पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday 7 March 2017

ABL

*ABL म्हणजे Activity Based Learning ( कृतीयुक्त अध्ययन पद्धती )*

ABL ही एक प्रभावी व परिणामकारक अशी अध्ययन पद्धती आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती पेक्षा ही पद्धत वेगळी असून विध्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. त्यामुळे केलेले अध्ययन हे प्रभावी व चिरकाल टिकणारे असते. या पद्धतीत शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते.

# *ABL पद्धतीची संकल्पना :-*
या पद्धतीत मुलांना स्वतः कृती करून शिकावे लागते. यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी च्या वर्गांच्या अभ्यासक्रमाची मांडणी माईल स्टोन मध्ये *( milestone )* मध्ये केलेली आहे. यात घटक, उपघटक, पाठय मुद्दे वेगवेगळ्या कृतींमध्ये विभागले आहेत. या कृती/ कार्ड यांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे मइलेस्टोल होय. असे प्रत्येक विषयात 10 ते 15 टप्पे म्हणजे *milestone* आहेत.
            या milestone ची मांडणी केलेला तक्ता म्हणजे ladder होय. ladder हे त्या विषयाचे वार्षिक नियोजन असते. प्रत्येक ladder वरील प्रत्येक milestone मध्ये 10 ते 14 कृती / कार्ड असतात. यातील कार्डांपैकी पहिल्या कार्डावर संकल्पना / संबोध स्पष्ट केलेला असतो. पुढे पुढे त्याची व्याप्ती वाढत जाते व भरपूर सराव असतो. सरावानंतर शेवटी मूल्यमापनावर / शिष्यवृत्तीवर आधारित कार्ड वि. सोडवावे लागते. मूल्यमापन कार्ड (गुच्छ) म्हणजे त्याने अभ्यासलेल्या घटकावर आधारित चाचणी असते. ती चाचणी वि.स अचूक सोडवत आली तर तो milestone त्या वि.चा पूर्ण झाला असे समजावे . जर त्यास अचूक चाचणी सोडवता नाही अली तर पुन्हा त्या milestone मधील कार्ड सोडवावेत.

# *ABL साहित्याची ओळख :-*
                 ABL चे साहित्य / कार्ड कोणत्या इयत्तेचे आहे हे समजण्यासाठी प्रत्येक इयत्येचा रंग निश्चित केलेला असून तो रंग त्या इयत्तेच्या कार्ड भोवती दिलेला आहे.

*इयत्ता व रंग पुढीलप्रमाणे*
      इयत्ता           रंग
     पहिली।         लाल
     दुसरी।           हिरवा
     तिसरी।          निळा
     चौथी।            केशरी(फिकट)
       रंगप्रमाणेच प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे लोगो वापरलेले आहेत.ते पुढीलप्रमाणे
        विषय।        लोगो
        भाषा           प्राणी
        गणित।        पक्षी
        इंग्रजी          वाहने
        परिसर1      फळे
        परिसर2      दिवे
  प्रत्येक कार्डाच्या उजव्या कोपऱ्यातील अंकावरून त्या कार्डाचा ladder वरील क्रमांक समजतो. त्याखालील क्रमांक हा कोणत्या माईलस्टोन मधील कितव्या क्रमांकाचे कार्ड आहे हे समजते.या क्रमांकाचा उपयोग वर्क डन रजिस्टर मध्ये नोंदवण्यासाठी होतो.
# *वर्गखोलीचे नियोजन : -*
        या अध्ययन पद्धतीत इयतानिहाय वर्ग नसून विषयनिहाय वर्गखोली असते.त्या त्या वर्गखोलीत त्या त्या विषयासाठी स्वतंत्र रँकची रचना करून त्यात इ.१ली ते ४थी ची सर्व कार्ड ठेवायची असतात.तसेच त्या विषयाचे इ१ली ते ४थी चे ladder  भिंतीवर लावायचे. त्यामुळ एकाच वेळी सर्व स्तरातील वि. त्या विषयाची अध्ययन कार्ड सोडवू शकतात.

# *अध्ययनाचे ६ टप्पे : -*

वि. अध्ययन कार्ड सोडवत असताना त्याला १ mileston पूर्ण करण्यासाठी ६ टप्प्याने फिरावे लागते. कार्डवरील लोगो पाहून तो वि. योग्य त्या गटात बसून अध्ययन करतो. त्यासाठी प्रत्येक विषयाच्या ६-६ अध्ययन थाळ्या (समूह थाळ्या) आहेत.

# *वेळापत्रक व गट कसे करावे : -*

   शाळेचा पट, शिक्षकसंख्या व वर्गखोल्या यांचा विचार करून ABL चे गट /वेळापत्रक करावे लागते. सर्व गटात साधारणपणे सर्व स्तरातील वि.येतील असे नियोजन करावे. वेळापत्रक करताना दररोज किमान 2 मुख्य विषयांचे अध्ययन होणे अपेक्षित आहे.

 # *दिवसभराची कार्यवाही : -*

       ABL राबवत असताना सकाळ सत्रात परिपाठनन्तर 30 ते ४0 मि. साईड ladder वरील त्या महिन्यातील कृती घ्यावी. या कृतीत त्या वर्गातील सर्व वि.सामूहिकरीत्या सहभागी होतील.(गाणी,गोष्ट,कविता)
       त्यांनतर मुख्य २विषयांचे सव्वा ते दीड तासांचे प्रत्येकी अध्ययन होईल. दुसऱ्या सत्राच्या शेवटी पुन्हा ३०ते४०मी विषयानुसार सामूहिक कृती घ्यावी.
सत्र पूर्व व सञोत्तर कृती ह्या आपापल्या वर्गात सामूहिकरीत्या घेणे अपेक्षित आहे.

# *ABL अध्ययन  पद्धतीचे  फायदे : -*

🔸वि. स्वतःच्या गतीने व क्षमतेने शिकतो.
🔸वि .ला दिवसभरात २ विषयांचे अध्ययन करावे लागत .
🔸वि. प्रत्यक्ष कृती करून शिकत असल्याने अध्ययन प्रभावी व परिणामकारक होते.
🔸सराव व दृढीकरणाला भरपूर वाव आहे.
🔸वि.ने अध्ययन केलेल्या घटकवरच परीक्षा(चाचणी)असते. त्यामुळे परीक्षाचा ताण नसतो.      
🔸हसत खेळत ,मनोरंजनातून शिक्षण होते.
🔸वि.सतत कार्यमग्न राहतो.
🔸वि.चा सर्वांगीण विकास होतो.                             🔸वि.एका वर्षात एकापेक्षा जास्त इयत्तांचा अभ्यास करू शकतो.
🔸सहकार्याची भावना वाढीस लागते.

# *ABL या अध्ययन पद्धतीच्या मर्यादा : -*

🔹या पद्धतीत शिक्षकाला रॅक, ladder, कार्ड ,लोगो,समूहथाली, माईलस्टोन यांची माहिती असावी लागते.
🔹प्रत्येक वर्गाची पटसंख्या साधारण ३०पर्यंतच असावी.
🔹एकदा मिळालेले ABL चे साहित्य खराब झाल्यास ते पुन्हा मिळवताना अडचणी येतात.
🔹ABL असलेल्या शाळेत शिकलेला एखादा वि. ABL उपक्रम नसलेल्या शाळेत शिकण्यास गेला तर त्याला पारंपरिक पद्धतीने अध्ययन करावे लागते.

No comments :

Post a Comment