पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 9 October 2017

*सरल महत्वाचे* : *सूचना क्रमांक* : *११११*

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११११*
*दिनांक* : *०९/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡  *सर्व शिक्षक बांधवाना सूचित करण्यात येत आहे की,जिल्हाअंतर्गत बदली-संवर्ग-४ साठी फॉर्म भरण्यासाठीची अंतिम मुदत ही दिनांक ०७/१०/२०१७ सायं ५ वाजेपर्यंत दिलेली होती,परंतु तांत्रिक अडचणीमुळे समाणिकरणाच्या याद्या प्रसिद्ध होण्यासाठी लागलेला वेळ लक्षात घेता ही मुदत दिनांक ११/१०/२०१७ सायं ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.तरी सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म भरून वेरीफाय करावे.यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही.*

➡ *महत्वाची सूचना: संवर्ग-४ साठी सध्या पुढील जिल्ह्यांनाच लॉगिन उपलब्ध आहे.या जिल्ह्यातीलच शिक्षकांनी आपले फॉर्म भरावेत.*

*नंदुरबार,धुळे,जळगाव,बुलढाणा,अकोला,वाशिम,अमरावती,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ,नांदेड,हिंगोली,परभणी,जालना,औरंगाबाद,ठाणे,पुणे,रायगड,सोलापूर.*

*या व्यतिरिक्त जिल्ह्यांतील शिक्षकांना उद्या दुपारी १२ वाजेपासून लॉगिन उपलब्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी.*

➡ *यापूर्वी ceo लॉगिन ला दोन याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.*

✏ १) जे शिक्षक संवर्ग-१,संवर्ग-२ व संवर्ग-३ मधील शिक्षकांच्या बदल्यांमुळे विस्थापित झालेले आहेत अशा शिक्षकांच्या नावांची यादी.
✏ २) समाणिकरनांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या नावांची यादी.

➡ *जिल्हा लेवल वरून रिक्त जागा व समाणिकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदांच्या बाबत भरलेल्या माहितीमध्ये चूक झालेली होती.सदर चुकलेली माहिती संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मधून दुरुस्त करून घेतल्याने आता या पूर्वी वर उल्लेख केलेल्या दोन्ही याद्यांमध्ये अंशतः बदल झालेला आहे.या दोन्ही अपडेटेड याद्या ceo लॉगिन ला आज नव्याने उपलब्ध करून दिलेल्या आहेत याची नोंद घ्यावी.त्यामुळे ही नवीन यादी सर्व शिक्षक बांधवांनी पहावी व आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी.*

➡ *समाणिकरणामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांची व संवर्ग-१,संवर्ग-२ व संवर्ग-३ च्या बदल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या यादीमध्ये अंशतः बदल झाल्याने व पसंतीक्रमामध्ये थोडाफार बदल झालेला असल्याने यापूर्वी संवर्ग-४ मध्ये ज्या शिक्षकांनी आपले फॉर्म भरलेले आहेत अशा सर्व शिक्षकांना आपले फॉर्म दुरुस्त करून पून्हा भरण्याची एक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी संवर्ग-४ मधील सर्व शिक्षकांनी यापूर्वी भरलेले फॉर्म सिस्टिम द्वारे unverify करण्यात आलेले आहेत.तरी सर्व शिक्षकांना विनंती आहे की,आपण यापूर्वी भरलेले फॉर्म पुन्हा एकदा तपासावे.त्यात काही दुरुस्ती असेल तर ती करून घ्यावी.त्यानंतर पुन्हा एकदा आपला फॉर्म वेरीफाय करावा.आपण आपला फॉर्म वेरीफाय केला नाही तर आपली संवर्ग-४ मधून बदली होणार नाही,परंतु त्यानंतर आपली बदली संगणकाद्वारे घेतल्या जाणाऱ्या रँडम राउंड मध्ये होईल याची नोंद घ्यावी.*

➡ *जे शिक्षक यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या परंतु चुकलेल्या दोन्ही याद्यांपैकी एका यादीत होते.असे असताना त्यांनी संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरलेले आहेत परंतु आता प्रसिद्ध झालेल्या नवीन यादीत त्यांचा समावेश  नाही अशा शिक्षकांनी आपल्या बदली/फॉर्म बाबत अधिक काळजी करू नये.अशा शिक्षकांनी आपले फॉर्म delete करावेत.*

➡ *संवर्ग-४ मधील पूर्वीच्या यादीत नाव नव्हते.मात्र आज प्रसिद्ध झालेल्या नवीन यादीत नाव आहे अशा नव्याने समावेश होणाऱ्या शिक्षकांना मात्र आपले फॉर्म नव्याने भरावे लागतील याची नोंद घ्यावी.*

➡ *काही तांत्रिक अडचणीमुळे संवर्ग-४ साठी पुणे,ठाणे,रायगड व भंडारा जिल्ह्याचे लॉगिन सुरु होऊ शकलेले नव्हते ते आज  सुरु केलेले असून या जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनीदेखील दिलेल्या अंतिम मुदतीत फॉर्म भरावयाचे आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *कोणत्याही कारणास्तव आपले फॉर्म भरावयाचे राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षकाची राहील,याची नोंद घ्यावी.ज्या कर्मचाऱ्याचा अर्ज संवर्ग-४ च्या यादीत असूनदेखील भरावयाचा राहिला तर अशा शिक्षकाला पुढील राउंड मध्ये घेतले जाईल याची नोंद घ्यावी.*

➡ *समाणिकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदांची विषयनिहाय आकडेवारी सध्या उपलब्ध नसल्याने संवर्ग-४ मधील पदवीधर शिक्षकांना फॉर्म भरताना जे पसंतीक्रम दिसतात त्यामध्ये भाषा,विज्ञान,सा.शास्त्र या तीनही विषयांची रिक्त जागा असलेल्या शाळांची नावे दिसून येत आहे.त्यामुळे आपला जो विषय आहे त्या विषयांची नेमकी शाळा कोणती आहे हे समजणे अडचणीचे होत आहे हे जरी खरे असले तरी सिस्टिम द्वारे त्या त्या विषयांची रिक्त जागा वेगळी दाखवणे शक्य नसल्याने अर्जदाराने त्या त्या शाळेची रिक्त जागेसंबंधी जिल्हा,तालुका,शाळा पातळीवर रिक्त जागा,बदली साठी मागणी केलेल्या शिक्षकांच्या विषयांची जागा इत्यादी बाबत चौकशी व अभ्यास करून पसंतीक्रम निवडावेत.तसेच आपणास २० शाळा पसंतीक्रमामध्ये असल्याने आपणास आपल्या पसंतीक्रमामधील शाळा नक्की मिळेल अशी अपेक्षा आहे.आपणास २० पसंतीक्रमामधील  शाळा न मिळाल्यास आपणास पुढील राउंड मध्ये संधी देण्यात येणार आहे,असे समजते.तरी सर्व पदवीधर शिक्षकांनी आपले फॉर्म भरून घ्यावेत.*

➡ *बऱ्याच जिल्ह्यांमध्ये संवर्ग-४ व समाणिकरणामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या नावाच्या pdf फॉरमॅट मधील याद्या whatsapp सारख्या सोशल माध्यमाच्या साहाय्याने शेअर होताना दिसून येत आहे.सदर यादी सर्व शिक्षकांना त्वरित समजावी यासाठी ही बाब आवश्यक आहे.परंतु काही व्यक्तीकडून मात्र संगणकाच्या मदतीने सदर याद्यांमध्ये हेतुपुरस्सर बदल करून शेअर केल्या जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आपल्या शिक्षक बांधवांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे.त्यामुळे यापुढे जेंव्हा बदलीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही याद्या या मा.अवर सचिव श्री.कांबळे साहेब यांच्या सहीचा वॉटर मार्क असलेली व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा मा.शिक्षणाधिकारी किंवा संबंधित काम पहाणारे सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित असलेल्या याद्याच अंतिम असल्याचे समजावे.इतर कोणत्याही याद्यांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.*

➡ *सध्या बदलीसंदर्भात सोशल माध्यमामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे.परंतु सर्व शिक्षक बांधवाना विनंती आहे की,अधिकृत माहितीशिवाय इतर कोणत्याही माहीतीवर विश्वास ठेवू नये.अशा माहितीमुळे होणाऱ्या आपल्या गैरसमजुतीमुळे आपला फॉर्म भरण्याची कार्यवाही ही अपूर्ण राहणार नाही याची काळजी घ्यावी.शासन स्तरावर बदली बाबतची कार्यवाही ही नियोजनबद्ध सुरु असून आपण देखील आपली कार्यवाही त्या प्रमाणे करावी ही विनंती.*

➡ *संवर्ग-४ चा फॉर्म भरताना पसंतीक्रम निवडताना अतिशय काळजीपूर्वक नोंदवावी.आपण निवडलेल्या पसंतीक्रमामधून जर आपणास बदली मिळाली नाही तर आपले नाव संगणकाद्वारे केल्या जाणाऱ्या रँडम राउंड मध्ये जाईल.त्यावेळी आपले पसंतीक्रम विचारात न घेता संगणक प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या रिक्त जागेवर आपली बदली होईल,याची नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-४ मधील पति-पत्नी एकत्रीकरण सुविधेचा लाभ घेऊन फॉर्म भरताना अर्जदाराच्या जोडीदाराला फॉर्म भरताना Do You want to take the benifit of Husband wife Unifiction/Aggregation? या टॅब मध्ये yes/no भरताना समस्या येत होती.खरं तर या ठिकाणी जोडीदाराने No असे नमूद करणे गरजेचे होते.परंतु ही बाब शिक्षक बांधवाना न समजल्याने गोंधळ निर्माण झालेला होता.आता हा गोंधळ होऊ नये म्हणून वरील टॅब समोर सिस्टिम द्वारेच No असे नमूद करून  सदर टॅब लॉक केलेली आहे,याची नोंद घ्यावी.या टॅब समोर आपणास जोडीदाराला आता काहीही करावयाची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यावे.*

➡ *काही शिक्षकांनी चुकून संवर्ग-१/संवर्ग-२/संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरले होते परंतु सदर फॉर्म वेरीफाय न करता ड्राफ्ट मोड मध्ये सेव झालेले होते.त्या त्या वेळी असे फॉर्म delete करावे अशा सूचना दिलेल्या होत्या.परंतु संबंधित शिक्षकांनी योग्य कार्यवाही न केल्याने अशा शिक्षकांना आता संवर्ग-४ चा फॉर्म भरता येत नाही.परंतु संवर्ग-४ चा फॉर्म भरणे बंधनकारक असल्याने अशा शिक्षकांना संवर्ग-४ चा भरण्यासाठी सिस्टिम द्वारे उद्यापासून लॉगिन उपलब्ध करून दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-४ मधील शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी व मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.*
pradeepbhosale.blogspot.in

➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com  ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

No comments :

Post a Comment