प्रति,
1) उपसंचालक (सर्व ),
2)प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
3)शिक्षणाधिकारी (सर्व - प्राथमिक - माध्यमिक),
4)शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी
आपणास ज्ञात असल्याप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र, पुणे व LFE यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी *'ऑनलाईन अधिकारी व्यावसायिक विकास मंच'* तयार करण्यात आला असून आतापर्यंत एकूण २८ खुले सत्र यामध्ये पार पडले आहेत. या सर्व सत्रास आपण सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळे आणि अजूनही शाळा सुरु करू शकत नसल्यामुळे आपण याच मंचावर पुन्हा भेटत आहोत एका नव्या पैलूसह. तुम्हाला ज्ञातच आहे की कोविड-19 मुळे शाळा जरी बंद असल्या तरी आपल्या राज्यातील अनेक शिक्षक वाड्या वस्त्या तांड्यावर तसेच शहरी व दुर्गम भागात स्वयं प्रेरणेने मुलांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.या प्रयत्नांची दखल घेत आम्ही *ऑनलाईन शिक्षक विकास मंच* सुरु केला आहे. या मध्ये आपल्या जिल्ह्यातील लॉक डाऊनच्या काळात प्रभावी कामे करणाऱ्या दोन शिक्षक /शिक्षिकांची नावे जीवन शिक्षणच्या पुढील ई-मेल वर jeevanshikshan@maa.ac.in यावर त्यांच्या कामाच्या थोडक्यात टिपणी सह कळवावे.
तसेच आपण व आपल्या अधिनस्थ सर्व अधिकारी , शिक्षक व कर्मचाऱ्यांना या सत्राला उपस्थित राहण्याबाबत आदेशित करावे .
*दिनकर पाटील*
संचालक ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments :
Post a Comment