पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday, 1 October 2017

सरल post

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११०५*
*दिनांक* : *०१/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता सदर पोस्ट वाचनातून नुकसान होऊ नये म्हणून सदर पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवाना सूचित करण्यात येत आहे की,जिल्हाअंतर्गत बदली संवर्ग-४ साठी पुणे जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांसाठी दिनांक २९/०९/२०१७ पासून लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.संवर्ग-४ चा फॉर्म भरण्याची मुदत ही दिनांक ०२/१०/२०१७ दिलेली होती.परंतु अद्याप बऱ्याच शिक्षकांचे फॉर्म भरावयाचे बाकी असल्याची बाब लक्षात घेता ही अंतिम मुदत दिनांक ०४/१०/२०१७ पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे.*

➡ *सर्व्हरमध्ये आलेली तांत्रिक समस्या व आलेल्या सलग शासकीय सुट्टी यामुळे पुणे जिल्ह्यांसाठी लॉगिन उपलब्ध होऊ शकलेले नसून लवकरच ही समस्या सोडवण्यात येईल व लॉगिन उपलब्ध करण्यात येणार आहे व या जिल्ह्यातील संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ देखील देण्यात येणार असून या जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी फॉर्म भरण्यासंदर्भात कोणतीही काळजी करू नये, याची नोंद घ्यावी.*

➡ *सध्या संवर्ग-१,संवर्ग-२,संवर्ग-३ मधील शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या नावांची यादी ceo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.परंतु समाणिकरणामुळे रिक्त ठेवावयाच्या पदांची यादी अद्याप ceo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने संबंधित शिक्षकांनी सदर यादी उपलब्ध होईपर्यंत फॉर्म भरू नये,ही विनंती.सदर यादी उपलब्ध करून दिल्यानंतर या शिक्षकांना फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येणार असल्याने या शिक्षकांनी वेळेसंदर्भात अधिक काळजी करू नये.*

➡ *पदवीधर शिक्षकांना फॉर्म भरत असताना आपल्या विषयाच्या रिक्त असलेल्या शाळासोबत इतर विषयांच्या रिक्त असलेल्या शाळा देखील दिसून येत असल्याने फॉर्म भरताना आपल्या विषयाची रिक्त असलेली शाळा निवडणे अडचणीचे होत असल्याचे लक्षात आल्याने अशा पदवीधर शिक्षकांना लवकरच विषयनिहाय व शाळानिहाय रिक्त जागेचा रिपोर्ट ceo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर माहिती ही जिल्हा परिषद/पंचायत समिती कार्यालयाच्या दशनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याची नोंद घ्यावी.सदर यादी उपलब्ध झाल्यानंतर पदवीधर शिक्षकांनी फॉर्म भरावा.जर आपणास कोणत्या शाळेत कोणत्या विषयाची जागा रिक्त आहे हे खात्रीपूर्वक माहिती असेल तर आपण सध्या फॉर्म भरण्यास काही हरकत नाही परंतु आपण विषय व शाळा यामध्ये  गोंधळून गेला असाल तर मात्र उद्या सायंकाळपर्यंत सर यादीची वाट पहावी. आपणास फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *बदली प्रक्रिया मध्ये सेवाजेष्ठता ही बाब अतिशय महत्वाची आहे हे आता सर्वांच्या लक्षात आलेले असेलच.परंतू या पेक्षा देखील बदलीपात्र होण्यासाठी गृहीत धरावयाची सलग सेवेचा कालावधी अधिक महत्वाचा आहे हे लक्षात घ्यावे.ज्या शिक्षकांची बदली पात्र होण्यासाठी गृहीत धारावयाची सलग सेवा ही अधिक असेल त्या शिक्षकाला प्रथम खो बसेल हे लक्षात घ्यावे.सदर सेवा विचारात घेताना शासन निर्णयाप्रमाणे आपल्या या सेवा कालावधीमधील फक्त एकूण महिन्यांचा विचार केला जाणार आहे.म्हणजेच बदली पात्र होण्यासाठी गृहीत धरावयाची सलग सेवेचा कालावधी जर 12 वर्षे 4 महिने व 12 दिवस असेल तर आपली सेवा ही 148 महिने व 12 दिवस असे न धरता फक्त 148 महिने धरण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.ज्या शिक्षकांची अशी सेवा सारखी आहे अशा शिक्षकांमध्ये ज्यांनी या पूर्वी अवघड क्षेत्रात सेवा केलेली आहे असे शिक्षक सेवाजेष्ठतामध्ये ज्युनिअर समजेल जातील म्हणजेच ज्या शिक्षकांनी या आधी कधीही अवघड क्षेत्रात काम केलेले नाही असे शिक्षक सिनिअर समजले जातील.या असे असूनही  जे शिक्षक समान सेवाजेष्ठ असेल त्यांना त्यांच्या जन्म तारखेच्या निकषावर व त्यानंतर नावाच्या आद्याक्षराच्या निकषावर सिनिअर ठरवले जाईल याची नोंद घ्यावी.*

➡ *काही शिक्षकांनी चुकून संवर्ग-१/संवर्ग-२/संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरले होते परंतु सदर फॉर्म वेरीफाय न करता ड्राफ्ट मोड मध्ये सेव झालेले होते.त्या त्या वेळी असे फॉर्म delete करावे अशा सूचना दिलेल्या होत्या.परंतु संबंधित शिक्षकांनी योग्य कार्यवाही न केल्याने अशा शिक्षकांना आता संवर्ग-४ चा फॉर्म भरता येत नाही.परंतु संवर्ग-४ चा फॉर्म भरणे बंधनकारक असल्याने अशा शिक्षकांना संवर्ग-४ चा भारण्यासाठी सिस्टिम द्वारे लॉगिन उपलब्ध करून दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी.तोपर्यंत त्यांनी आपणास फॉर्म भरता येत नाही म्हणून गोंधळून न जाता पुढील सुचनेची वाट पाहावी.*

➡ *जे शिक्षक संवर्ग-४ मध्ये पति-पत्नी एकत्रीकरण या सुविधेचा लाभ घेऊ इच्छितात अशा शिक्षकांना आपला फॉर्म भरताना आपल्या जोडीदाराचा स्टाफ ID नमूद केल्यानंतर आपल्या जोडीदाराचा फॉर्म ओपन करून दिला जातो.त्यानंतर जोडीदाराने आपला फॉर्म भरणे अपेक्षित आहे हे लक्षात घ्यावे.अशा जोडीदाराने फॉर्म भरताना टेक्निकल अडचन निर्माण झालेली असून ही अडचण उद्या दुपारपर्यंत सोडवण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.त्यानंतर अशा शिक्षकांनी आपला फॉर्म भरावा ही विनंती.*

➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com  ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

No comments :

Post a Comment