याचे लॉगिन सुरु होऊ शकलेले नव्हते ते उद्या सायं सुरु होणार असून या जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनीदेखील दिलेल्या अंतिम मुदतीत फॉर्म भरावयाचे आहे याची नोंद घ्यावी.कोणत्याही कारणास्तव आपले फॉर्म भरावयाचे राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी वयक्तिक संबंधित शिक्षकाची राहील,याची नोंद घ्यावी.ज्या कर्मचाऱ्याचा अर्ज संवर्ग-४ च्या यादीत असूनदेखील भरावयाचा राहिला तर अशा शिक्षकाला संगणकाद्वारे घेतल्या जाणाऱ्या रँडम राउंड मध्ये घेतले जाईल याची नोंद घ्यावी.*

➡ *बऱ्याच जिल्ह्यांमध्ये संवर्ग-४ च्या शिक्षकांच्या नावाच्या pdf फॉरमॅट मधील याद्या whatsapp सारख्या सोशल माध्यमाच्या साहाय्याने शेअर होताना दिसून येत आहे.सदर यादी सर्व शिक्षकांना त्वरित समजावी यासाठी ही बाब आवश्यक आहे.परंतु काही व्यक्तीकडून मात्र संगणकाच्या मदतीने सदर याद्यांमध्ये हेतुपुरस्सर बदल करून शेअर केल्या जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आपल्या शिक्षक बांधवांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे.त्यामुळे यापुढे जेंव्हा बदलीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही याद्या या मा.अवर सचिव श्री.कांबळे साहेब यांच्या सहीचा वॉटर मार्क असलेली व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा मा.शिक्षणाधिकारी किंवा संबंधित काम पहाणारे सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित असलेल्या याद्याच अंतिम असल्याचे समजावे.इतर कोणत्याही याद्यांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.*

➡ *काल पासून सर्व्हर वर आलेल्या लोड मुळे ट्रान्सफर पोर्टल मध्ये काम करताना अडचण निर्माण झालेली लक्षात आल्याने तात्पुरत्या स्वरूपात पुणे,ठाणे,रायगड,भंडारा व मुंबई या जिल्ह्यांचे संवर्ग-४ चे लॉगिन बंद ठेवण्यात आलेले आहे.उद्या सायंकाळ पासून सदर जिल्ह्याचे लॉगिन उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे.*

➡ *सध्या बदलीसंदर्भात सोशल माध्यमामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे.परंतु सर्व शिक्षक बांधवाना विनंती आहे की,अधिकृत माहितीशिवाय इतर कोणत्याही माहीतीवर विश्वास ठेवू नये.अशा माहितीमुळे होणाऱ्या आपल्या गैरसमजुतीमुळे आपला फॉर्म भरण्याची कार्यवाही ही अपूर्ण राहणार नाही याची काळजी घ्यावी.शासन स्तरावर बदली बाबतची कार्यवाही ही नियोजनबद्ध सुरु असून आपण देखील आपली कार्यवाही त्या प्रमाणे करावी ही विनंती.*

➡ *संवर्ग-४ चा फॉर्म भरताना पसंतीक्रम निवडताना अतिशय काळजीपूर्वक नोंदवावे.आपण निवडलेल्या पसंतीक्रमामधून जर आपणास बदली मिळाली नाही तर आपले नाव संगणकाद्वारे केल्या जाणाऱ्या रँडम राउंड मध्ये जाईल.त्यावेळी आपले पसंतीक्रम विचारात न घेता संगणक प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या रिक्त जागेवर आपली बदली होईल,याची नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-४ मधील पति-पत्नी एकत्रीकरण सुविधेचा लाभ घेऊन फॉर्म भरताना अर्जदाराच्या जोडीदाराला फॉर्म भरताना Do You want to take the benifit of Husband wife Unifiction/Aggregation? या टॅब मध्ये yes/no भरताना समस्या येत होती.खरं तर या ठिकाणी जोडीदाराने No असे नमूद करणे गरजेचे होते.परंतु ही बाब शिक्षक बांधवाना न समजल्याने गोंधळ निर्माण झालेला होता.आता हा गोंधळ होऊ नये म्हणून वरील टॅब समोर सिस्टिम द्वारेच No असे नमूद करून  सदर टॅब लॉक केलेली आहे,याची नोंद घ्यावी.या टॅब समोर आपणास जोडीदाराला आता काहीही करावयाची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यावे.*

➡ *पदवीधर शिक्षकांना फॉर्म भरत असताना आपल्या विषयाच्या रिक्त असलेल्या शाळासोबत इतर विषयांच्या रिक्त असलेल्या शाळा देखील दिसून येत असल्याने फॉर्म भरताना आपल्या विषयाची रिक्त असलेली शाळा निवडणे अडचणीचे होत असल्याचे लक्षात आल्याने अशा पदवीधर शिक्षकांना लवकरच विषयनिहाय व शाळानिहाय रिक्त जागेचा रिपोर्ट ceo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर माहिती ही जिल्हा परिषद/पंचायत समिती कार्यालयाच्या दशनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याची नोंद घ्यावी.सदर यादी उपलब्ध झाल्यानंतर पदवीधर शिक्षकांनी फॉर्म भरावा.जर आपणास कोणत्या शाळेत कोणत्या विषयाची जागा रिक्त आहे हे खात्रीपूर्वक माहिती असेल तर आपण सध्या फॉर्म भरण्यास काही हरकत नाही परंतु आपण विषय व शाळा यामध्ये  गोंधळून गेला असाल तर मात्र उद्या सायंकाळपर्यंत सर यादीची वाट पहावी. आपणास फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.परंतु ज्या पदवीधर  शिक्षकांनी या आधीच आपले फॉर्म भरलेले असेल अशा शिक्षकांचे फॉर्म unverify करून देण्यात येणार असून त्यांनी आपले पसंतीक्रम पुन्हा एकदा पडताळून त्यात आवश्यक वाटल्यास बदल/दुरुस्ती करून वेरीफाय करावयाचे आहे.त्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.आपले फॉर्म unverify केले की आपणास कळविण्यात येईल ,तोपर्यंत पुढील सुचनेची वाट पाहावी.*

➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com  ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.


******************************************
*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११०८*
*दिनांक* : *०४/१०/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही *मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती* यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)
__________________________________________
  *Student पोर्टल बाबत महत्वाची सूचना* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,student पोर्टल मध्ये विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठीची अंतिम मुदत ही दिनांक १६/१०/२०१७ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.दिनांक १६/१०/२०१७ ला आपल्या student पोर्टल मधील उपलब्ध माहितीवर आपल्या शाळेची संचमान्यता करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

No comments :

Post a Comment