पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Thursday, 12 October 2017

*सरल महत्वाचे* : *सूचना क्रमांक* : *१११३* *दिनांक* : *१२/१०/२०१७

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१११३*
*दिनांक* : *१२/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित कारण्यात येते की,जिल्हाअंतर्गत बदली संवर्ग-४ मधील शिक्षकांना फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही दिनांक ११/१०/२०१७  पर्यंत देण्यात आलेली होती.परंतु अद्याप बऱ्याच शिक्षकांचे फॉर्म भरावयाचे राहिल्याने ही मुदत आजअखेर म्हणजेच दिनांक १२/१०/२०१७ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे,याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-४ मधील सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म भरणे बंधनकारक असल्याने आजपर्यंत किती शिक्षकांनी आपले फॉर्म भरलेले आहेत याचा रिपोर्ट ceo लॉगिन ला देण्यात आलेला आहे.या रिपोर्ट च्या मदतीने ज्या शिक्षकांनी आपले फॉर्म अद्याप भरलेले नाहीत त्यांचा शोध मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेता येणार आहे.तसेच ज्या शिक्षकांना इंटरनेट ची सुविधा उपलब्ध नसल्याने फॉर्म भरता येत नसेल तर अशा शिक्षकांनी आपल्या गटशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या मदतीने सुविधा उपलब्ध करून घेऊन आपला फॉर्म भरून घेण्याच्या सूचना मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आहेत.अर्थात संवर्ग-४ मध्ये कोणत्याही सबबींमुळे फॉर्म भरावयाचा राहणार नाही याची सर्वांनी काळजी शासन स्तरावर घेण्यात येत आहे.*

➡ *जे शिक्षक संवर्ग-४ मध्ये आपला फॉर्म भरणार नाहीत अशा शिक्षकांना पुढील राउंड मध्ये आपला पसंतीक्रम विचारात न घेता जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागेवर संगणक प्रणालीद्वारे बदली देण्यात येणार असल्याने कृपया कोणीही आपला फॉर्म भरावयाचे ठेवू नये.*

➡ *संवर्ग-४ अंतर्गत शिक्षकांनी फॉर्म भरल्यानंतर जर निवडलेल्या पसंतीक्रमामध्ये आपणास एकही जागा मिळाली नाही तर त्यानंतर आपली बदली संगणक प्रणाली द्वारे जिल्ह्यामधील शिल्लक असलेल्या कोणत्याही जागेवर आपले पसंतीक्रम विचारात न घेता होण्याची शक्यता असल्याने कृपया आपण आपले पसंतीक्रम काळजीपूर्वक निवडावेत.यासाठी आपल्या पसंतीक्रमामध्ये अशा शाळा निवडाव्यात ज्या आपल्या वरिष्टतेनुसार आपणास मिळू शकतील.*

➡ *काही शिक्षकांनी स्टाफ पोर्टल मध्ये माहिती भरताना आपले नाव दोन वेळा नोंदवलेले आहे.त्यामुळे एका नावाचा उपयोग करून बदलीसाठी फॉर्म भरला व बदली देखील झालेली आहे.परंतु त्याच शिक्षकांचे दुसरे नाव बदलीपात्र शिक्षक म्हणून ceo लॉगिन ला मॅप झालेले असल्याने त्यांना खो देखील मिळालेला आहे.म्हणजेच एकाच शिक्षकाची त्यांनी फॉर्म भरल्याने बदली झाली व दुसऱ्या बाजूला त्याच शिक्षकाला खो देखील मिळालेला आहे.त्यांच्या चुकीमुळे बदली प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे.आपल्या या चुकीमुळे इतर शिक्षकाची चूक नसताना त्यांच्या बदलीवर परिणाम पडलेला आहे.त्यामुळे इतरांचे नुकसान होऊ नये म्हणून अशा स्टाफ पोर्टल मध्ये दोन वेळा नोंद झालेल्या एका शिक्षकाने जर फॉर्म भरल्याने बदली झालेली असेल व  खो देखील बसलेला असेल तर आता अशा शिक्षकांनी संवर्ग-४ मध्ये आपला फॉर्म भरावा,अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत,याची नोंद घ्यावी.*

➡ *काही शिक्षकांनी चुकून संवर्ग-१/संवर्ग-२/संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरले होते परंतु सदर फॉर्म वेरीफाय न करता ड्राफ्ट मोड मध्ये सेव झालेले होते.त्या त्या वेळी असे फॉर्म delete करावे अशा सूचना दिलेल्या होत्या.परंतु संबंधित शिक्षकांनी योग्य कार्यवाही न केल्याने अशा शिक्षकांना आता संवर्ग-४ चा फॉर्म भरता येत नाही.परंतु संवर्ग-४ चा फॉर्म भरणे बंधनकारक असल्याने अशा draft मध्ये असलेल्या शिक्षकापैकी ज्या शिक्षकांना खो मिळालेले आहेत अशाच शिक्षकांनी देखील संवर्ग-४ मध्ये आपले फॉर्म भरावयाचे आहेत.काल दुपारी १२ वाजेपासून अशा शिक्षकांचे नाव त्यांच्या शाळेच्या लॉगिन फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-४ मधील शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी व मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.*
pradeepbhosale.blogspot.in

➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com  ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

No comments :

Post a Comment