पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 3 August 2020

टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात सोमवारपासून बदल

*“टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात सोमवारपासून बदल*


सप्रेम नमस्कार.


पुण्यात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे “टिलीमिली” या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मालिकेचे चित्रीकरण दिनांक १३ जुलै ते २३ जुलै २०२० या काळात बंद ठेवावे लागल्याने मालिकेच्या येत्या आठवड्यापासूनच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करणे भाग पडले. कृपया वेळापत्रकातील या बदलाची माहिती आपल्या परिचित सर्व शिक्षकांना द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांनाही हा बदल कळवावा ही कळकळीची विनंती. बदललेले इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन  वेळापत्रक याप्रमाणे असेल - 

*इयत्ता ५ वी ते ८ वी साठी सोमवार दि. ०३ ऑगस्ट २०२० ते सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत*
सकाळी ०७.३० ते ०८.३० इयत्ता ८ वी, सकाळी ०९.०० ते १०.०० इयत्ता ७ वी, सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता ६ वी आणि सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता ५ वी

*(दिनांक १५ ऑगस्ट रोजी महामालिकेचे भाग प्रसारित होणार नाहीत.)*


*इयत्ता १ ली ते ४ थी साठी दि. ०१ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० पर्यंत*

सकाळी ०७.३० ते ०८.३० इयत्ता ४ थी, सकाळी ०९.०० ते १०.०० इयत्ता ३ री, सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता २ री आणि सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता १ ली 

वर दर्शविलेल्या प्रत्येकी एक तासात त्या त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होतील व त्यांत पाच मिनिटांचे मध्यांतर असेल.

आपले स्नेहांकित,
*टीम एमकेसीएल*

No comments :

Post a Comment