पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 3 October 2017

*सूचना क्रमांक* : *११०६* *दिनांक* : *०३/१०/२०१७

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११०६*
*दिनांक* : *०३/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता सदर पोस्ट वाचनातून नुकसान होऊ नये म्हणून सदर पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवाना सूचित करण्यात येते की,सर्व जिल्ह्यांची (पुणे जिल्हा वगळता) जिल्हाअंतर्गत बदली-संवर्ग-४ ची प्रक्रिया सुरु असून सदर फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही दिनांक ०४/१०/२०१७ देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-४ मधील ज्या शिक्षकांना  पति-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ घ्यायचा आहे अशा अर्जदार शिक्षकाने (संवर्ग-४ मध्ये असलेला बदलीपात्र शिक्षक) प्रथमतः आपला फॉर्म भरावा.सदर फॉर्म भरताना अर्जदार शिक्षकांने आपल्या जोडीदाराचा स्टाफ ID नमूद करणे गरजेचे आहे.आपल्या जोडीदाराचा स्टाफ ID जोपर्यंत फॉर्म मध्ये नमूद केला जात नाही तोपर्यंत जोडीदाराला पति-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ मिळणार नाही,याची नोंद घ्यावी.तसेच जेंव्हा अर्जदार आपला फॉर्म भरून verify करेल त्यानंरच त्याच्या जोडीदाराला पति-पत्नी एकत्रिकरनाअंतर्गत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होते याची नोंद घ्यावी.जोडीदाराने आपला फॉर्म भरत असताना Do You want to take the benifit of Husband wife Unifiction/Aggregation? या वाक्यासमोरील Yes /No  या टॅब पैकी No या टॅब वर क्लीक करून पुढील फॉर्म भरावयाचा आहे.*

✏ *टीप: पति-पत्नी एकत्रिकरन या सुविधेचा लाभ घेणार असणाऱ्या शिक्षकांच्या जोडीदाराने आपला फॉर्म भरताना कृपया  Do You want to take the benifit of Husband wife Unifiction/Aggregation? या वाक्यासमोरील टॅब समोर Yes वर क्लीक करू नये.कारण मूळ अर्जदाराने पति-पत्नी एकत्रीकरण साठी Yes (होकार) नोंदवलेला असून त्याच्या जोडीदाराने पुन्हा Yes या टॅब वर क्लीक करण्याची आवश्यकता नाही.जर जोडीदाराने Yes या टॅब वर क्लीक केले तर अशा शिक्षकाला Spouse teacher ID has already applied for Transfer अशी सूचना स्क्रीनवर दिसून येईल व त्यानंतर पुढील फॉर्म अशा जोडीदाराला भरू दिला जात नाही याची नोंद घ्यावी.बऱ्याच शिक्षकांना ही बाब न समजल्याने गोंधळ निर्माण झालेला आहे.त्यामुळे वरील सूचनेचा अभ्यास करूनच आपलं फॉर्म भरावा.*

➡ *स्टाफ पोर्टल मध्ये माहिती भरत असताना काही शिक्षकांची माहिती चुकलेली आहे.अशा वेळी ती माहिती दुरुस्त करून घेणे अपेक्षित असताना ती चुकीची माहिती दुरुस्त करून न घेता आपल्या नावाने दुसऱ्यांदा भरलेली आहे.अशा वेळी एकाच शाळेत एकाच शिक्षकाचे दोन वेळा नाव दिसून येत आहे.म्हणजेच एका शिक्षकांचे दोन वेगवेगळे स्टाफ ID तयार झाले आहेत.त्यापैकी एका ID ने फॉर्म भरलेला असून दुसरा  ID बदलीपात्र शिक्षक म्हणून ceo लॉगिन मध्ये मॅप झालेला असल्याचे लक्षात आले आहे.अशा उदाहरनामध्ये त्या शिक्षकाच्या एका नावाची बदली झालेली असून दुसरे नाव खो मिळालेल्या शिक्षकांच्या यादीत देखील आलेले आहे.सदर बाब त्या शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने केल्याने स्वतःच्या बदली प्रक्रियेत गोंधळ निर्माण केलेला आहे.अशा शिक्षकाचा त्याने फॉर्म भरलेल्या संवर्गानुसार बदलीचा लाभ न देता संवर्ग-४ मध्ये समावेश करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेला आहे.या निर्णयाची अधिकृत सूचना लवकरच सर्व ceo यांना लवकरच कळविण्यात येणार आहे.त्यानंतर अशा शिक्षकांनी चौथ्या संवर्गात आपले फॉर्म भरण्याची कार्यवाही करावी.*

➡ *काही शिक्षकांच्या बाबतीत TUC यादीत नाव आलेले आहे परंतु शाळेच्या लॉगिन ला संवर्ग-४ चा फॉर्म भरण्यासाठी नाव दिसून येत नाही किंवा शाळेच्या लॉगिन ला नाव दिसून येते परंतु Ceo लॉगिन मधील यादीत नाव दिसून येत नाही अशा  अडचणी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.अशी समस्या निर्माण होण्यामागे खालील कारणे असू शकतात.*

✏अ) *एकापेक्षा अधिक वेळा स्टाफ पोर्टल ला आपली माहिती भरलेली असणे.*
✏ब) *आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत बदली झालेली आहे परंतु अद्याप कार्यमुक्त केलेले नाही मात्र जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत फॉर्म भरलेला असणे.*
✏क) *फॉर्म भरल्यानंतर स्वतःला आपल्याच शाळेतून Detach करून दुसऱ्या शाळेला Attach केलेले असणे.*
✏ड) *फॉर्म भरल्यानंतर स्वतःला Teaching Staff मधून Non-Teaching स्टाफ मध्ये ट्रान्सफर करणे.*
✏इ) *स्टाफ पोर्टल मध्ये Personal details चा फॉर्म verify नसणे.*

 *अशा विविध कारणाने ट्रान्सफर प्रक्रियेमध्ये संबंधित शिक्षकाला अडथळा निर्माण होत आहे.ज्या शिक्षकांना वर उल्लेख केल्याप्रमाणे जर अडचण निर्माण झालेली असेल तर वरील शक्यता तपासून घेऊन आपली माहिती त्वरित दुरुस्त करून घ्यावी.*

➡ *सर्व्हर च्या तांत्रिक अडचणीमुळे व सलग आलेल्या शासकीय सुट्टीमुळे समाणिकरणाच्या याद्या Declare होऊ शकलेल्या नसून सदर याद्या आज ceo लॉगिन ला उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.सदर यादी उपलब्ध झाल्यानंतर समाणिकरण्याच्या यादीत असलेल्या शिक्षकांनी संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरावे.अशा शिक्षकांना पर्याप्त वेळ देण्यात येणार असल्याने अंतिम मुदतीबाबत अधिक काळजी करण्याची गरज नाही याची नोंद घ्यावी.*

➡ *संपूर्ण सोपे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यामधील बदलीपात्र होण्यासाठी गृहीत धरावयाची सलग सेवा ही एकापेक्षा अधिक शिक्षकांची सारखी आहे.त्यामुळे अशा सारखी सेवा असणाऱ्या शिक्षकांमध्ये त्यांच्या नोकरीला लागल्याच्या तारखेच्या निकषावर वरिष्ठ ठरवले गेले आहे.परंतु एकाच शाळेत ही तारीख देखील सारखी असणारे शिक्षक आढळून आलेले आहेत.अशा वेळी अशा शिक्षकांमध्ये त्या शाळेमध्ये वरिष्ठ कोण हे ठरवताना त्यांच्या जन्मतारखेचा निकष लावण्यात आलेला आहे.परंतु काही शिक्षकांच्या बाबतीत हा निकष चुकलेला असल्याचे लक्षात आल्याने सदर चूक ही आज दुरुस्त केली जाणार आहे.त्यामुळे अशा शिक्षकांच्या बाबतीत ज्या शिक्षकांचे वय कमी आहे त्या ऐवजी अधिक वय असलेला शिक्षक कर्मचारी बदलीपात्र होणार आहे,याची नोंद घ्यावी.तसा बदल आपल्या लॉगिन ला लवकरच दिसून येईल.*

➡ *काही शिक्षकांनी चुकून संवर्ग-१/संवर्ग-२/संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरले होते परंतु सदर फॉर्म वेरीफाय न करता ड्राफ्ट मोड मध्ये सेव झालेले होते.त्या त्या वेळी असे फॉर्म delete करावे अशा सूचना दिलेल्या होत्या.परंतु संबंधित शिक्षकांनी योग्य कार्यवाही न केल्याने अशा शिक्षकांना आता संवर्ग-४ चा फॉर्म भरता येत नाही.परंतु संवर्ग-४ चा फॉर्म भरणे बंधनकारक असल्याने अशा शिक्षकांना संवर्ग-४ चा भरण्यासाठी सिस्टिम द्वारे लॉगिन उपलब्ध करून दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी.तोपर्यंत त्यांनी आपणास फॉर्म भरता येत नाही म्हणून गोंधळून न जाता पुढील सुचनेची वाट पाहावी.*

➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com  ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

No comments :

Post a Comment