पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Thursday 2 March 2017

MDM/ APP OF MONTH / E- चळवळ

    शालेय पोषण आहार दैनंदिन लाभार्थी मागील तारखेची माहिती भरण्याची सुविधा 05/03/2017 पर्यत  देण्यात आली आहे .ज्यांची काही दिवसाची माहिती भरणे प्रलंभीत आहे त्यानी तात्काळ केंद्र प्रमुख अथवा तालुका Login वरुन भरुन घ्यावी . तदनंतर चालू आर्थिक वर्षामधे पुन्हा संधी दिली जाणार नाही  प्रलंबीत माहिती भरण्याची शेवटची संधी आहे .
            तसेच माहे फेब्रुवारी 2017 च्या Closing Balance ला  approve सुद्धा 04/03/2017 पर्यन्त देणे. ज्यानी नवीन Mdm app डाउनलोड केले आहे त्यांनी mdm app द्वारेच approval देता येईल मात्र ज्यानीअद्यापही डाउनलोड केले नाही त्यानी , नविन mdm app डाउनलोड करुण घ्यावे  व त्याद्वारे Closing Balance ला approve द्यावे,   तसेच online शाळेच्या Login वरुन mdm daily attendance ला जउन सुधा approve देता येईल .हे करत असताना शाळेच्या नोंद वही वर 28/02/2017 अखेर जेवढा माल शिल्लक आहे  तोच नमूद करण्यात यावा
**************************************

          *APP OF THE MONTH*

------------------------------------------------

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर राज्यातील अनेक शाळांमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे लाखो  शिक्षक तंत्रस्नेही झालेले आहेत व हजारो शिक्षकांनी  अनेक ब्लॉग, वेबसाईट, शैक्षणिक व्हिडीओ व शैक्षणिक Apps स्वतः बनविले आहेत.  विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अनेक  उपयुक्त शैक्षणिक Apps चा वापर शिक्षकांकडून केला जात आहे. अनेक शिक्षक नाविन्यपूर्ण शैक्षणिक Apps बाबत माहिती देण्यास उत्सुक असतात. अशा शिक्षकांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व सदर उत्कृष्ट शैक्षणिक App  ची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी मा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार आय.टी. विभाग,  विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे कडून App of the Month नावाची लेखमाला जीवन शिक्षण मासिकातून सुरु करण्याचा मानस आहे.

सदर लेखमालेसाठी शिक्षकांनी दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत वापरात असलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक  App ची माहिती व त्याद्वारा विद्यार्थ्यामध्ये झालेला बदल याबद्दलची माहिती  थोडक्यात लेख स्वरूपात युनिकोड मध्ये लिहून आवश्यक तेथे सदर App चे स्क्रीनशॉट जोडून विद्या प्राधिकरणातील, आय. टी. विभागाकडे maaitcell@gmail.com या मेल वर word व pdf फाईल मध्ये पाठवावेत.

सदर लेख पाठवत असताना इमेल च्या subject मध्ये App of the Month असा उल्लेख करावा.

प्राप्त झालेल्या लेखांमधून दर महिन्याला एक लेख जीवन शिक्षण या मासिकात App of the Month या शीर्षकाखाली प्रसिध्द केला जाईल.

-        मा. संचालक, विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे
**************************************
   


 http://anyflip.com/nfvh/obvu/
*तंत्रस्नेही चळवळ ई-पत्र*
मा. धीरज कुमार ,संचालक विद्या प्राधिकरण तथा आयुक्त (शिक्षण) यांच्या संकल्पनेतून तंत्रस्नेही चळवळीच्या घडामोडी आपल्या समोर दर महिन्याला तंत्रस्नेही चळवळ –ई चळवळ या पत्राच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहे. जानेवारी २०१७ चा पहिला अंक आपल्या समोर सादर करत आहोत.
**************************************

No comments :

Post a Comment